logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाटघर धरण ९५%, तर नीरा देवघर धरण ९८% भरले; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.... भोर - प्रतिनिधी ​        दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाटघर धरण ९५ टक्के, तर नीरा देवघर धरण ९८ टक्के भरले असून दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. धरणांची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने लवकरच दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास प्रशासना कडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रातू जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ​      मागील वर्षीही याच कालावधीत दोन्ही धरणांमध्ये असाच संतोषजनक पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरण क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वाढलेला विसर्ग पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून भाटघर धरण ९५ टक्के भरल्याने धरणातून वेळवंडी नदीपात्रात १६३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे तर नीरा देवघर धरण ९८ टक्के भरले असून, या धरणातून १६३७४ क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.    दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात दिलासादायक व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून वाहन चालवताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.​हौसी पर्यटक आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घाटमाथा, डोंगररांगा, टेकड्या, नदीकाठ, धबधबे आणि धरण परिसर यांसारख्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांनी नागरिकांना प्रशासना च्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

6 hrs ago
user_Rupesh Jadhav
Rupesh Jadhav
भोर, पुणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
f9c9e42d-02cf-457e-90b7-6bad29129f91

भाटघर धरण ९५%, तर नीरा देवघर धरण ९८% भरले; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.... भोर - प्रतिनिधी ​        दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाटघर धरण ९५ टक्के, तर नीरा देवघर धरण ९८ टक्के भरले असून दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. धरणांची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने लवकरच दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास प्रशासना कडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी नदीपात्रातू जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ​      मागील वर्षीही याच कालावधीत दोन्ही धरणांमध्ये असाच संतोषजनक पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरण क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वाढलेला

fbde89fc-a6ae-4093-95fd-e90e35a5fcea

विसर्ग पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून भाटघर धरण ९५ टक्के भरल्याने धरणातून वेळवंडी नदीपात्रात १६३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे तर नीरा देवघर धरण ९८ टक्के भरले असून, या धरणातून १६३७४ क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.    दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात दिलासादायक व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून वाहन चालवताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.​हौसी पर्यटक आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घाटमाथा, डोंगररांगा, टेकड्या, नदीकाठ, धबधबे आणि धरण परिसर यांसारख्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांनी नागरिकांना प्रशासना च्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    2
    विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना 
विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह.
विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट 
हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली.
सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    1
    भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले 
विक्रम शिंदे /भोर दि. 31
भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    1
    अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.