logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लोहारी खुर्द येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न अकोट तालुका प्रतिनिधी... नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, अकोट पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा लोहारी खुर्द येथे ‘शाळा पूर्व तयारी मेळावा’ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. आगामी काळात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्ये जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश वानखडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुमेधा डोबाळे, समर्थ पाखरे, मुख्याध्यापक नितीन धोरण, वानखडे भाऊ, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांनी फित कापत रितसर उद्घाटन केले. याप्रसंगी सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या आवारात विविध स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाची पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नोंदणी व स्वागत, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक- भावनिक विकास, भाषा विकास, गणितपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन आदी विविध विकास स्टॉल्स लावण्यात आले. याप्रसंगी दाखल पात्र मुलांची उंची-वजन मोजणे, रंग ओळख, अंक ओळख, चित्रकला आणि स्नायूंचा विकास तपासण्यासाठी विविध खेळ आयोजित केले होते. मुलांना शाळेत येण्यासाठी कसे प्रवृत्त करावे आणि घरी त्यांचा सराव कसा घ्यावा, याबाबत शिक्षकांनी पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. ​शालेय परिसर रांगोळी, फुगे, सेल्फी पॉईंट व रंगीबेरंगी साहित्याने सजवण्यात आला होता. "मुलांच्या शिक्षणाची पहिली पायरी आनंदी असावी, या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला." असे मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी सांगितले. मेळाव्याच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते मुख्याध्यापक नितीन धोरण, सोनाली उज्जैनकर, सोनाली निचळ, रुपाली ढवळे भुगिंगराव इंगळे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये शाळेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

1 day ago
user_राजकुमार वानखडे
राजकुमार वानखडे
News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
1 day ago
9a1a139f-e0b5-49bf-beda-6925c1eeff05

लोहारी खुर्द येथे शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न अकोट तालुका प्रतिनिधी... नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, अकोट पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा लोहारी खुर्द येथे ‘शाळा पूर्व तयारी मेळावा’ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. आगामी काळात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या दाखल पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्ये जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश वानखडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुमेधा डोबाळे, समर्थ पाखरे, मुख्याध्यापक नितीन धोरण, वानखडे भाऊ, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते. ​कार्यक्रमाची सुरुवात

9dd22dca-a05c-4d9b-bea7-b1cfcec05623

मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांनी फित कापत रितसर उद्घाटन केले. याप्रसंगी सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या आवारात विविध स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाची पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नोंदणी व स्वागत, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक- भावनिक विकास, भाषा विकास, गणितपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन आदी विविध विकास स्टॉल्स लावण्यात आले. याप्रसंगी दाखल पात्र मुलांची उंची-वजन मोजणे, रंग ओळख, अंक ओळख, चित्रकला आणि स्नायूंचा विकास तपासण्यासाठी विविध खेळ आयोजित केले होते. मुलांना शाळेत येण्यासाठी

b1d313c3-7584-48ab-a75b-49e017679da1

कसे प्रवृत्त करावे आणि घरी त्यांचा सराव कसा घ्यावा, याबाबत शिक्षकांनी पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. ​शालेय परिसर रांगोळी, फुगे, सेल्फी पॉईंट व रंगीबेरंगी साहित्याने सजवण्यात आला होता. "मुलांच्या शिक्षणाची पहिली पायरी आनंदी असावी, या उद्देशाने हा मेळावा घेण्यात आला." असे मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी सांगितले. मेळाव्याच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते मुख्याध्यापक नितीन धोरण, सोनाली उज्जैनकर, सोनाली निचळ, रुपाली ढवळे भुगिंगराव इंगळे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये शाळेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

  • user_User3166
    User3166
    Akot, Akola
    🙏
    8 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा
    1
    कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by विदर्भ शासन न्यूज..
    1
    Post by विदर्भ शासन न्यूज..
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!
    1
    मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    1
    जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    5 hrs ago
  • ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे.  ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sachin Ganeshrao patil
    3
    Post by Sachin Ganeshrao patil
    user_Sachin Ganeshrao patil
    Sachin Ganeshrao patil
    Amravati, Maharashtra•
    5 hrs ago
  • महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    3
    महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.