अवकाळी पावसाचा तडाखा : जालन्यात वीज कोसळून तीन जनावरे दगावली अवकाळी पावसाचा तडाखा : जालन्यात वीज कोसळून तीन जनावरे दगावली जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे काल रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. शेतकरी सदाशिवराव मुळे (सर्वे क्र. ५२३) यांच्या शेतात वीज कोसळून तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी नुकसानीची सविस्तर माहिती घेत शेतकरी सदाशिवराव मुळे यांना धीर देत शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले. पाहणीदरम्यान आमदार खोतकर यांनी महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अवकाळी पाऊस व वीज कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने अधिक सतर्क राहून तात्काळ मदत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

- पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.1
- परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.1