डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma1
- सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे1
- रोलर नाही… थेट बसच वापरली! आर्वी आगारातील धक्कादायक प्रकार; प्रश्न विचारताच व्यवस्थापकांची उद्धट भाषा?”1
- वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विकास भवनात समाधान शिबिर वर्धा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी विकास भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला भेट देत आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला व महसूल विभागाच्या विविध सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात स्वामित्व सनद, जिवंत सातबारा, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभ, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी आदी सेवांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निराकरण करून शासनाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आमदार राजेश बकाने यांनी सांगितले.1
- एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी1
- विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 88053774532
- पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.1