सोमेश्वर नगर येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानाचा शुभारंभ! मानोरा :-- तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे दि. २० एप्रिल रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान खरीप २०२६चा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तंत्रज्ञान समन्वयक नागेश ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी आर. डी. हाके यांनी शेतकऱ्यांना बेड तयार करण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे तसेच बेडवर टोकन पद्धतीने लागवड कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यासोबतच शून्य मशागत पद्धत व अंतरपीक पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते. मृदा संवर्धन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांची जोखीम कमी करण्यासाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध शेतीविषयक प्रश्न विचारले असता मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. या वेळी गावातील शेतकरी रामराव जाधव, बंटी चव्हाण,गोकुळ चव्हाण,उत्तम आडे,भिलोषश्वर राठोड,बळीराम जाधव, नंदू आडे, संजय मदन जाधव, अरविंद गणपत जाधव, संतोष जाधव, डीलर अशोक जाधव,यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी ताई तसेच समूह सहाय्यक प्रफुल राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सोमेश्वर नगर येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानाचा शुभारंभ! मानोरा :-- तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे दि. २० एप्रिल रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान खरीप २०२६चा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, तंत्रज्ञान समन्वयक नागेश ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी आर. डी. हाके यांनी शेतकऱ्यांना बेड तयार करण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे तसेच बेडवर टोकन पद्धतीने लागवड कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यासोबतच शून्य मशागत पद्धत व अंतरपीक पद्धतीबाबत सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तज्ञ अधिकाऱ्यांनी
सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते. मृदा संवर्धन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांची जोखीम कमी करण्यासाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध शेतीविषयक प्रश्न विचारले असता मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. या वेळी गावातील शेतकरी रामराव जाधव, बंटी चव्हाण,गोकुळ चव्हाण,उत्तम आडे,भिलोषश्वर राठोड,बळीराम जाधव, नंदू आडे, संजय मदन जाधव, अरविंद गणपत जाधव, संतोष जाधव, डीलर अशोक जाधव,यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी ताई तसेच समूह सहाय्यक प्रफुल राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Ahem Raza1
- Post by M B B1
- Post by Sk Chand1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Sharad Dayedar1