logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्हा महिला क्रिकेट संघाचे उल्लेखनीय कामगिरी, जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून कौतुक पोलिसांच्या महिला क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी. लातूर (एल पी उगीले) “लातूर वुमेन्स प्रीमिअर लिग – २०२६” स्पर्धेत लातूर महिला पोलीस संघ यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच पोलीस अंमलदार नामदेव पाटील यांना बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड. लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या जबाबदारीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कठोर आणि व्यस्त दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतानाही लातूर पोलीस दलातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर व अस्तित्व सेवाभावी बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन (८ मार्च) निमित्त “लातूर वुमेन्स प्रीमिअर लिग – २०२६” (LWP-2026) या महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुल, हरंगुळ स्टेशनजवळ, बार्शी रोड, लातूर येथे मोठ्या उत्साहात व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या आणि स्पर्धात्मक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये लातूर पोलिसांच्या महिला क्रिकेट संघाने उत्कृष्ट आणि दैदिप्यमान कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. दैनंदिन पोलीस कर्तव्ये, बंदोबस्त, तपासकामे आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही लातूर पोलिसांच्या महिला खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना, जिद्द आणि खेळाडूवृत्ती दाखवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे लातूर जिल्हा पोलीस दलाचा मान उंचावला असून पोलीस दलात कार्यरत महिला कर्मचारी क्रीडा क्षेत्रातही सक्षम असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. याचबरोबर लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार नामदेव पाटील यांनीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेमध्ये त्यांनी बॅडमिंटन या खेळात सुवर्णपदक प्राप्त करून आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांची कलकत्ता (कोलकाता) येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने यश संपादन करत असल्याने लातूर जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढत आहे. दररोजच्या अत्यंत व्यस्त कर्तव्यांमुळे नियमित सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नसतानाही लातूर पोलिसांच्या महिला क्रिकेट संघाने व पोलीस अंमलदार नामदेव पाटील यांनी दाखविलेली ही दैदिप्यमान कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार राजेश्री हिंगणे तसेच खेळाडू राधा पवार, सावित्रा रायफले, सीमा बेदरे, मीना पवार, सुजाता कसपटे, सोनाली ढगे, दीपिका शिवलकर, पल्लवी चीलगर, लक्ष्मी शेळके, अंजली गायकवाड, प्रेमा बिराजदार, सोनी शेख, सारिका शिंदे तसेच पोलीस अंमलदार नामदेव पाटील व कोच म्हणून जबाबदारी पार पाडणारे पोलीस अमलदार रामलिंग शिंदे यांचे विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आगामी स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना कर्तव्यातून सरावासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी आगामी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून लातूर जिल्हा पोलीस दलाचा नावलौकिक देशभरात वाढवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

7 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
73808215-7a8d-481f-8d1a-c673c3994b2d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन  स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी  दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून  समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात  अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात.  प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    2
    प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन  स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी  दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून  समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात  अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. 
प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    2
    भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे 
मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक  व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे
मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    3
    *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव*
अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर  जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे  दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी  ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज  त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी  भक्ताने मोठ्या संख्येने  मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले 
भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष  उपस्थित होते ,
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 9561062369
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews* https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share
    1
    *महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर.. कोणीच सुरक्षित नाही -आमदार अमित देशमुख by photocrimenews*
https://youtube.com/live/kF4kuxSpXI4?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by अखंड भारत
    1
    Post by अखंड भारत
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    1
    शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत  लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    user_पत्रकार विश्वनाथ कांबळे
    पत्रकार विश्वनाथ कांबळे
    लोहा, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील
    1
    नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जेरबंद नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना. १ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत. सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
    2
    जेरबंद
नांदेड: गंगाबेट (ता. जि. नांदेड) येथील शेतातील आखाड्यावर वृद्ध दाम्पत्याला रॉडने मारहाण करून १.१० लाखांचे चांदीचे दागिने पळवणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई  रवी भास्कर शिंदे (२०) आणि भास्कर सायबा शिंदे (५५), दोघे रा. विरेगाव, जि. जालना.
१ लाख १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत.
सायबर सेलच्या मदतीने आरोपींना जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. स.पो.नि. विजयकुमार कांबळे अधिक तपास करत आहेत.
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.