logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नजिक पिंपरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा. मोहोळ :- नजिक पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी महिला मोठयासंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व महिलांची एम.पी. डब्ल्यू पथकामार्फत बीपी, शुगर, एचबीची तपासणी केली.कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवर प्रसिद्ध उद्योजिका संगीता नानी फाटे, डॉ. अश्विनी मोहिते, प्रांजली फाटे, सुरेखा पाटील, कावेरी पाटील, शोभा सलगर, लक्ष्मी वाघमोडे, वेणूताई वाघमोडे, पुष्पा काळे व सर्व महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर डॉ. अश्विनी मोहिते यांनी महिलांना आरोग्य विषयक सर्व माहिती सांगितली. संगीता फाटे यांनी महिलांनी धाडसी कसे बनावे, समाजात कसे वावरावे आणि स्वतःचे आरोग्य कसे जपावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले, या वेळी धर्मराज चवरे यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. यानंतर उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. दुपारच्या सत्रात महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, गोलातील मणी गोळा करणे आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला पैठणी साडी भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू म्हणून पाण्याची बॉटल देण्यात आली. सर्व महिलांनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिला दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन किरणकुमारी गायकवाड, हर्षला बनकर आणि रंजना चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कोल्हाळ सर, साठे सर, पोपळघट सर, गुरव सर,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, दत्ताभाऊ यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी पोखरापूर केंद्राचे केंद्रप्रमुख रुपेश क्षीरसागर सर यांचे सहकार्य लाभले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सलगर यांनी कार्यक्रमासाठी मंडप, उपाध्यक्ष शहाजी वाघमोडे, शिक्षणप्रेमी सुनिल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठल पाटील यांनी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्याने महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

2 hrs ago
user_गो.रा.  कुंभार
गो.रा. कुंभार
मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
6f044316-72be-4dc4-8e3f-255da7de48fe

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत
    1
    ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो.
---
**हेडलाईन :**
**बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव**
**सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज**
सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे.
भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे.
याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 min ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    1
    आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Dilip Surwase
    5
    Post by Dilip Surwase
    user_Dilip Surwase
    Dilip Surwase
    Local Politician उमरगा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू
लातूर | प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले.
दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    1
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dilip Surwase
    7
    Post by Dilip Surwase
    user_Dilip Surwase
    Dilip Surwase
    Local Politician उमरगा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.