logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याची खेळ रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार साहेबांच्या केबिनला लागून असलेल्या शौचालया शेजारी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे.तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या विविध तक्रारी आणि कामांसाठी दररोज तहसील कार्यालयात येत असतात. कार्यालयात जागा नसल्याने अनेक नागरिकांना बाहेर बसावे लागते, मात्र बाहेर बसल्यानंतर या घाणीचा आणि दुर्गंधीचा असह्य त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच ठिकाणी नागरिकांसाठी बसवण्यात आलेले आरओ पाणी फिल्टर देखील मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही.एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मग हा निधी जातो कुठे? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते गोपाल भिसडे यांनी उपस्थित केला आहे.शासकीय कार्यालयातच जर अशी दयनीय अवस्था असेल तर ही सर्वसामान्य नागरिकांची केलेली थट्टा आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ करावा, अशी निवेदना सह मागणी गोपाल भिसडे यांनी केली आहे.याकडे रिसोड तहसीलदार काय कार्यवाही करतात याकडे संबंध तालुक्याचे लक्ष वेधून आहे

11 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
11 hrs ago
76d481ce-a20b-4964-9755-d71495d79229

रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याची खेळ रिसोड तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाचे धिंडवडे निघाले आहेत. तहसीलदार साहेबांच्या केबिनला लागून असलेल्या शौचालया शेजारी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली

c250af51-9c14-4561-8ef1-ac85bceced70

आहे.तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या विविध तक्रारी आणि कामांसाठी दररोज तहसील कार्यालयात येत असतात. कार्यालयात जागा नसल्याने अनेक नागरिकांना बाहेर बसावे लागते, मात्र बाहेर बसल्यानंतर या घाणीचा आणि दुर्गंधीचा असह्य त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच ठिकाणी नागरिकांसाठी

d25768c8-de16-4634-837c-057b3b64afb8

बसवण्यात आलेले आरओ पाणी फिल्टर देखील मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही.एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मग हा निधी जातो कुठे? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते गोपाल भिसडे यांनी

f66fbdbc-f239-4cfe-b3b0-fee5e3e76cdd

उपस्थित केला आहे.शासकीय कार्यालयातच जर अशी दयनीय अवस्था असेल तर ही सर्वसामान्य नागरिकांची केलेली थट्टा आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ करावा, अशी निवेदना सह मागणी गोपाल भिसडे यांनी केली आहे.याकडे रिसोड तहसीलदार काय कार्यवाही करतात याकडे संबंध तालुक्याचे लक्ष वेधून आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    1
    धानोरा (जहाँगीर) येथे ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त  ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ७९ व्या दिनानिमित्त धानोरा (जहाँगीर) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ॲड.रवि शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
तसेच तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे चेअरमन बंडू कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
यावेळी उपसरपंच टोपाजी पोटे, सहशिक्षक भुरके,मगरे, यांच्या सह बाबुराव मस्के,मोतीराम मोरे, मुंजाजी बर्गे,सुभाष सरडे,निस्सारखॉं पठाण,भीमराव पाईकराव,विश्वनाथ जाधव, साहेबराव डोंगरे,कैलास सापनार, रमेश ढबाले,दिनकर पाईकराव,प्रदीप बरडे, सुभाष सापनार,मारोती कोरडे,नामदेव शिंदे ,प्रकाश भुजंगळे, सुहास मस्के,सलीम पठाण,कृष्णा पोटे,गौतम ढबाले, प्रमोद पाईकराव,फैजान पठाण, आकाश पाईकराव,प्रमोद डोंगरे, संदीप पाईकराव,समाधान पाईकराव,शुभम मुळे,हर्षद पाईकराव,अंगणवाडी कर्मचारी फमीदा बेगम,सौ.शोभा चिरमाडे, सौ.नाजुका डोंगरे,रोजगार सेवक सुनील पाईकराव, ग्रामपंचायत सेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच  विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट काँग्रेसच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे संदर्भात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांचे उत्पादन अत्यंत घटले असून शेतकरी व शेतमजूर गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने प्रशांत पाचडे, अनोख राहणे, सारंग मालाणी, बादल अहिर, विकास देशमुख ,संजय आठवले, यांच्या उपस्थितीत अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सदर निवेदनातील मागण्या संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने व संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक सहाय्य व रोजगार हमी योजनेंतर्गत अतिरिक्त कामे उपलब्ध करून द्यावीत.महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून वास्तविक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित सर्व घटकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर अफजल खान ,प्रमोद चोरे, पांडुरंग खवले, दिनेश ताडे, शिवदास मुऱ्हेकार, सय्यद कलीम, ओंकार टवलारे ,हैदर अली, महेंद्र पवार ,आजम खा पठाण ,केशव हेन्ड, सय्यद सोहेल अली, धनराज कहार, मोती तेजवानी ,रोशन चिंचोलकर, मिलिंद नितोने ,नुसरत अली, मिलिंद झाडे, अविनाश जायले, अचल बेलसरे, दशरथ खवले, राजु पंडित , अविनाश डिक्कर ,अफजल खान, शेख खाजा,अब्दुल जमिल अब्दुल खलिक, अब्दुल आबीद अब्दुल अहाब,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
    4
    अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण 
अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण 
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट काँग्रेसच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून  शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे संदर्भात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत  निवेदन देण्यात आले.                निवेदनात म्हटल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांचे उत्पादन अत्यंत घटले असून शेतकरी व शेतमजूर गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने प्रशांत पाचडे, अनोख राहणे, सारंग मालाणी, बादल अहिर, विकास देशमुख ,संजय आठवले, यांच्या उपस्थितीत अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
सदर निवेदनातील मागण्या 
संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.
सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने व संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक सहाय्य व रोजगार हमी योजनेंतर्गत अतिरिक्त कामे उपलब्ध करून द्यावीत.महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून वास्तविक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित सर्व घटकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर अफजल खान ,प्रमोद चोरे, पांडुरंग खवले, दिनेश ताडे, शिवदास मुऱ्हेकार, सय्यद कलीम, ओंकार टवलारे ,हैदर अली, महेंद्र पवार ,आजम खा पठाण ,केशव हेन्ड, सय्यद सोहेल अली, धनराज कहार, मोती तेजवानी ,रोशन चिंचोलकर, मिलिंद नितोने ,नुसरत अली, मिलिंद झाडे, अविनाश जायले, अचल बेलसरे, दशरथ खवले, राजु पंडित , अविनाश डिक्कर ,अफजल खान, शेख खाजा,अब्दुल जमिल अब्दुल खलिक, अब्दुल आबीद अब्दुल अहाब,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    1
    स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए 
SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    2
    देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन
या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    1
    इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    1
    वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान
पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट
मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
    user_Sachin Ingale
    Sachin Ingale
    Local News Reporter Chikhaldara, Amravati•
    29 min ago
  • अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    1
    अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.