चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा रोडवर आज, ११ जुलै रोजी सकाळी एका भरधाव बसने सायकलस्वाराला चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. तुकूम परिसरातील पोलीस हॉल समोर घडलेल्या या अपघातात विनायक गंगाधर पराते (वय ५३ वर्षे, रा. तुकूम) या सायकलस्वाराचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. विनायक पराते हे आपल्या सायकलने नेहमीप्रमाणे जात असताना, अचानक आलेल्या MH 40 N 9429 या क्रमांकाच्या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पराते हे थेट बसच्या चाकाखाली चिरडले गेले. या घटनेमुळे तुकूम आणि ताडोबा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला आहे. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ताडोबा रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची मोठी रेलचेल असते. रस्त्यावरील वाढते अतिक्रमण अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुण मुलीचा अशाच अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी जनक्षोभ उसळल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटवले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती पुन्हा 'जैसे थी' झाली. याच वाढत्या अतिक्रमणामुळे आज विनायक पराते यांना आपले प्राण गमवावे लागल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा रोडवर आज, ११ जुलै रोजी सकाळी एका भरधाव बसने सायकलस्वाराला चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. तुकूम परिसरातील पोलीस हॉल समोर घडलेल्या या अपघातात विनायक गंगाधर पराते (वय ५३ वर्षे, रा. तुकूम) या सायकलस्वाराचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. विनायक पराते हे आपल्या सायकलने नेहमीप्रमाणे जात असताना, अचानक आलेल्या MH 40 N 9429 या क्रमांकाच्या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पराते हे थेट बसच्या चाकाखाली चिरडले गेले. या घटनेमुळे तुकूम आणि ताडोबा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला आहे. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ताडोबा रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची मोठी रेलचेल असते. रस्त्यावरील वाढते अतिक्रमण अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुण मुलीचा अशाच अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी जनक्षोभ उसळल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटवले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती पुन्हा 'जैसे थी' झाली. याच वाढत्या अतिक्रमणामुळे आज विनायक पराते यांना आपले प्राण गमवावे लागल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्थानिक एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी क्रांती दलाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. रंजनाताई पारशिवे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी सायंकाळी वरोरा आगार प्रमुखांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा आणि परिसरातील इतर गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी वरोरा येथे येतात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रातील एकही बस वेळेवर धावत नसून, सकाळी ८:०० ते ९:३० दरम्यान येणाऱ्या बसेस तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत आहेत किंवा अनेकदा थेट रद्द केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे महत्त्वाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना हुकत आहेत. शिवाय, महाविद्यालयातील बायोमेट्रिक हजेरीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरातील कोलगाव चेक पोस्टजवळ तब्बल आठ तास रस्ता रोको करण्यात आला आहे.1
- पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी ते थेरगाव या महत्त्वाच्या संपर्क मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची आज मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग या परिसरातील अनेक गावांसाठी दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख दुवा असून, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिका याच मार्गाचा वापर करतात. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवघ्या चार-पाच वर्षांत रस्ता उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाच्या निधीचा हा गैरवापर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, खराब भागाची पुनर्बांधणी करावी किंवा गरज पडल्यास संपूर्ण रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक स्तरावरून जोर धरत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.3
- डायबिटीझ नियंत्रणात ठेवण्यासाठी फूड पेअरिंगचा मोठा फायदा होऊ शकतो आणि याद्वारे रक्तातील शुगर स्पाईक रोखणे शक्य आहे, असा महत्त्वपूर्ण सल्ला डॉ. मेहेर अब्बास यांनी दिला आहे. प्रत्येक व्यक्तीने आजच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून विविध आजारांवर योग्य आणि सुरक्षित वैद्यकीय समाधानाचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, डायबिटीझ, किडनीचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा व टीबी) यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर योग्य सल्ल्याने मात करता येऊ शकते. निरोगी जीवनशैलीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून मधुमेहमुक्त भारत घडवण्यास मदत होईल.1
- नागपूरमधील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉल येथे लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सशक्तिकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिलांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वकील पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मुस्तफा पठाण यांनी महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली. प्रेरणा विकास सोसायटीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिला आंदोलनाचे उद्दिष्ट, त्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.1
- नागपूर येथील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉलमध्ये लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सक्षमीकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. याशिवाय विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्याही या वेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अधिवक्ता पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी मुस्तफा पठाण (अल्पसंख्याक आयोग सदस्य तथा जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी) यांनी शासनाच्या विविध महिला कल्याणकारी योजना, महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक पात्र महिलेपर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवणे, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वरोजगार, कौशल्य विकास, महिला बचत गट आणि सामूहिक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याचा संदेश दिला. तसेच लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा, महिला कल्याण आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देत त्यांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. एकल महिला समितीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिलांच्या समस्या, त्यांचे पुनर्वसन आणि स्वावलंबनासाठी संस्थेच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. समाज्यातील प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.1
- मराठीचे शिलेदार यांच्या वतीने 'सोमवार ते बुधवार' या स्पर्धेतील आदर्श कवींना संगीतमय सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मुख्य संपादक राहुल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या काव्य समूहात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी ७३८५३६३०८८ या क्रमांकावर आपला परिचय पाठवून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील विभूती खंड परिसरात बस आणि कारच्या किरकोळ धडकेनंतर वाद इतका टोकाला गेला की, एका वकील आणि पोलीस कर्मचाऱ्यामध्ये भररस्त्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये वकील पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करताना दिसत आहेत. एका किरकोळ अपघाताने अचानक हिंसक वळण घेतल्याचे या घटनेत पाहायला मिळाले. या राड्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे।1