logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पद्मशाली समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, कलामंदिरजवळील लेबर फेडरेशन कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबाद संलग्न आणि मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली प्रौढ, युवक व महिला संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. रविवारी १२ जुलै रोजी पार पडलेल्या या बैठकीला समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नोंदणी प्रमुख, चौधरी प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यभर सुरू असलेल्या उपवधू-वर नोंदणी मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या विविध जिल्हे आणि तालुक्यांतून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणीचे काम समाधानकारक सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मेळाव्याची माहिती समाजबांधवांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि स्थानिक पातळीवरील संपर्क अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परिचय पुस्तिकेच्या छपाईसाठी लागणारे नोंदणी फॉर्म, जाहिरात फॉर्म आणि आर्थिक संकलनाची माहिती तातडीने गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे. विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला असून सर्व समाजबांधवांना यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष, महिला व युवक पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आगामी मेळाव्याच्या नियोजनाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

1 hr ago
user_आपली बिलोली नगरी
आपली बिलोली नगरी
Social worker बिलोली, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago
9042bbbc-0b49-45b7-a4eb-cf9c346288e1

नांदेडमध्ये येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पद्मशाली समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, कलामंदिरजवळील लेबर फेडरेशन कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबाद संलग्न आणि मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली प्रौढ, युवक व महिला संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. रविवारी १२ जुलै रोजी पार पडलेल्या या बैठकीला समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नोंदणी प्रमुख, चौधरी प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यभर सुरू असलेल्या उपवधू-वर नोंदणी मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या विविध जिल्हे आणि तालुक्यांतून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणीचे काम समाधानकारक सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मेळाव्याची माहिती समाजबांधवांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि स्थानिक पातळीवरील संपर्क अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच परिचय पुस्तिकेच्या छपाईसाठी लागणारे नोंदणी फॉर्म, जाहिरात फॉर्म आणि आर्थिक संकलनाची माहिती तातडीने गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे. विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला असून सर्व समाजबांधवांना यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष, महिला व युवक पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आगामी मेळाव्याच्या नियोजनाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    1
    शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महेश बिरगड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महेश बिरगड यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महेश बिरगड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महेश बिरगड यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

"मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    23 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील संत सेवालाल महाराज चौकात रविवारी बंजारा समाज एकता संकल्प यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. देशभर बंजारा समाजात एकता, संघटन आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे समाजबांधवांनी पुष्पवृष्टी, जयघोष आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा बंजारा समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी असून समाजाने संघटित राहून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंध्र प्रदेशातील सेवागड येथून ५ जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा देशातील १८ राज्यांतून प्रवास करत २६ जुलै रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहे. धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सेवागड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. परळीतील या स्वागत सोहळ्याला बंजारा समाजातील सरपंच विजय राठोड, प्रेमदास पवार, अमर पवार, प्रविण पवार, वैजनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील संत सेवालाल महाराज चौकात रविवारी बंजारा समाज एकता संकल्प यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. देशभर बंजारा समाजात एकता, संघटन आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे समाजबांधवांनी पुष्पवृष्टी, जयघोष आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा बंजारा समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी असून समाजाने संघटित राहून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आंध्र प्रदेशातील सेवागड येथून ५ जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा देशातील १८ राज्यांतून प्रवास करत २६ जुलै रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहे. धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सेवागड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. परळीतील या स्वागत सोहळ्याला बंजारा समाजातील सरपंच विजय राठोड, प्रेमदास पवार, अमर पवार, प्रविण पवार, वैजनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।
    1
    नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्रीक्षेत्र आय श्री रेणुका माता मंदिराचे दर्शन घेऊन वसमतकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता, मात्र देवीच्या कृपेने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त कार (क्रमांक MH-26/BH-2723/G) ही वसमत येथील ३६ वर्षीय लखन लडा यांच्या मालकीची असून ते स्वतःच कार चालवत होते. कारमध्ये एकूण पाच भाविक प्रवास करत होते. श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन वसमतकडे परतत असताना अचानक कारचे ब्रेक निकामी झाले, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. या अपघातात उज्ज्वला बालाजी साळवे यांना फ्रॅक्चर झाले असून ३१ वर्षीय प्रमोद साळवे यांच्यासह इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच श्री रेणुका देवी संस्थानची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.
    4
    नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्रीक्षेत्र आय श्री रेणुका माता मंदिराचे दर्शन घेऊन वसमतकडे परतणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी भीषण अपघात झाला. हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता, मात्र देवीच्या कृपेने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातग्रस्त कार (क्रमांक MH-26/BH-2723/G) ही वसमत येथील ३६ वर्षीय लखन लडा यांच्या मालकीची असून ते स्वतःच कार चालवत होते. कारमध्ये एकूण पाच भाविक प्रवास करत होते. श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन वसमतकडे परतत असताना अचानक कारचे ब्रेक निकामी झाले, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

या अपघातात उज्ज्वला बालाजी साळवे यांना फ्रॅक्चर झाले असून ३१ वर्षीय प्रमोद साळवे यांच्यासह इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच श्री रेणुका देवी संस्थानची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे.
    user_सक्षम महाराष्ट्र न्यूज
    सक्षम महाराष्ट्र न्यूज
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.