logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, ३० मे २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली पार्क, संत तुकडोजी वार्ड येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये धाड टाकण्यात आली. या धाडीदरम्यान, निखील मनोजराव रामनवार (२५), पियुष राजु मुसळे (२७), जय वसंतराव चुटे (२१) आणि कार्तिक वसंतराव हमंद (२९) हे चार आरोपी घटनास्थळी हजर मिळाले. त्यांच्या अंगझडतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली नगदी रक्कम, मोबाईल आणि एक टी.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड (क्र. एम.एच. ३२ बी.ए. १४९४) आढळली. विशेष म्हणजे, आरोपी पियुष मुसळे हा वर्धा जिल्ह्यातून हद्दपार केलेला असतानाही तो मनाईक क्षेत्रात उपस्थित होता, ज्यामुळे त्याने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केले. चौकशीत निष्पन्न झाले की, घटनास्थळी जप्त केलेला अंमली पदार्थ चारही आरोपींच्या मालकीचा असून, त्यांनी तो नागपूर येथील पंकज साठोणे याच्याकडून खरेदी केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५४ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स), ३२,००० रुपये नगद, ०६ मोबाईल आणि ०१ मोपेडसह एकूण ४,७१,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या पाचही आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या पथकाने पार पाडली.

3 hrs ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
3 hrs ago
486d04cc-a706-4890-85f3-9b8bad363080

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, ३० मे २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली पार्क, संत तुकडोजी वार्ड येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये धाड टाकण्यात आली. या धाडीदरम्यान, निखील मनोजराव रामनवार (२५), पियुष राजु मुसळे (२७), जय वसंतराव चुटे (२१) आणि कार्तिक वसंतराव हमंद (२९) हे चार आरोपी घटनास्थळी हजर मिळाले. त्यांच्या अंगझडतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ, अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली नगदी रक्कम, मोबाईल आणि एक टी.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड (क्र. एम.एच. ३२ बी.ए. १४९४) आढळली. विशेष म्हणजे, आरोपी पियुष मुसळे हा वर्धा जिल्ह्यातून हद्दपार केलेला असतानाही तो मनाईक क्षेत्रात उपस्थित होता, ज्यामुळे त्याने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केले. चौकशीत निष्पन्न झाले की, घटनास्थळी जप्त केलेला अंमली पदार्थ चारही आरोपींच्या मालकीचा असून, त्यांनी तो नागपूर येथील पंकज साठोणे याच्याकडून खरेदी केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५४ ग्रॅम ०५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ड्रग्स), ३२,००० रुपये नगद, ०६ मोबाईल आणि ०१ मोपेडसह एकूण ४,७१,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या पाचही आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या पथकाने पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    1
    नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • उन्हाळ्यात रक्तातील साखर का वाढते यामागील खरे सत्य जाणून घेण्यासोबतच, डॉ. मेहर अब्बास प्रत्येक आरोग्य समस्येवर योग्य आणि सुरक्षित उपाय देत आहेत. आजच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण निरोगी जीवनाची सुरुवात योग्य सल्ल्याने होते. डॉ. मेहर अब्बास हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाच्या (दमा आणि टीबी) समस्यांवर समाधान प्रदान करतात. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    उन्हाळ्यात रक्तातील साखर का वाढते यामागील खरे सत्य जाणून घेण्यासोबतच, डॉ. मेहर अब्बास प्रत्येक आरोग्य समस्येवर योग्य आणि सुरक्षित उपाय देत आहेत. आजच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण निरोगी जीवनाची सुरुवात योग्य सल्ल्याने होते.

डॉ. मेहर अब्बास हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार आणि फुफ्फुसाच्या (दमा आणि टीबी) समस्यांवर समाधान प्रदान करतात. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    12 hrs ago
  • ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी तक्रार निवारण दिनानिमित्त दत्तापूर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. अधीक्षकांनी पोलीस ठाण्याची सविस्तर पाहणी करत अधिकारी, अमलदार व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी त्यांनी संयमाने ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या तत्काळ निराकरणाच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त, काही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते पूर्णपणे बंद ठेवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी उपस्थितांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्तापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अमलदार व कर्मचारी उपस्थित होते. या तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली मते व समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
    1
    ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी तक्रार निवारण दिनानिमित्त दत्तापूर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या.

अधीक्षकांनी पोलीस ठाण्याची सविस्तर पाहणी करत अधिकारी, अमलदार व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी त्यांनी संयमाने ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या तत्काळ निराकरणाच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त, काही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात आले. त्यांनी शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते पूर्णपणे बंद ठेवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी उपस्थितांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आगमनावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास दत्तापूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अमलदार व कर्मचारी उपस्थित होते. या तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली मते व समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    11 hrs ago
  • वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबद्दल माहिती देण्यात आली आहे.
    1
    वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबद्दल माहिती देण्यात आली आहे.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) जनसंचार विभागात आधुनिक मीडिया शिक्षणाला एक नवीन दिशा मिळत आहे. डॉ. धर्मेश धावणकर यांच्या विशेष मुलाखतीद्वारे या नव्या अभ्यासक्रमाविषयीची सविस्तर माहिती समोर आली आहे.
    1
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) जनसंचार विभागात आधुनिक मीडिया शिक्षणाला एक नवीन दिशा मिळत आहे. डॉ. धर्मेश धावणकर यांच्या विशेष मुलाखतीद्वारे या नव्या अभ्यासक्रमाविषयीची सविस्तर माहिती समोर आली आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अखिल भारतीय अधिवक्ता संघटनांच्या उपाध्यक्षा आपल्या अधिवक्ता समाजाच्या अधिकारांसाठी सुरू असलेल्या लढ्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
    1
    अखिल भारतीय अधिवक्ता संघटनांच्या उपाध्यक्षा आपल्या अधिवक्ता समाजाच्या अधिकारांसाठी सुरू असलेल्या लढ्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात 50 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, क्षेत्रातील प्रमुख जनसमस्या, मूलभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा-कौसा येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक मागण्या प्रमुखतेने मांडल्या.
    1
    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात 50 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विविध विकास कामांना गती देण्यासाठी विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, क्षेत्रातील प्रमुख जनसमस्या, मूलभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. अश्रफ शानू पठाण यांनी मुंब्रा-कौसा येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक मागण्या प्रमुखतेने मांडल्या.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील आग्रा येथे किरकोळ शाब्दिक वाद आणि शिवीगाळातून सुरू झालेल्या एका वादाचे रूपांतर अचानक हिंसक संघर्षात झाले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठी-दंडुकेने हल्ला केला, ज्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
    1
    उत्तर प्रदेशातील आग्रा येथे किरकोळ शाब्दिक वाद आणि शिवीगाळातून सुरू झालेल्या एका वादाचे रूपांतर अचानक हिंसक संघर्षात झाले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठी-दंडुकेने हल्ला केला, ज्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.