logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १६ जून २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला असून, यासंबंधीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष नरमवार यांनी दिले आहे. कार्यालयासमोर उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नरमवार यांनी मोटार वाहन विभागाच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले. शासनावर कोणताही आर्थिक भार येत नसतानाही कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. मध्यवर्ती संघटनेचे साले आणि सरोदे यांनीही संपाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना, नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने केली. संपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या ३२ पदांच्या पदोन्नतीचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, कार्यालय अधीक्षक पदाचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, सहायक मोटार वाहन अभियंता पदाचे सेवानियम नसल्यामुळे विधी पदवीधरांना नियुक्ती मिळत नसल्याने ते तयार करणे, वर्ग-३ संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदांची नावे अनुक्रमे परिवहन सहायक आणि वरिष्ठ परिवहन सहायक अशी बदलणे, तसेच आश्वसित प्रगती योजना (ACP/MACP) अंतर्गत वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक कर्मचाऱ्यांना सेवा लाभ देणे या मागण्यांचा समावेश आहे. या निदर्शनांमध्ये आर.एन. गोरे, एस.आर. केंद्रे, आर.एल. गाजुलवाड, जी.एम. शिंदे, आर.एच. कंधारकर, जी.के. पवळे, एन.आर. देवदे, श्री दिलीप गाडचेलवार, पी.पी. सातपुते, पी.जी. मरवाळे, रवी सानप, ए.एस. केंद्रे, एम.डी. पोकले, एन.जी. कुंडगीर, एस.जी. कोंगलवार, भगीरथ ठाकरे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

3 hrs ago
user_SANDEEP
SANDEEP
देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १६ जून २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला असून, यासंबंधीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष नरमवार यांनी दिले आहे. कार्यालयासमोर उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नरमवार यांनी मोटार वाहन विभागाच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले. शासनावर कोणताही आर्थिक भार येत नसतानाही कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. मध्यवर्ती संघटनेचे साले आणि सरोदे यांनीही संपाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना, नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने केली. संपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या ३२ पदांच्या पदोन्नतीचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, कार्यालय अधीक्षक पदाचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, सहायक मोटार वाहन अभियंता पदाचे सेवानियम नसल्यामुळे विधी पदवीधरांना नियुक्ती मिळत नसल्याने ते तयार करणे, वर्ग-३ संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करणे, लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदांची नावे अनुक्रमे परिवहन सहायक आणि वरिष्ठ परिवहन सहायक अशी बदलणे, तसेच आश्वसित प्रगती योजना (ACP/MACP) अंतर्गत वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक कर्मचाऱ्यांना सेवा लाभ देणे या मागण्यांचा समावेश आहे. या निदर्शनांमध्ये आर.एन. गोरे, एस.आर. केंद्रे, आर.एल. गाजुलवाड, जी.एम. शिंदे, आर.एच. कंधारकर, जी.के. पवळे, एन.आर. देवदे, श्री दिलीप गाडचेलवार, पी.पी. सातपुते, पी.जी. मरवाळे, रवी सानप, ए.एस. केंद्रे, एम.डी. पोकले, एन.जी. कुंडगीर, एस.जी. कोंगलवार, भगीरथ ठाकरे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेतकरी पुत्राने कर्जमाफी तात्काळ लागू झाली पाहिजे या मागणीसाठी अनोखी आंदोलन असे विविध प्रकारचे आंदोलन
    1
    शेतकरी पुत्राने कर्जमाफी तात्काळ लागू झाली पाहिजे या मागणीसाठी अनोखी आंदोलन असे विविध प्रकारचे आंदोलन
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    6 min ago
  • नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत आज सकाळी नांदेड विमानतळावर दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे दोन खासदार याच विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते. राजकीय वर्तुळात या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी वेगळ्या राजकीय हालचाली सुरू आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. #ऑपरेशनटायगर या हॅशटॅगसह या घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत आज सकाळी नांदेड विमानतळावर दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे दोन खासदार याच विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते.

राजकीय वर्तुळात या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले आहे. हा केवळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी वेगळ्या राजकीय हालचाली सुरू आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. #ऑपरेशनटायगर या हॅशटॅगसह या घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लातूर पोलिसांनी नीट यूजी पुनर्परीक्षा (Re-NEET) सुरळीत, पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना केली आहे. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी, गोपनीयतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेपूर्वीच सर्व बंदोबस्त अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, संपर्क अधिकारी, केंद्र अधीक्षक, वाहतूक नियंत्रण अधिकारी, एस्कॉर्ट पथके आणि परीक्षा केंद्रांवरील समन्वय अधिकारी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व, संवेदनशीलता आणि जबाबदारी अधोरेखित करत प्रत्येक अधिकाऱ्याला अत्यंत सतर्कतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि गोपनीय साहित्याच्या वाहतुकीसाठी विशेष पोलीस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे साहित्याच्या सुरक्षित हालचालीवर सतत देखरेख राहील. परीक्षा केंद्र परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून, प्रत्येक केंद्रावर पुरेसे पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त पथके कार्यरत आहेत आणि कोणत्याही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रांजवळील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, प्रभावी संपर्कासाठी वॉकी-टॉकी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, परीक्षेच्या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. लातूर जिल्हा पोलीस दल विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या या राष्ट्रीय कर्तव्यात पूर्ण जबाबदारीने सहभागी झाले असून, नीट यूजी पुनर्परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पडण्यासाठी लातूर पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
    1
    लातूर पोलिसांनी नीट यूजी पुनर्परीक्षा (Re-NEET) सुरळीत, पारदर्शक आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना केली आहे. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी, गोपनीयतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेपूर्वीच सर्व बंदोबस्त अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, संपर्क अधिकारी, केंद्र अधीक्षक, वाहतूक नियंत्रण अधिकारी, एस्कॉर्ट पथके आणि परीक्षा केंद्रांवरील समन्वय अधिकारी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व, संवेदनशीलता आणि जबाबदारी अधोरेखित करत प्रत्येक अधिकाऱ्याला अत्यंत सतर्कतेने कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि गोपनीय साहित्याच्या वाहतुकीसाठी विशेष पोलीस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे साहित्याच्या सुरक्षित हालचालीवर सतत देखरेख राहील. परीक्षा केंद्र परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून, प्रत्येक केंद्रावर पुरेसे पोलीस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त पथके कार्यरत आहेत आणि कोणत्याही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रांजवळील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून, प्रभावी संपर्कासाठी वॉकी-टॉकी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, परीक्षेच्या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. लातूर जिल्हा पोलीस दल विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या या राष्ट्रीय कर्तव्यात पूर्ण जबाबदारीने सहभागी झाले असून, नीट यूजी पुनर्परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पडण्यासाठी लातूर पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सोशल मीडियावर 'भगवान करे ऐसी ही वाइफ मिले तुझे' हा व्हिडिओ सध्या खूप वाईट पद्धतीने व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात नकारात्मक चर्चा सुरू आहे.
    1
    सोशल मीडियावर 'भगवान करे ऐसी ही वाइफ मिले तुझे' हा व्हिडिओ सध्या खूप वाईट पद्धतीने व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात नकारात्मक चर्चा सुरू आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे की, जर रविकांत तुपकर यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाला, तर देशात नेपाळसारखी परिस्थिती उदभवू शकते. कसबे यांच्या मते, सध्या देशात शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. रविकांत तुपकर यांना अडचणीत आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कसबे यांनी म्हटले आहे की, जर तुपकर यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर, राज्यात मोठा उद्रेक होईल आणि जनता स्वतःच कायदा हातात घेईल. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची मागणी केली आहे. अन्यथा, या गंभीर स्थितीविरोधात राज्यभर तीव्र उद्रेक केला जाईल, असा सज्जड इशारा राजीव कसबे यांनी लातूरमधून दिला आहे.
    1
    क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांनी सरकारला एक गंभीर इशारा दिला आहे की, जर रविकांत तुपकर यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाला, तर देशात नेपाळसारखी परिस्थिती उदभवू शकते. कसबे यांच्या मते, सध्या देशात शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. रविकांत तुपकर यांना अडचणीत आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कसबे यांनी म्हटले आहे की, जर तुपकर यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले तर, राज्यात मोठा उद्रेक होईल आणि जनता स्वतःच कायदा हातात घेईल. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

अन्यथा, या गंभीर स्थितीविरोधात राज्यभर तीव्र उद्रेक केला जाईल, असा सज्जड इशारा राजीव कसबे यांनी लातूरमधून दिला आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • श्रीपाद नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर १७ जून रोजी कलशारोहण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
    1
    श्रीपाद नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मासाच्या शुभ मुहूर्तावर १७ जून रोजी कलशारोहण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील, त्या निर्णयामागे आपण ठामपणे उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका आमदार बाबुराव कदम यांनी मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. आमदार कदम यांनी सांगितले की, ते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. पक्ष आणि नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करणे हीच त्यांची भूमिका आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
    1
    महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील, त्या निर्णयामागे आपण ठामपणे उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका आमदार बाबुराव कदम यांनी मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल.

आमदार कदम यांनी सांगितले की, ते वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. पक्ष आणि नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करणे हीच त्यांची भूमिका आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवरून राज्यभरात निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने लातूर येथे जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. मुंबईतील आझाद मैदान येथे २४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली. उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याने या निमित्ताने आपली एकजूट दाखवत मुंबईतील मोर्चासाठी रणशिंग फुंकले आहे, ज्यामुळे ही मागणी आता अधिक जोर धरत आहे.
    1
    अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवरून राज्यभरात निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने लातूर येथे जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. मुंबईतील आझाद मैदान येथे २४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली. उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याने या निमित्ताने आपली एकजूट दाखवत मुंबईतील मोर्चासाठी रणशिंग फुंकले आहे, ज्यामुळे ही मागणी आता अधिक जोर धरत आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.