Shuru
Apke Nagar Ki App…
बंबू लागवडीचे काम केले आहे बांबू लागवडीचे काम केले असताना मस्टराचे पैसे आतापर्यंत आले नाही याचे कारण काय योजना घेऊन फायदा काय मस्त चे पैसे येतात तरी पाच महिने चार महिने लागून जातात मग उपाशी पोटी मरणार का
पृथ्वीराज जेमा वळवी
बंबू लागवडीचे काम केले आहे बांबू लागवडीचे काम केले असताना मस्टराचे पैसे आतापर्यंत आले नाही याचे कारण काय योजना घेऊन फायदा काय मस्त चे पैसे येतात तरी पाच महिने चार महिने लागून जातात मग उपाशी पोटी मरणार का
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- Post by Harshal patil2
- काल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक नेत्रदीपक क्षण अनुभवायला मिळाला. वस्ताद कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील व त्यांचे चिरंजीव नगरसेवक सुमित दादा पाटील यांनी लेझीमच्या तालात सहभाग घेतला. तो फक्त लेझीम नव्हता, तर बाबासाहेबांप्रती निस्सीम कृतज्ञता, आदर आणि आत्मीयतेची जिवंत अभिव्यक्ती होती. सर्वजण एकात्मतेची भावनेत एकरूप झाले. आप्पासाहेबांचा खांद्याला खांदा लावून घेतलेला सहभाग हा “समतेचा जिवंत अनुभव” होता. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा अर्थ त्या क्षणी प्रत्येकाला जाणवला. हा अनुभव शब्दांत मावत नाही, पण आयुष्यभर लक्षात राहील ®️🅿️✍️🙏1
- येवला तालुक्यातील गवंडगाव फाट्याजवळ ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर धडकेत सुरेश शिंदे (रा. सोयगाव) यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. त्याचवेळी जात असलेल्या डॉ. दिपाली क्षत्रिय यांनी तातडीने मदत करत जखमींना बाहेर काढले व CPR देऊन त्यांचे प्राण वाचवले. जखमींना येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.1
- महाराष्ट्र नासिक डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जयंती उत्सव घरकुल 20261
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.1
- येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत. सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते. डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2