श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓 दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६ 🕒 वेळ: दुपारी ०३:०० वा. 📍 स्थळ: बाजार चौक, श्री हनुमान मंदिर (पोलीस स्टेशन बाजूस), वाढोणा ✨ मुख्य आकर्षण: भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) प्रभु श्रीराम लल्ला झांकी बाहुबली हनुमान झांकी छत्रपती शिवाजी महाराज झांकी गौमाता राष्ट्रमाता झांकी भजन मंडळ ट्रॉला रिध्दम लाईव्ह साउंड, नांदेड 🚩 मिरवणूक मार्ग: श्री हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → श्री परमेश्वर गल्ली → लकडोबा चौक (समारोप) उद्घाटक: सर्व साधू-संत व माय-माऊली आयोजक: श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, सकल हिंदू समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी कालिंका गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा 🚩 जय श्रीराम! 🚩 वाढोणा येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन! आकर्षक झांक्या, भजन आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की उपस्थित रहा. #RamNavami #HanumanJayanti #JaiShriRam #Wadhona #Himayatnagar Nanded ReligiousEvent Maharashtra Trending Bhakti

- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Today One Live1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप5
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1