Shuru
Apke Nagar Ki App…
वेलरात मारबत रॅली कुही- पोळ्याच्या पाडव्याला वेलतूर येथे उपसरपंच सुनिल कींदर्ले व मित्र परिवाराने गावातील इडा, पिडा व रोगराई घालविण्यासाठी मार्फत रॅली काढून पोळ्याच्या पाळव्याचा आनंद लुटला. रॅली तर गावातील तरूण तरूणी व अबालवृद्ध सहभागी झाले होते.
SS
Sharad shahare
वेलरात मारबत रॅली कुही- पोळ्याच्या पाडव्याला वेलतूर येथे उपसरपंच सुनिल कींदर्ले व मित्र परिवाराने गावातील इडा, पिडा व रोगराई घालविण्यासाठी मार्फत रॅली काढून पोळ्याच्या पाळव्याचा आनंद लुटला. रॅली तर गावातील तरूण तरूणी व अबालवृद्ध सहभागी झाले होते.
More news from Nagpur and nearby areas
- वेलतूर सरपंच सुशिल रामटेक यांनी केले ले शेतकरी बांधवांना पुरस्कृत कुही- वेलतूर सरपंच सुशिल रामटेक यांनी शेतकरी बांधवांना पोळ्याच्या तोरणात पुरस्कृत करत कृषी संस्कृतीचा सन्मान केला त्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वर्षभर शेतामध्ये राबणारा बैल ,शेतकरी, त्याचा सख्खा, जीवनसाथी, जिवलग मित्र असल्याचे सांगून देशाचा कणा, आधारस्तंभ, जगाचा पोशिंदा, श्रम करनाऱ्या श्रमिक संस्कृतीचा, शेतकरी, कष्टकरी जनते प्रती कृतज्ञतेचा महा कृषि महोत्सव, बळीराजाचा भव्य आणि दिव्य मोठा उत्सव म्हणजे "पोळा" असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या निमित्त सुशिल रामटेके ,सरपंच ग्रामपंचायत वेलतुर तथा मित्र परिवार यांच्या कडून पाच बक्षीस देण्यात आले. हे सर्व ईश्वर चिट्टी टाकून दिले पहिले बक्षीस मोहन पराते याला ड्रेसिंग प्रधान करून पुरस्कृत करण्यात आले, दुसरा श् गुरूजी आजबले यांना प्लास्टिक कुलर, तिसरा श्यामराव खोब्रागडे यांना लोखंडी कुलर, चौथा संदीप तितरमारे यांना टेबल पंखा, पाचवा विनायक खोब्रागडे पाणी क्यान. तसेच सर्व शेतकरी बांधवांना यांना टोपी व दुपट्टे वेलतूर व बोथली येथे वितरण कऱण्यात आले.1
- बैल पोळा उत्सव उमरेड ...1
- आईसी 814 : अनुभव सिन्हा की नेटफ्लिक्स सीरीज़ पर विवाद क्यों? #thesankshep #netflixseries #IC814 #AnubhavSinha #IC814TheKandaharhijack #BoycottNetflix #BoycottBollywood #hindu #BoycottIC814 #AmitMalviya #morningnews #explainer #netflixindia #IC814TheKandaharHijack1
- पोळ्यात सुनिल कींदर्ले नी केला शेतकरी बांधवांचा सत्कार कुही- कृषी संस्कृतीच्या महत्वाच्या पोळा सणानिमित्त वेलतूर ग्राम पंचायत उपसरपंच सुनिल कींदर्ले यांनी शेतकरी बांधवांना सन्मानीत करत त्यांना भेटवस्तू देऊन बैल जोड्या चे पुजा केले.1
- कुहीत पोळा उत्साहात शिवसेनेच्या खुशाल लांजेवार यांनी केले शेतकरी बांधवांना सन्मानीत कुही- कुहीत पोळा उत्साहात साजरा करण्यात आला असून शिवसेनेच्या खुशाल लांजेवार यांनी केले शेतकरी बांधवांना सन्मानीत करत अनेक भेट वस्तूचे वितरण केले. कुही नगरपंचायत भवनाच्या आवारात भरलेल्या पोळ्यात गावकरी व शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.1
- वेलरात मारबत रॅली कुही- पोळ्याच्या पाडव्याला वेलतूर येथे उपसरपंच सुनिल कींदर्ले व मित्र परिवाराने गावातील इडा, पिडा व रोगराई घालविण्यासाठी मार्फत रॅली काढून पोळ्याच्या पाळव्याचा आनंद लुटला. रॅली तर गावातील तरूण तरूणी व अबालवृद्ध सहभागी झाले होते.1
- आज तान्हा पोळा तान्हया पोळ्याला 235 वर्षे पूर्ण नागपूरात सर्वात मोठा लाकडी बैल. कुही- आज तान्हा पोळा. बैल पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची भोंसले कालीन परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा ) पोळ्यास 235 वर्ष पूर्ण होत आहेत. हिंदुस्थान हा कृषी प्रधान देश असून देशात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. *विदर्भ* वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. *सन 1789* मध्ये दुसरे *श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय)* यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून *लाकडी बैल (तान्हा ) पोळ्याची* सुरुवात केली. *श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय)* यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैला प्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकी चे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या *प्रथेला 235 वर्षे* पूर्ण होत आहे. *राजे मुधोजी महाराज भोंसले* यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. *राजे मुधोजी महाराज भोंसले* यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. *मुधोजीराजे* चे निवासस्थान *सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर* येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची *उंची आठ फूट लांबी सहा फूट* असून या बैलांच्या पायात *चांदीचा तोडा* घातला आहे. ज्या पद्धतीने *श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय)* वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघाली. 235 वर्षानंतर आजही सुद्धा ही प्रथा *राजे मुधोजी महाराज भोंसले* यांनी नियमीत ठेवली व यापुढेही सुद्धा ही प्रथा चालू राहील असे मत महाराजांनी व्यक्त केलेले आहे.1
- कुही चा बैल पोळा ||😃😃||1