logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रफुल पिंपळकर यांचे दुर्दैवी निधन झाले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळवून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आषाढी वारीत सहभागी असताना पिंपळकर यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर शासनाच्या विठ्ठल-रखुमाई योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला, ज्याची दखल घेत शासनाने ही मदत मंजूर केली असून यामुळे पिंपळकर कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या संवेदनशील निर्णयाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि संतपरंपरेचा जिवंत वारसा आहे. वारकरी कुटुंबावर संकट आल्यास शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कायम संवेदनशील राहून प्रयत्न करत राहू. शासनाच्या या निर्णयामुळे संकटकाळात सामान्य नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

1 hr ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
6fe0e475-5d84-4378-b038-c53e195afb03

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी स्व. प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रफुल पिंपळकर यांचे दुर्दैवी निधन झाले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळवून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आषाढी वारीत सहभागी असताना पिंपळकर यांचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेनंतर शासनाच्या विठ्ठल-रखुमाई योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला, ज्याची दखल घेत शासनाने ही मदत मंजूर केली असून यामुळे पिंपळकर कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या संवेदनशील निर्णयाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि संतपरंपरेचा जिवंत वारसा आहे. वारकरी कुटुंबावर संकट आल्यास शासनाची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कायम संवेदनशील राहून प्रयत्न करत राहू. शासनाच्या या निर्णयामुळे संकटकाळात सामान्य नागरिकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देशातील शिक्षण व्यवस्थेत वाढत चाललेला कथित गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक वसुली आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे बिगुल वाजवले आहे. "हर कदम पर चोरी, हर तरफ वसूली" अशी तीव्र टीका करत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या १७ जुलै २०२६ रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथे 'शिक्षा रिव्होल्यूशन'चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, अवाजवी शुल्क आकारणी, प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांविरोधात देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अन्यायाशी आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयोजकांनी शिक्षण क्षेत्राला अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
    1
    देशातील शिक्षण व्यवस्थेत वाढत चाललेला कथित गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक वसुली आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलनाचे बिगुल वाजवले आहे. "हर कदम पर चोरी, हर तरफ वसूली" अशी तीव्र टीका करत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या १७ जुलै २०२६ रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथे 'शिक्षा रिव्होल्यूशन'चे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, अवाजवी शुल्क आकारणी, प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांविरोधात देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अन्यायाशी आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयोजकांनी शिक्षण क्षेत्राला अधिक पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी देशभरातील विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना या परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्थानिक एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी क्रांती दलाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. रंजनाताई पारशिवे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी सायंकाळी वरोरा आगार प्रमुखांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा आणि परिसरातील इतर गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी वरोरा येथे येतात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रातील एकही बस वेळेवर धावत नसून, सकाळी ८:०० ते ९:३० दरम्यान येणाऱ्या बसेस तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत आहेत किंवा अनेकदा थेट रद्द केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे महत्त्वाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना हुकत आहेत. शिवाय, महाविद्यालयातील बायोमेट्रिक हजेरीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्थानिक एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी क्रांती दलाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. रंजनाताई पारशिवे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी सायंकाळी वरोरा आगार प्रमुखांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा आणि परिसरातील इतर गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी वरोरा येथे येतात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रातील एकही बस वेळेवर धावत नसून, सकाळी ८:०० ते ९:३० दरम्यान येणाऱ्या बसेस तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत आहेत किंवा अनेकदा थेट रद्द केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे महत्त्वाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना हुकत आहेत. शिवाय, महाविद्यालयातील बायोमेट्रिक हजेरीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हिंगणघाट येथील दत्त मंदिर वॉर्डमधील रहिवासी पितांबर पुरुषोत्तम टिपले यांच्या घरासमोर गदर पाईप फुटला आहे. या फुटलेल्या पाईपमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी नगरपालिकेला पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे, परंतु पालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई न करता केवळ झोपा काढत आहे.
    3
    हिंगणघाट येथील दत्त मंदिर वॉर्डमधील रहिवासी पितांबर पुरुषोत्तम टिपले यांच्या घरासमोर गदर पाईप फुटला आहे. या फुटलेल्या पाईपमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी नगरपालिकेला पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे, परंतु पालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई न करता केवळ झोपा काढत आहे.
    user_पितांबर टिपले
    पितांबर टिपले
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आलोढाडी गावातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आलोढाडी रस्ता लालगटा पहाडीजवळ अत्यंत खराब झाला असून, हा मार्ग दुरुस्त करणे खूप गरजेचे आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, येथील राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सध्याचे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष 'औरतखोर' असल्याचा संतप्त आरोप करण्यात आला असून, त्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे, असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
    4
    गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील आलोढाडी गावातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आलोढाडी रस्ता लालगटा पहाडीजवळ अत्यंत खराब झाला असून, हा मार्ग दुरुस्त करणे खूप गरजेचे आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, येथील राजकीय परिस्थितीवर आणि पक्षांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सध्याचे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष 'औरतखोर' असल्याचा संतप्त आरोप करण्यात आला असून, त्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे, असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Sadhu Madkami
    Sadhu Madkami
    Clothing Shop भामरागड, गडचिरोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नागपूरमधील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉल येथे लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सशक्तिकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिलांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वकील पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मुस्तफा पठाण यांनी महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली. प्रेरणा विकास सोसायटीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिला आंदोलनाचे उद्दिष्ट, त्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
    1
    नागपूरमधील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉल येथे लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सशक्तिकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिलांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वकील पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मुस्तफा पठाण यांनी महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली.

प्रेरणा विकास सोसायटीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिला आंदोलनाचे उद्दिष्ट, त्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य युवा संमेलनाला सुरुवात होत आहे. साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये या भव्य युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
    1
    भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य युवा संमेलनाला सुरुवात होत आहे. साकोली येथील करंजेकर कॉलेजमध्ये या भव्य युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भंडारा येथे आयोजित नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी प्रशांत पडोळे यांच्यावर थेट 'नौटंकीबाज' असल्याचा शिक्का मारत त्यांच्यावर सडकून टीका केली. कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्ही कधीही अशी नौटंकी किंवा नखरेबाजी केली नाही; आम्ही केवळ सरकारवर टीका करायचो. मात्र, हे लोक फक्त नौटंकी करत आहेत. अशा नौटंकीबाज लोकांना जनता पुन्हा निवडून देत नाही. तसेच, हे जेवढ्या स्पीडने निवडून आले आहेत, तेवढ्याच स्पीडने त्यांची जमानत जप्त होणार आहे, अशा शब्दांत त्यांनी खासदार पडोळे यांचा समाचार घेतला.
    1
    भंडारा येथे आयोजित नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी प्रशांत पडोळे यांच्यावर थेट 'नौटंकीबाज' असल्याचा शिक्का मारत त्यांच्यावर सडकून टीका केली.

कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्ही कधीही अशी नौटंकी किंवा नखरेबाजी केली नाही; आम्ही केवळ सरकारवर टीका करायचो. मात्र, हे लोक फक्त नौटंकी करत आहेत. अशा नौटंकीबाज लोकांना जनता पुन्हा निवडून देत नाही. तसेच, हे जेवढ्या स्पीडने निवडून आले आहेत, तेवढ्याच स्पीडने त्यांची जमानत जप्त होणार आहे, अशा शब्दांत त्यांनी खासदार पडोळे यांचा समाचार घेतला.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजकर कॉलेजमध्ये आज, रविवार दिनांक १२ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साकोली नगर व साकोली तालुका यांच्या वतीने दुपारी १२ वाजता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, हे संमेलन दुपारी दोन ते चार या वेळेत पार पडणार आहे.
    3
    भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील करंजकर कॉलेजमध्ये आज, रविवार दिनांक १२ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. साकोली नगर व साकोली तालुका यांच्या वतीने दुपारी १२ वाजता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, हे संमेलन दुपारी दोन ते चार या वेळेत पार पडणार आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.