इसापुर धरणातून खानापूर बंगला उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करा ! जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी;महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन मगर यांचा पुढाकार हिंगोली हिंगोली /प्रतिनिधी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पा अंतर्गत पैनगंगा नदीवर इसापूर धरण बांधण्यात आले ज्यामध्ये जिल्ह्याची सुपीक जमीन पाण्याखाली गेली ज्या प्रकल्पाचे नुकतेच "आद्य क्रांतीवीर राजे नोवसाजी नाईक" असे नामाकरण करण्यात आले या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात काही प्रमाणात सिंचन निर्मिती झाली उर्वरीत जिल्ह्यात मात्र या जलाशयाचा सिंचनासाठी कुठलाही फायदा झाला नसल्याने जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी "आद्य क्रांतीवीर राजे नोवसाजी नाईक " (ईसापुर धरण) जलाशयातून खानापूर बंगला उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन मगर यांनी 13 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे केली. एकीकडे जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष बाकी असताना तो भरून काढण्यासाठी कुठलीही उपाय योजना न करता दुसरीकडे मात्र तालुक्यातील खरबी येथे बंधारा बांधून त्या बंधाऱ्यातील पाणी भुमिगत कालव्याद्वारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या "आद्य क्रांतीवीर राजे नोवसाजी नाईक" (इसापुर धरण) सोडण्यात येणार असल्याने शेतीला पाणी मिळणार नसून केवळ इसापुरचा धरणाचा जलसाठा वाढणार आहे या वाढलेल्या जलाशयामधून खानापुर बंगला उपसा जल सिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबत आमदार तान्हाजी मुटकुळे यांचीही भेट घेत मागणीचे निवेदन दिले यावेळी आमदार मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. खानापूर बंगला उपसा जलसिंचन योजनेद्वारे हिंगोली तालुक्यातील हजारो हक्टर जमिन सिंचना खाली येणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही. उपसा जलसिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावे पुढीलप्रमाणे खानापूर बंगला, सावरगाव बंगला,पळसोना, दुर्गसावंगी, उमरखोजा, डिग्रसवाणी, भटसावंगी, भटसावंगी तांडा, धोतरा,सिरसम खु., सिरसम बु., पेडगांव, खेर्डा, लोहरा, जोडतळा, हिरडी, माळहिवरा, खंडाळा, चिचाळा, बेलोरा, आंबाळा, बोंडाळा, आडगांव (मुटकुळे) फाळेगांव, कलगांव, सावा, भांडेगांव,खांबाळा, अंधारवाडी यासह 30 ते 35 गावाच्या हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. तसेच हिंगोली शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता भविष्यात पाणी समस्या दुर करण्यासाठी या उपसा जल सिंचन योजनेच्या माध्यमातून हिंगोली शहराला सुध्दा लाभ होणार असल्याने खानापूर बंगला येथील महादेव मंदीरा जवळील उपसा जल सिंचन योजनेच्या सर्वेक्षाच्या कामास तातडीने मान्यता देण्याची मागणी निवेदनाद्वारे मगर यांनी केली. योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणार -आमदार तान्हाजी मुटकुळे "आद्य क्रांतीवीर राजे नोवसाजी नाईक " (ईसापुर धरण) जलाशयातून खानापूर बंगला उपसा जल सिंचन योजनेमुळे हिंगोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असल्याने या योजनेच्या मंजुरी साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार मुटकुळे यांनी दिले.

- Post by M B B1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Today One Live1
- Post by Mohsin ahmed khan1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by माधव गायकवाड4
- Post by Today One Live1