logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटाकडील तालीम मंडळ 'राजेश चषक'चे मानकरी; अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळावर मात कोल्हापूर: कोल्हापूर: येथील प्रतिष्ठित 'राजेश चषक फुटबॉल स्पर्धा २०२६' वर पाटाकडील तालीम मंडळाने (पीटीएम) आपले नाव कोरले. शनिवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात पाटाकडीलने श्री शिवाजी तरुण मंडळाचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. ​सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. खेळाच्या ३२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या करण बंद्रे याने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पाटाकडीलच्या अरबाज पेंढारी याने ३९ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. उत्तरार्धात ५२ व्या मिनिटाला ओमकार मोरे याने गोल करत पाटाकडीलला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. ​विजेत्या पाटाकडील संघाकडून अमीन काझीर, ऋषिकेश मेथे पाटील, यशराज कांबळे, रोमारियो, ओमकार मोरे आणि नबी खान यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत नितीन साळोखे, दर्शन पाटील, करण बंद्रे, हर्ष जरग, योगेश कदम आणि संकेत जरग यांनी कडवी झुंज दिली.

on 7 March
user_Journalist Ajay
Journalist Ajay
करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
on 7 March
0bee1bf4-9b9a-4602-b423-afd62462fc85

पाटाकडील तालीम मंडळ 'राजेश चषक'चे मानकरी; अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळावर मात कोल्हापूर: कोल्हापूर: येथील प्रतिष्ठित 'राजेश चषक फुटबॉल स्पर्धा २०२६' वर पाटाकडील तालीम मंडळाने (पीटीएम) आपले नाव कोरले. शनिवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात पाटाकडीलने श्री शिवाजी तरुण मंडळाचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. ​सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. खेळाच्या ३२ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या करण बंद्रे याने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पाटाकडीलच्या अरबाज पेंढारी याने ३९ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. उत्तरार्धात ५२ व्या मिनिटाला ओमकार मोरे याने गोल करत पाटाकडीलला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. ​विजेत्या पाटाकडील संघाकडून अमीन काझीर, ऋषिकेश मेथे पाटील, यशराज कांबळे, रोमारियो, ओमकार मोरे आणि नबी खान यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत नितीन साळोखे, दर्शन पाटील, करण बंद्रे, हर्ष जरग, योगेश कदम आणि संकेत जरग यांनी कडवी झुंज दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे  याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे....
: संभाजी कदम, पोलीस उपायुक्त
#हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज
#Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    1
    आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.”
तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    1
    गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.