Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यातून फरार आरोपी 24 तासांत जेरबंद; दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.
Dhule News 24
धुळ्यातून फरार आरोपी 24 तासांत जेरबंद; दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे शहरातील चाकण रोड परिसरातील ओम (HP) गॅस एजन्सी बाहेर आज नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांच्या मते, 25 दिवसांनंतर बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र मोबाईलवर दोन वेळा OTP येऊनही गॅस दिला जात नाही. 👉 याच OTP चा वापर करून सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by सुनिलआण्णा सोनवणे1
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- येवला: येथील मामलेदार गल्ली, जुने सिटी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या श्री दत्त महाराज मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ जुन्या पोलीस स्टेशनपासून करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक आणि पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष आकर्षण म्हणजे, मिरवणुकीत महिलांनी सादर केलेले गर्भा नृत्य यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या सोहळ्यात कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, शिवसेना गट नेते व नगरसेवक गणेश शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे नगरसेविका पारू गुजराती, राजेश भांडगे, सनी पटणी, राजू पटेल, बालूशेठ परदेशी, यती भाई गुजराती, शैलेश देसाई यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पुढील कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार (दि. ३ एप्रिल) या कालावधीत पार पडणार आहेत. शुक्रवारी होम दर्शन आणि सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे शहरात घडलेल्या मोठ्या घटनेत मोहाडी येथील खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा उपचारादरम्यान पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तात्काळ हालचाली करत अवघ्या 24 तासांत आरोपीला पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.1