भूमीपुत्र एल्गार संघटने'कडून १३५ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ठाणे :मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भूमीपुत्र एल्गार संघटनेने' एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे 'शैक्षणिक पालकत्व' स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. आज १४ एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीच आम्ही या १३५ कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा 'शैक्षणिक एल्गार' यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील ३८, जव्हारमधील १८, डहाणूतील २३, तलासरीमधील १५, पालघरमधील १५, भिवंडीतील १०, वाड्यातील १० आणि विक्रमगड तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचलली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे,विकास धोडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पढेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, १३५ मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रमोद पवार यांनी दिली आहे.

- GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी1
- Post by Nirbhay Nagri1
- SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews1
- West Bengal Election को लेकर राहुल गांधी ने Congress की 5 बड़ी गारंटी का ऐलान किया है। इन गारंटियों में ₹10 लाख तक स्वास्थ्य बीमा, मुफ्त शिक्षा, किसानों को ₹15,000 सहायता, युवाओं के लिए नौकरी और महिलाओं को ₹2000 महीना जैसी बड़ी घोषणाएं शामिल हैं। क्या ये वादे बदलेंगे बंगाल की राजनीति? जनता से वोट की अपील के साथ कांग्रेस का बड़ा रोडमैप सामने आया। पूरा वीडियो देखें और जानिए Congress का Vision for Bengal 2026। 📢 Police Vision Times1
- MIM नगरसेविका सहर शेख पर संकट! क्या पिता-पुत्री पर दर्ज होगा फौजदारी केस?1
- आगरा में अंबेडकर जयंती पर विवाद: परशुराम चौक पर तोड़फोड़, CCTV कैमरे भी क्षतिग्रस्त 📰 न्यूज़ (कल की घटना): कल आगरा के आवास विकास स्थित परशुराम चौक पर उस समय तनाव की स्थिति बन गई, जब अंबेडकर जयंती के मौके पर कुछ अराजक तत्वों द्वारा कथित रूप से तोड़फोड़ की घटना सामने आई। जानकारी के अनुसार, कुछ लोगों ने जूते पहनकर छत्र पर चढ़कर वहां नीले झंडे लगाए और स्थल को नुकसान पहुंचाने की कोशिश की। इस दौरान मौके पर लगे CCTV कैमरों को भी तोड़ दिया गया। घटना के बाद स्थानीय लोगों में आक्रोश फैल गया और उन्होंने इसे धार्मिक भावनाओं से जुड़ा मामला बताया। स्थानीय नागरिकों और संगठनों ने प्रशासन से दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी हुई है और इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है। #AgraNews #AmbedkarJayanti #ParshuramChowk #BreakingNews #UttarPradesh #LawAndOrder #CCTV #ViralNews #PublicReaction #IndiaNews1
- बदलापूर लोकल मध्ये भिमरायांचे गाणं गात आज १३५ व्या जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !1
- Post by Nirbhay Nagri1
- माथेरान में फिर दिखा तेंदुआ! जंगल में मची सनसनी, दहशत में लोग #Matheran #Tendua #BreakingNews #ViralNews #JungleAlert1