अनुसूचित जाती उप वर्गीकरणाला माहूर तालुक्यात विरोध निवेदनावर मान्यवराच्या स्वाक्षऱ्या आरक्षण ही भीक नाही किंवा सरकारच्या मर्जीवरही अवलंबुन नाही.हजारो वर्ष वंचित राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संरक्षण आहे. आहवालावर आक्षेप मागवण्यासाठी शासनाने 30 एप्रिल ची मुदतवाढ केली असली तरी आहवाल जाहीर न करणे हे हास्यस्पद आहे.देशात सध्या जनगणना सुरु झाली असून ती पूर्ण झाल्यानंतरच तयार झालेला इंपेरिकल डाटा आधारे आणि लोकसंख्या आधारे संविधानिक मार्गाने आरक्षणा ची वर्गवारी करावी... सौ. नम्रता कीर्तने मा. सरपंच. प्रतिनिधी गणेश वाडेकर माहूरगड महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (sc)आरक्षणाचे उप वर्गीकरण करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या आहवालावर आणि आमलबजावणी च्या पद्धत्तीवर माहूर येथील विविध संघटना व जागरूक नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवाना उद्देशून लिहिलेले निवेदन माहूर तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्फत आज सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्या नुसार सर्वोच्य न्यायालयच्या आदेशानुसार राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षते खाली 2023 ला समिती स्थापन केली होती.या समितीने आपला आहवाल मार्च 2026 ला सादर केला आहे.मात्र या आहवलाची आमलबजावणी ज्या पद्धत्तीने व ज्या धोरणत्मक आधारावर केली जात आहे.ती अत्यंत चिंताजनक असल्याच निवेदनात म्हटलं आह. हे धोरण सामाजिक न्यायाच्या विरोधात असून त्यामुळे समाजात भेदभाव निर्माण होण्याची शक्यता आहे.असा गंभीर आरोप निवेदन करत्यानी केला आहे.जागरूक समाज करत्यानी केवळ उपवर्गिकरणा ला विरोध न दर्शवता, शासनापुढे काही महत्वपूर्ण मागण्या ठेवल्या आहेत.महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या मोजण्यासाठी स्वतंत्र आणि अचूक जातनिहाय जनगणना करण्यात यावी.आणि त्यानंतरच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे उपवर्गीकरण लक्षात घ्यावे. उपवर्गीकरण केवळ शिक्षण व नौकरी पुरते मर्यादित न ठेवता ते राजकीय प्रतिनिधित्व (विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज संस्था)आणि सर्व शासकीय योजनेत लागू करावे.उप वर्गिकरणाची आमलबजावणी करताना सर्व घटकांना न्याय मिळेल या साठी वेळापत्रक आणि कायदेशीर धोरण जाहीर करावे.तसेच या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष देखरेख यंत्रणा स्थापन करावी.या विषयावर शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही न केल्यास सामाजिक असंतोष तीव्र होईल आणि व्यापक जण आंदोलन उभे राहील.असा इशारा या निवेदणाद्वारे देण्यात आला.ऍड. छंदक दिगंबर वाठोरे,अमृत श्रीरंग जगताप,राजेश गोविंदराव मगरे,विशाल खरे,डॉ तथागत मनवर,प्रा महेंद्र पांडुरंग पट्टेकर आणि इतर मान्यवाराच्या स्वक्षऱ्यासह हे निवेदन शासनाला सोपवण्यात आले.

- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.1
- Post by Sharad Dayedar1
- वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.2
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1