अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई. नांदेड :- सोमवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन व एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे करण्यात आली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली. या मोहिमेत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
अवैध वाळू उत्खननाविरोधात नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाची पहाटे मोठी कारवाई. नांदेड :- सोमवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणारे तीन इंजिन व एक बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत सुमारे १३ लाख रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वात मौजे भनगी येथे करण्यात आली. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी
तसेच शासनाच्या महसुलाचे होणारे नुकसान लक्षात घेता प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही धडक कारवाई केली. या मोहिमेत नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमाटे, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, सय्यद मोसीन तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज सारपे, मनोज जाधव, गजानन होळगे, रमेश गिरी, राजेश बरोडा, महेश जोशी, गोपीनाथ कल्याणकर, पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by M B B1
- Post by Today One Live1