मांढळ येथे ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी, मांढळ येथील आंभोरा रोड, किन्ही फाटा येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात यावे मांढळ येथे ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी कुही : मौजा मांढळ येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करून उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य आशिष आवळे यांनी केली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून, मांढळ हे परिसरातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मांढळ येथे आजूबाजूच्या गावांतील नागरिक व्यवसाय, खरेदी-विक्री व दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे या वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी मांढळ येथील आंभोरा रोड, किन्ही फाटा येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात यावे. यामुळे नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल आणि शासनाच्या हरित ऊर्जा व स्वच्छ ऊर्जा धोरणाला बळकटी मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मांढळ येथे ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी, मांढळ येथील आंभोरा रोड, किन्ही फाटा येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात यावे मांढळ येथे ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी कुही : मौजा मांढळ येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करून उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य आशिष आवळे यांनी केली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून, मांढळ हे परिसरातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मांढळ येथे आजूबाजूच्या गावांतील नागरिक व्यवसाय, खरेदी-विक्री व दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे या वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी मांढळ येथील आंभोरा रोड, किन्ही फाटा येथे १५ वा वित्त आयोग (जिल्हा परिषद स्तर) अंतर्गत ई-चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात यावे. यामुळे नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल आणि शासनाच्या हरित ऊर्जा व स्वच्छ ऊर्जा धोरणाला बळकटी मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1
- मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही1
- किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित1
- वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले1
- विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 88053774532
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- *रस्त्यावर मोकाट गायी मुळे अपघाताचा धोका...* *सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव रस्त्यावर उतरून स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर* सावनेर:-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गायींमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेरच्या संबंधित पथकाला तात्काळ पाचारण केले. नगरपरिषद सावनेरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोकाट गायी पकडून त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला. यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेर येथे जाऊन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांची भेट घेतली. शहरातील मोकाट जनावरांची समस्या, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, शहरातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहर सुस्थितीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रस्त्यावर मोकाट जनावरे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून अनेक गंभीर अपघातांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सावनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगरपरिषद सावनेरच्या पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक.पोलीस प्रशासनाकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असला, तरी नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रमाणात आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अधिक प्रभावी आणि नियमित कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. :हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते सावनेर1
- डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1