बानेगाव उपकेंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरा; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा बानेगाव उपकेंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरा; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा घनसावंगी प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड बु. अंतर्गत असलेल्या बानेगाव उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) ही दोन पदे मागील सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्यसेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही दोन्ही पदे पुढील १५ दिवसांत भरावीत, अशी मागणी ग्रामपंचायतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार, बानेगावसह परिसरातील विठ्ठलनगर, लिंगसेवाडी आणि शेवता येथील वृद्ध, महिला व बालकांना प्राथमिक आरोग्यसेवेसाठी अडचणी येत आहेत. किरकोळ आरोग्य समस्या निर्माण झाल्यासही नागरिकांना वाहनाची व्यवस्था करून तीर्थपुरी येथे जावे लागत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने १९ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका आरोग्य अधिकारी, घनसावंगी यांना निवेदन दिले आहे. बानेगाव उपकेंद्रातील CHO आणि MPW ही दोन्ही रिक्त पदे १५ दिवसांत भरण्यात यावीत, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पदे न भरल्यास आमरण उपोषणाचा इशारा रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने संबंधित कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. उपोषणाची तारीख व वेळ प्रशासनाला कळविण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता अशोक शिंदे आणि उपसरपंच बालासाहेब आश्रुबा उढाण यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. आता आरोग्य विभाग या मागणीवर कोणती कार्यवाही करतो, याकडे बानेगावसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- *‘सड़क के गड्ढे नहीं, सिस्टम का आलस भर रहे हैं’—युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल का वायरल कारनामा!* शंकरगढ़(प्रयागराज) प्रयागराज के शंकरगढ़ में जब जर्जर सड़कों से परेशान जनता और बेपरवाह तंत्र के बीच उम्मीद की कोई किरण नहीं दिख रही थी, तब एक युवा आगे आया और उसने दिखा दिया कि जनसेवा भाषणों से नहीं, कर्मों से होती है। युवा समाजसेवी प्रभाष सिंह पटेल ने किसी सरकारी बजट या प्रशासनिक मंजूरी का इंतजार किए बिना, अपनी जेब से पैसे खर्च कर सड़क के खतरनाक गड्ढों को भरवाने की एक अनूठी और प्रेरणादायक पहल शुरू की है। सोशल मीडिया पर प्रभाष सिंह पटेल के इस कदम की चौतरफा तारीफ हो रही है। लोग उनकी तस्वीरों और वीडियो को शेयर करते हुए लिख रहे हैं—"नेता सिर्फ वादे करते हैं, लेकिन प्रभाष जैसे युवा बदलाव लाते हैं।" *क्या बोले स्थानीय लोग?* इस सड़क से गुजरने वाले दैनिक यात्रियों और ग्रामीणों के चेहरे पर राहत साफ देखी जा सकती है। लोगों का कहना है कि आए दिन इन गड्ढों की वजह से हादसे हो रहे थे। प्रभाष पटेल ने अपने निजी खर्च से गिट्टी और मौरंग मंगवाकर न सिर्फ सड़क को चलने लायक बनाया, बल्कि कई अनमोल जिंदगियों को हादसों से भी बचा लिया। *प्रशासन की नींद कब खुलेगी?* युवा समाजसेवी की इस सराहनीय पहल ने जहां एक तरफ जनता का दिल जीत लिया है, वहीं दूसरी तरफ संबंधित प्रशासनिक अधिकारियों की कार्यशैली पर भी बड़े सवाल खड़े कर दिए हैं। *सामूहिक प्रयास ही असली समाधान* प्रभाष सिंह पटेल की यह पहल एक बड़ा संदेश देती है: अगर समाज का हर नागरिक और प्रशासनिक अमला एक साथ मिलकर कदम उठाए, तो आमजन को सुरक्षित, सुगम और दुर्घटनामुक्त आवागमन मिल सकता है। प्रभाष पटेल का यह जज्बा आज के युवाओं के लिए एक मिसाल बन चुका है। सलाम है ऐसे जनसेवकों को, जो समाज को गड्ढों से निकालकर प्रगति की राह पर ले जाने का दम रखते हैं!1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी बीड : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत संबंधित प्रकरणातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, सत्य परिस्थिती उजेडात आणताना पत्रकारांवर दबाव अथवा पोलिस कारवाई होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले. यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पत्रकार मंदार गोंजरी यांच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी केली. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पत्रकारांवरील कारवाईचा निषेध करत निदर्शकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ ; महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता 🚨महापुराचा कहर ; बघा भयानक व्हिडिओ काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, १००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.1