नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उमरी (खु.) येथील सुपुत्र आणि माध्यमिक विद्यालय कोळी येथील शिक्षक नानाराव कल्याणकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापुर्ती गौरव सोहळ्यात त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. श्री शिवाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय कोळी यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दशकांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य चोखपणे पार पाडणाऱ्या कल्याणकर यांच्या या कार्याबद्दल याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही कल्याणकर यांचे योगदान दैदिप्यमान राहिले आहे. मराठा सेवा संघाच्या परिवर्तनवादी, वैज्ञानिक आणि वास्तववादी विचारधारेवर चालत त्यांनी नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सातत्याने कार्य केले. त्यांनी मराठा सेवा संघाच्या केडर कॅम्प आयोजनासाठी पुढाकार घेऊन पूर्णवेळ कार्यकर्ते घडवण्यात मोलाचे योगदान दिले. जिजाऊ जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव, रायगड शिवराज्याभिषेक सोहळा, शिव-शाहू यात्रा, मराठा आरक्षण संघर्ष परिषद, जिजाऊ रथयात्रा, मराठा जोडो अभियान आणि किसान-जवान सन्मान सोहळा अशा अनेक उपक्रमांमध्ये शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी दिलेले अमूल्य योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. ते युगनायक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कल्पनेतील एक सच्चे कार्यकर्ते म्हणून सिद्ध झाले आहेत. मुख्याध्यापक गंगाधरराव आणि निलाबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या नानाराव कल्याणकर यांनी कठीण परिश्रमाने आदर्श शिक्षक म्हणून ओळख मिळवली. त्यांनी आपल्या सर्व भावंडांना शिक्षित करून नोकरी व व्यवसायासाठी प्रेरित केले तसेच एकत्रित कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. त्यांच्या या प्रवासात पत्नी शिवमती सुनिताताई यांची खंबीर साथ लाभली, ज्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये सक्रिय आहेत. त्यांची मुलगी डॉ. अनुजा (फिजिओथेरेपिस्ट), अपूर्वा (एमबीए) आणि मुलगा डॉ. अनिकेत (बीएचएमएस) हे देखील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. 'नानाराव कल्याणकर कॅन रिटायर्ड बट कॅन नेव्हर टायर्ड' हा विश्वास सार्थ ठरवत ते सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ समाजकार्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त करताना, हा गौरव सोहळा त्यांच्या प्रवाही आणि सदैव कार्यरत राहण्याच्या जिद्दीची साक्ष देणारा ठरला आहे. या मानपत्राचे शब्दांकन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मास्टर कोच इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उमरी (खु.) येथील सुपुत्र आणि माध्यमिक विद्यालय कोळी येथील शिक्षक नानाराव कल्याणकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापुर्ती गौरव सोहळ्यात त्यांना अत्यंत सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. श्री शिवाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालय कोळी यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दशकांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य चोखपणे पार पाडणाऱ्या कल्याणकर यांच्या या कार्याबद्दल याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही कल्याणकर यांचे योगदान दैदिप्यमान
राहिले आहे. मराठा सेवा संघाच्या परिवर्तनवादी, वैज्ञानिक आणि वास्तववादी विचारधारेवर चालत त्यांनी नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सातत्याने कार्य केले. त्यांनी मराठा सेवा संघाच्या केडर कॅम्प आयोजनासाठी पुढाकार घेऊन पूर्णवेळ कार्यकर्ते घडवण्यात मोलाचे योगदान दिले. जिजाऊ जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव, रायगड शिवराज्याभिषेक सोहळा, शिव-शाहू यात्रा, मराठा आरक्षण संघर्ष परिषद, जिजाऊ रथयात्रा, मराठा जोडो अभियान आणि किसान-जवान सन्मान सोहळा अशा अनेक उपक्रमांमध्ये शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी दिलेले अमूल्य योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी
ठरले आहे. ते युगनायक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कल्पनेतील एक सच्चे कार्यकर्ते म्हणून सिद्ध झाले आहेत. मुख्याध्यापक गंगाधरराव आणि निलाबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या नानाराव कल्याणकर यांनी कठीण परिश्रमाने आदर्श शिक्षक म्हणून ओळख मिळवली. त्यांनी आपल्या सर्व भावंडांना शिक्षित करून नोकरी व व्यवसायासाठी प्रेरित केले तसेच एकत्रित कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. त्यांच्या या प्रवासात पत्नी शिवमती सुनिताताई यांची खंबीर साथ लाभली, ज्या जिजाऊ ब्रिगेडमध्ये सक्रिय आहेत. त्यांची मुलगी डॉ. अनुजा (फिजिओथेरेपिस्ट), अपूर्वा (एमबीए)
आणि मुलगा डॉ. अनिकेत (बीएचएमएस) हे देखील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. 'नानाराव कल्याणकर कॅन रिटायर्ड बट कॅन नेव्हर टायर्ड' हा विश्वास सार्थ ठरवत ते सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ समाजकार्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त करताना, हा गौरव सोहळा त्यांच्या प्रवाही आणि सदैव कार्यरत राहण्याच्या जिद्दीची साक्ष देणारा ठरला आहे. या मानपत्राचे शब्दांकन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मास्टर कोच इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी केले आहे.
- नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.1
- नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.1
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.1
- हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.1
- हिंगोलीच्या सेनगाव येथे काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन वाढवण्याबाबत यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सेनगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.2
- नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी नाल्यावरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये पुलाच्या कॉलममधील काँक्रीट हाताने आणि दगडाने सहज निघत असल्याचा दावा केला गेला आहे. यामुळे पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय बळावला आहे. या निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अभियंते आणि ठेकेदारांमध्ये कथित संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या पुलाच्या कामात सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय झाला असून भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नागरिकांनी पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक (Quality Audit) चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि पुलाच्या सुरक्षिततेची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे. जनतेच्या पैशातून उभारलेले पूल सुरक्षित आहेत का, की निकृष्ट कामामुळे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.1