पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या रिफायनरीत भीषण आग; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या रिफायनरीत भीषण आग; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या अवघ्या एक दिवस आधीच राजस्थानातील पचपद्रा येथील बहुप्रतिक्षित रिफायनरी प्रकल्पात सोमवारी २० एप्रिल रोजी (दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उद्घाटन कार्यक्रमावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिट (CDU) मध्ये दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दिसले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून, नेमके नुकसान किती झाले याचा अद्याप आढावा घेतला जात आहे. आगीचे कारणही स्पष्ट झालेले नसून संबंधित दरम्यान, मंगळवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी या रिफायनरीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, या आगीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले असून उद्घाटनाच्या वेळापत्रकात बदल होणार का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही घटनास्थळी भेट देण्याचे नियोजन केले होते. ही रिफायनरी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त प्रकल्प असून देशातील पहिला ग्रीनफिल्ड एकात्मिक रिफायनरी-सह-पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स म्हणून ओळखला जातो. सुमारे ७९,४५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची वार्षिक क्षमता ९ दशलक्ष मेट्रिक टन (MMTPA) इतकी आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असताना, उद्घाटनाच्या आदल्या दिवशी लागलेल्या या आगीने प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेची मोठी कसोटी लागली आहे.

- शेतकऱ्यांनो मक्का ८०० रुपये क्विंटल दराने देण्यास तयार रहा असा इशारा राहुल देशमुख युवा काँग्रेस यांनी केला नाहीतर भारत अमेरिकेतील कृषी कराड रद्द करा1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- ----- डॉ.किशोर प्रभाकर भोसले व डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड व डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या न्यु लाईफ हॉस्पिटलच्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ आष्टी / पाटोदा / शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. या नव्या रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्वसमावेशक उपचार व्यवस्था या मुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. डॉ.किशोर प्रभाकर भोसले (MBBS, MS, Fellow IVF) यांनी डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड, डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरच्या सर्व सेवा-सुविधायुक्त रुग्णालय उभे करून बीड शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य रुग्णांकरिता अत्याधुनिक मशिनरी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुलभ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशेषतः ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार असून, वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होईल. या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, ह.भ.प. कृष्णा महाराज उत्तराधिकारी श्री क्षेत्र भगवान गड, ह.भ.प.लक्ष्मण महाराज फड (कानिफनाथ संस्थान खडकवाडी), विलास बापू बडगे, वैजनाथ तांदळे, चंद्रकांत नवले (जिल्हाप्रमुख शिवसेना ), मदन जाधव, सखाराम मस्के, गुलाब भाऊ घुमरे, सुरचंद भोसले, अभिजित घुमरे, दत्ता साठे, शाम हुले, गणेश भोसले यांच्या सह विविध मान्यवर मंडळी व पदाधिकारी डॉक्टर मंडळी व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.1
- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1
- परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी1