logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान धरणगाव : शहरातील कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकजवळ आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी सुरू करून पत्रकारितेचा पाया रचला, यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकारितेच्या आद्य प्रेरणेला अभिवादन केले. प्रास्ताविक पत्रकार विनोद रोकडे यांनी केले. पत्रकारितेचे सामाजिक भान, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका व सत्यनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. आर. पाटील सर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारांनी निर्भीड, निष्पक्ष व समाजहिताचे लेखन तसेच पत्रकारितेच्या मूल्यांचा जागर करण्याची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले. यावेळी सत्यशोधक समाज संघाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना २०२६ सालची ‘सत्यशोधक दिनदर्शिका’ भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. या उपक्रमाबद्दल पत्रकार बांधवांनी समाधान व्यक्त करत सत्यशोधक समाज संघाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला धरणगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार डी. एस. पाटील सर, बी. आर. महाजन, राजेंद्र वाघ, जितेंद्र महाजन, पी. डी. पाटील, भगीरथ माळी, धर्मराज मोरे, विनोद रोकडे, राजेंद्र रडे, सतीश बोरसे, निलेश पवार, सतीश शिंदे, ॲड. व्ही एस भोलाणे, विकास पाटील यांच्यासह शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, जानकीराम पाटील, माजी नगरसेवक भागवत चौधरी, जितू धनगर, हेमंत माळी, गोरख देशमुख, गजानन महाजन, जिभाऊ पाटील, आदी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. *▪️फोटो कॅप्शन* पत्रकार दिनानिमित्त सत्यशोधक समाज संघातर्फे शहरातील सर्व पत्रकारांना सत्यशोधक दिनदर्शिका भेट देताना मान्यवर पदाधिकारी व उपस्थित पत्रकार बांधव.

1 day ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
1 day ago
5014be4a-f5e5-4e9b-9194-d284bcd4fcf1

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री संत तुकाराम महाराज ‌आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले...
    1
    श्री संत तुकाराम महाराज ‌आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले...
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    16 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ALIVE Eye.On महाराष्ट्र महाराष्ट्र के औरंगाबाद शहर में AIMIM नेता पुर्व सांसद "इम्तियाज जलील" की कार पर हमला, हमले के समय "इम्तियाज जलील" कार में मौजूद थे. AIMIM leader and former MP Imtiaz Jalil's car was attacked in Aurangabad, Maharashtra. FOLLOW @eye.on.maharashtra #ImtiazJalil #maharashtra #news #socialmedia #aimim #breakingnews #eyeonmaharashtra #socialmedia #hindinews : Video: Social Media Eye.On महाराष्ट्र
    1
    ALIVE Eye.On महाराष्ट्र
महाराष्ट्र के औरंगाबाद शहर में AIMIM नेता पुर्व सांसद "इम्तियाज जलील" की कार पर हमला,
हमले के समय "इम्तियाज जलील" कार में मौजूद थे.
AIMIM leader and former MP Imtiaz Jalil's car was attacked in Aurangabad, Maharashtra.
FOLLOW
@eye.on.maharashtra
#ImtiazJalil
#maharashtra
#news
#socialmedia
#aimim
#breakingnews
#eyeonmaharashtra
#socialmedia
#hindinews
:
Video: Social Media
Eye.On महाराष्ट्र
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by Rajubhau Pradhan
    1
    Post by Rajubhau Pradhan
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आज 07/01/2026 छत्रपती संभाजीनगरमधील किलेअर्क भागात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला शहरातील भागात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही संतप्त तरुणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सुदैवाने जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या घराकडे जात असताना किलेअर्क परिसरात जमा झालेल्या आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक आणि जलील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले. संतप्त तरुणांनी जलील यांच्या गाडीवर दगड भिरकावले आणि त्यांच्या ताफ्याला घेरण्याचा प्रयत्न केला. ​वादाचे मुख्य कारण: उमेदवारी अर्जावरून पेच ​या राड्यामागे आगामी निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून असलेला वाद असल्याचे समोर येत आहे. ​विशिष्ट मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती. ​काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी जलील यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत थेट त्यांच्या गाडीवरच संताप व्यक्त केला. ​ अशी प्रतिक्रिया जलील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. ​पोलिस बंदोबस्तात वाढ ​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. किलेअर्क भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण हिंसा करणे चुकीचे आहे..
    1
    आज 07/01/2026
छत्रपती संभाजीनगरमधील किलेअर्क भागात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला  झालेला
शहरातील भागात मंगळवारी  मोठी खळबळ उडाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही संतप्त तरुणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सुदैवाने जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या घराकडे जात असताना किलेअर्क परिसरात जमा झालेल्या आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक आणि जलील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले. संतप्त तरुणांनी जलील यांच्या गाडीवर दगड भिरकावले आणि त्यांच्या ताफ्याला घेरण्याचा प्रयत्न केला.
​वादाचे मुख्य कारण: उमेदवारी अर्जावरून पेच
​या राड्यामागे आगामी निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून असलेला वाद असल्याचे समोर येत आहे.
​विशिष्ट मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती.
​काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी जलील यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत थेट त्यांच्या गाडीवरच संताप व्यक्त केला.
​  अशी प्रतिक्रिया  जलील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे.
​पोलिस बंदोबस्तात वाढ
​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. किलेअर्क भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण हिंसा करणे चुकीचे आहे..
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले
    1
    मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.
    1
    हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.