दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (लेखन प्रेरणा दिन) तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (लेखन प्रेरणा दिन) तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ इंग्रजी आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती' (लेखन प्रेरणा दिन) आणि 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ हे उपस्थित होते. याप्रसंगी विचारपीठावर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, उपप्राचार्य पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.पाटील म्हणाले की, 'दलित, वंचित आणि कामगार वर्गाच्या व्यथांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे अण्णाभाऊ साठे हे आयुष्यभर श्रमिकांच्या हक्कासाठी लढत राहिले'. यावेळी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचावे असा संदेश आपल्या प्रास्ताविकातून दिला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी कावेरी चौधरी, सेजल चौधरी, अर्पिता भार्गव, सियोन सपकाळे, भोमेश सोनार, श्रीकुमार, सायली कुंभार, भाग्यश्री कोळी, नेहा बाविस्कर, वैशाली कुंभार या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आपल्या मनोगतातून भाष्य केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व पेन देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ म्हणाले की, "लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' असा मंत्र देऊन देशवासियांमध्ये राष्ट्रपेम आणि अस्मिता जागृत केली, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित वर्गाच्या वेदनांना वाचा फोडून त्यांना संघटित केले. या दोन्ही महान विभूतींचे कार्य, विचार आणि सामाजिक योगदान आजही समाज व तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे." या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.डी.शिंदे व महिमा चौधरी यांनी केले तर आभार मानसी धनगर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ विभागाचे श्री. व्ही. डी. शिंदे , श्री. भूषण बिरारी, श्री.निवृत्ती पाटील तसेच वरिष्ठ विभागातून डॉ.एम.एल.भुसारे डॉ.डी.पी.सपकाळे, श्री. वाय.एन.पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक बंधू- भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (लेखन प्रेरणा दिन) तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (लेखन प्रेरणा दिन) तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ इंग्रजी आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती' (लेखन प्रेरणा दिन) आणि 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ हे उपस्थित होते. याप्रसंगी विचारपीठावर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, उपप्राचार्य पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक ए.एन.बोरसे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.डी.एस.पाटील म्हणाले की, 'दलित, वंचित आणि कामगार वर्गाच्या व्यथांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे अण्णाभाऊ साठे हे आयुष्यभर श्रमिकांच्या हक्कासाठी लढत राहिले'. यावेळी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचावे असा संदेश आपल्या प्रास्ताविकातून दिला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी कावेरी चौधरी, सेजल चौधरी, अर्पिता भार्गव,
सियोन सपकाळे, भोमेश सोनार, श्रीकुमार, सायली कुंभार, भाग्यश्री कोळी, नेहा बाविस्कर, वैशाली कुंभार या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आपल्या मनोगतातून भाष्य केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व पेन देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.सपकाळ म्हणाले की, "लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' असा मंत्र देऊन देशवासियांमध्ये राष्ट्रपेम आणि अस्मिता जागृत केली, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित वर्गाच्या वेदनांना वाचा फोडून त्यांना संघटित केले. या दोन्ही महान विभूतींचे कार्य, विचार आणि सामाजिक योगदान आजही समाज व तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे." या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.डी.शिंदे व महिमा चौधरी यांनी केले तर आभार मानसी धनगर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ विभागाचे श्री. व्ही. डी. शिंदे , श्री. भूषण बिरारी, श्री.निवृत्ती पाटील तसेच वरिष्ठ विभागातून डॉ.एम.एल.भुसारे डॉ.डी.पी.सपकाळे, श्री. वाय.एन.पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक बंधू- भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत..... वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.1
- फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा1
- varkhedi te pachora rod var aaisir cha apghat ghambhir jakhami1