संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त भव्य ढोल,डीजे रॅली मानोरा (प्रतिनिधी):शहरात मागील १५ वर्षांपासून संत सेवालाल महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला जय सेवालाल च्या जयघोषात भव्य पालखी, पताका व तोळाराम घोड्याची स्वारी तसेच ढोल,डीजेच्या गजरात रॅली काढण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महंत संजय महाराज व भक्तराज महाराज यांच्या हस्ते जळभोग अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रॅलीला सुरुवात झाली. डफडा व डीजेच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त नृत्य सादर करत वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण केले. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, झेंडा चौक, तहसील मार्गे नाईक नगर येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथे पोहोचली. मंदिर स्थळी भोग भंडारा आयोजित करण्यात आला. भोग भंडार कार्यक्रमात महंत संजय महाराज यांच्या हस्ते आरदास करण्यात आली. यावेळी संजय महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संत सेवालाल महाराजांनी दाखविलेल्या सत्य, सेवा व समाजहिताच्या मार्गावर विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सेवा निवृत्त तलाठी अरुण राठोड, आशिष राठोड,वसंतराव राठोड, नितीन राठोड, शाम राठोड, विशाल राठोड, अभिजीत राठोड, उमेश चव्हाण, सावन राठोड, यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. मानोरा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा जयंती उत्सव यंदाही भक्तिभाव आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून गेला.
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त भव्य ढोल,डीजे रॅली मानोरा (प्रतिनिधी):शहरात मागील १५ वर्षांपासून संत सेवालाल महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला जय सेवालाल च्या जयघोषात भव्य पालखी, पताका व तोळाराम घोड्याची स्वारी तसेच ढोल,डीजेच्या गजरात रॅली काढण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सेवालाल महाराज चौकात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महंत संजय महाराज व भक्तराज महाराज यांच्या हस्ते जळभोग अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रॅलीला सुरुवात झाली. डफडा व डीजेच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त नृत्य सादर करत वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण केले. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, झेंडा चौक, तहसील मार्गे नाईक
नगर येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथे पोहोचली. मंदिर स्थळी भोग भंडारा आयोजित करण्यात आला. भोग भंडार कार्यक्रमात महंत संजय महाराज यांच्या हस्ते आरदास करण्यात आली. यावेळी संजय महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संत सेवालाल महाराजांनी दाखविलेल्या सत्य, सेवा व समाजहिताच्या मार्गावर विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास सेवा निवृत्त तलाठी अरुण राठोड, आशिष राठोड,वसंतराव राठोड, नितीन राठोड, शाम राठोड, विशाल राठोड, अभिजीत राठोड, उमेश चव्हाण, सावन राठोड, यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. मानोरा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा जयंती उत्सव यंदाही भक्तिभाव आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून गेला.
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला उशिरा रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक संघटनाणी रात्री ७. ३० वाजता निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.2
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱 तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते! 🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते. 🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. 🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. ✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी! यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेव! 🔱 #श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia1
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1
- श्री चाफेश्वर भगवान पालखी नगर प्रदक्षिणा संपन्न! ................................................... ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड येथे, महाशिवरात्रीचे पावन पर्वावर, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी, सायंकाळी 4 वा. येथील जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली असून, या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती भक्ती गीत म्हणत, आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. ज्ञानेश्वर थोरात यांनी, पालखीतील भक्तांकरिता, पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री आप्पास्वामी मंदिरा पासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून, आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिव शंकराची महाआरती केल्यानंतर, पालखीची सांगता करण्यात आली.1