पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
पिपरी (देशमुख) परिसरात पाणीच पाण,कोच्ची–मुरसा मार्ग पुरामुळे बंद चंद्रपूर : वर्धा नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे भद्रावती तालुक्यातील पिपरी (देशमुख) परिसर जलमय झाला असून पिपरी–कोच्ची–मुरसा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिपरी (देशमुख) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी येथून कोच्ची–मुरसा मार्गावर दोन्ही नाल्यांना आलेल्या पूरामुळे पुलावर सुमारे पाच फूट पाणी आल्याने हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पूराच्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून सोयाबीन व कापूस पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तसेच कोच्ची–घोनाड परिसरातील नाल्यालाही पूर आल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या हंगामी पिकांवर पाणी फिरल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
- वणीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; हजारो नागरिकांनी घेतला लाभ1
- प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त; राष्ट्रमाता विद्यालय में भावुक विदाई एवं सत्कार समारोह.. देवाडाखुर्द प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त; राष्ट्रमाता विद्यालय में भावुक विदाई एवं सत्कार समारोह.. देवाडाखुर्द स्थित राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय के कर्तव्यनिष्ठ और आदर्शवादी प्राचार्य दिलीप मॅकलवार आज, 31 जुलाई 2026 को नियत आयु सीमा पूर्ण होने पर अपने पद से सेवानिवृत्त हो गए। उनकी दीर्घकालीन शैक्षणिक सेवा के उपलक्ष्य में विद्यालय परिसर में भावुक एवं गरिमामय विदाई तथा सत्कार समारोह का आयोजन किया गया। दीप प्रज्ज्वलित करके की गई। इस अवसर पर विद्यालय के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा परिसर के ग्रामीण बड़ी संख्या में उपस्थित रहे। प्राचार्य दिलीप मॅकलवार ने अपने सेवाकाल के दौरान विद्यार्थियों के शैक्षणिक एवं सर्वांगीण विकास के साथ-साथ विद्यालय की प्रगति में महत्वपूर्ण योगदान दिया। उनकी सेवा और योगदान का गौरव करते हुए विद्यालय परिवार, विभिन्न संस्थाओं, सहकर्मियों और ग्रामीणों की ओर से उन्हें शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ एवं स्मृति चिन्ह भेंट कर सम्मानित किया गया। इस अवसर पर शिक्षक, विद्यार्थी और सहकर्मियों ने प्राचार्य मॅकलवार के साथ बिताए गए अपने अनुभवों और यादों को साझा किया। उनके अनुशासनप्रिय नेतृत्व, प्रशासनिक कार्यकुशलता, विद्यार्थियों के प्रति आत्मीयता और शिक्षा के प्रति समर्पण की सभी ने सराहना की। कई लोगों ने अपने मनोगत में कहा कि प्राचार्य मॅकलवार केवल एक प्रशासक ही नहीं, बल्कि विद्यार्थियों और सहकर्मियों के लिए एक मार्गदर्शक और प्रेरणास्रोत रहे है. सत्कार का उत्तर देते हुए प्राचार्य दिलीप मॅकलवार भावुक हो गए। उन्होंने अपने लंबे सेवाकाल की विभिन्न यादों को साझा करते हुए विद्यालय के विकास में सहयोग देने वाले सभी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, अभिभावक और ग्रामीणों के प्रति आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि विद्यार्थियों की प्रगति और उनका उज्ज्वल भविष्य ही उनके जीवन की वास्तविक सार्थकता है। साथ ही उन्होंने सेवानिवृत्ति के बाद भी शैक्षणिक और सामाजिक क्षेत्र में अपनी क्षमता के अनुसार योगदान देने की भावना व्यक्त की.. 🙏 भावुक माहौल में दी गई विदाई दीर्घकालीन सेवाकाल के बाद प्राचार्य दिलीप मॅकलवार को विद्यालय परिवार और ग्रामीणों की ओर से भावपूर्ण विदाई दी गई। इस अवसर पर उपस्थित सभी ने उनके स्वस्थ, सुखी और सफल सेवानिवृत्त जीवन के लिए शुभकामनाएं दीं। साथ ही भविष्य में भी उनका मार्गदर्शन विद्यालय और समाज को मिलता रहे, ऐसी भावना उपस्थितों ने व्यक्त की। एक शिक्षक के रूप में शुरू हुआ सफर और प्राचार्य के रूप में निभाई गई जिम्मेदारी आज एक नए पड़ाव पर पहुंची। शासकीय सेवा से भले ही प्राचार्य दिलीप मॅकलवार सेवानिवृत्त हो गए हों, लेकिन विद्यार्थियों के मन में एक शिक्षक, मार्गदर्शक और प्रेरणास्रोत के रूप में उनकी पहचान हमेशा कायम रहेगी। राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडाखुर्द में संपन्न हुआ यह विदाई समारोह भावनाओं, सम्मान और यादों से भरा रहा। चंद्रपूर नगरी के लिए — जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधि। #चंद्रपूरनगरी #ChandrapurNagari #DilipMakelwar #प्राचार्यदिलीपमॅकलवार #DilipMakelwarSir #सेवानिवृत्ती #सेवानिवृत्तीसमारंभ #विदाईसमारोह #सत्कारसमारोह #राष्ट्रमाताविद्यालय #राष्ट्रमाताविद्यालयदेवाडाखुर्द #Devadakhurd #Chandrapur #चंद्रपूर #शिक्षक #शिक्षणक्षेत्र #शिक्षकसत्कार #शैक्षणिकसेवा #विद्यार्थी #शिक्षकदिनचर्या #भावुकविदाई #महाराष्ट्रन्यूज #चंद्रपूरन्यूज #LocalNews #BreakingNews #EducationNews #MaharashtraNews #ChandrapurNews #NewsUpdate #ViralNews1
- वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1
- सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे1
- स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि ) स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली. सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली1
- डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1
- वर्धा नदीच्या फुगवट्यामुळे चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी; ५० हून अधिक घरे बाधित, चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग बंद चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने चंद्रपूर शहरासह वाहतुकीला पुराचा मोठा फटका बसला आहे. वर्धा नदी फुगल्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या इरई आणि झरपट नदीतील पाणी मागे फिरल्याने (बॅक वॉटर) चंद्रपूर शहरातील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शहरात 'बॅक वॉटर'चा फटका; ५० हून अधिक घरांत शिरले पाणी वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरल्याने झरपट आणि इरई नदीचे पाणी पुढे न जाता शहराच्या दिशेने मागे फिरले आहे. यामुळे आज पहाटेपासूनच चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. विशेषतः भिवापूर भागातील सुमारे ५० हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. मनपा व प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. बॅक वॉटरची पातळी वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. वर्धा नदीचा पूल पाण्याखाली; दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक ठप्प दरम्यान, वर्धा नदीने पात्र सोडल्याने चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा आणि दक्षिण भारताला जोडणारा वर्धा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे २ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काल रात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला तेलंगणा व दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, नदीची पाणी पातळी ओसरेपर्यंत हा मार्ग बंदच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.1