दैनिक 'गाववाला' च्या वृत्तावर प्रशासकीय शिक्कामोर्तब;सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव आश्रम शाळेतील 'त्या' शिक्षकेचे बेकायदेशीर निलंबन अखेर स्थगित! सहाय्यक संचालकांच्या लेखी आदेशामुळे संस्थाचालकाची हुकुमशाही चव्हाट्यावर,कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे सेनगाव/विश्वनाथ देशमुख बाभुळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेतील वादग्रस्त निलंबन प्रकरणात अखेर सत्याचा विजय झाला आहे.दैनिक 'गाववाला'ने पुराव्यांच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर आता थेट प्रशासकीय शिक्कामोर्तब झाले असून,इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दि. १६/०९/२०२६ रोजी अधिकृत आदेश जारी करून श्रीमती कऊटकर मेघा श्रीराम यांचे नियमबाह्य निलंबन तात्काळ स्थगित केले आहे.या कायदेशीर दणक्यामुळे पत्रकाराला "बातमी का टाकली? शाळेत या"असा अजब जाब विचारणाऱ्या संस्थाचालकांची हुकूमशाही पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. बाभुळगाव आश्रम शाळा प्रशासनाने श्रीमती कऊटकर यांचे निलंबन करताना सर्व नियम धाब्यावर बसवले होते. या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र आश्रम शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. बाबुराव पवार यांनी थेट सहाय्यक संचालकांकडे दाद मागितली होती.या तक्रारीच्या आधारे ४,९ आणि ११ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांसोबत वरिष्ठ पातळीवर मौखिक चर्चा करण्यात आली.संस्थेला बचावाची पुरेशी संधी देऊनही त्यांचे दावे फोल ठरल्याने, सहाय्यक संचालकांनी (आदेश क्र. १३१५) हे बेकायदेशीर निलंबन तात्काळ रद्द ठरवले. 'दैनिक गाववाला'च्या निर्भीड पत्रकारितेचा विजय या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण लागताच दैनिक 'गाववाला'ने संघटनेच्या अधिकृत पत्रकावरून वस्तुस्थिती मांडणारे वृत्त प्रसिद्ध केले होते.आपली काळी कृत्ये उघड झाल्याच्या भीतीने बिथरलेल्या संस्थाचालकांनी थेट पत्रकारालाच "माझी बाजुची प्रतिक्रिया घेण्यासाठी आश्रम शाळेत या,बातमी का टाकली?"असा अजब आणि उर्मट सवाल केला होता.मात्र, सहाय्यक संचालकांच्या लेखी आदेशामुळे 'गाववाला'ची बातमी १००% खरी आणि अधिकृत असल्याचे सिद्ध झाले असून,जाब विचारणाऱ्या संस्थाचालकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापक आणि संस्था चालकांशी समन्वय साधून हा अन्यायकारक निर्णय फिरवल्यामुळे,पीडित कर्मचाऱ्यांनी दि.१६ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता ते उपोषण मागे घेतले आहे.वृत्तपत्राच्या भूमिकेमुळे आणि संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे पीडित शिक्षिकेला न्याय मिळाल्याने संपूर्ण परिसरात दैनिक 'गाववाला'च्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक होत आहे.

- देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.2
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा ध्वजारोहण कार्यक्रमाचा मार्ग रोखून धरत आंदोलन केले,शेतकरी महिला आणि आंदोलक इतके आक्रमक झाले की पोलिसांचे बॅरिकेट फेकून देण्यात आले पोलिसांशी झटापट झाली2
- धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.1
- स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन1
- स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1