छत्रपती संभाजीनगर -पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे श्रमदान; महावीर चौक–दौलताबाद टी-पॉईंट मार्गावरील खड्डे बुजवले पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे श्रमदान; महावीर चौक–दौलताबाद टी-पॉईंट मार्गावरील खड्डे बुजवले छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन छावणी पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा छावणीच्या अधिकारी व अंमलदारांनी पुढाकार घेत महावीर चौक ते दौलताबाद टी-पॉईंट या मार्गावरील धोकादायक खड्डे श्रमदानातून बुजवले. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच महावितरण (MSEB) यांनी विविध कामांसाठी रस्ता खोदला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी खड्डे कायम राहिल्याने पावसाचे पाणी साचून वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणतीही प्रतीक्षा न करता स्वतः पुढाकार घेत श्रमदानाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम केले. या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदा व सुव्यवस्था राखणेच नव्हे, तर प्रत्यक्ष श्रमदान करून अपघात रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या छावणी पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील उर्वरित खड्डेही तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर -पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे श्रमदान; महावीर चौक–दौलताबाद टी-पॉईंट मार्गावरील खड्डे बुजवले पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे श्रमदान; महावीर चौक–दौलताबाद टी-पॉईंट मार्गावरील खड्डे बुजवले छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत
आहे. ही बाब लक्षात घेऊन छावणी पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखा छावणीच्या अधिकारी व अंमलदारांनी पुढाकार घेत महावीर चौक ते दौलताबाद टी-पॉईंट या मार्गावरील धोकादायक खड्डे श्रमदानातून बुजवले. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच महावितरण (MSEB) यांनी विविध कामांसाठी रस्ता खोदला होता. त्यानंतर अनेक
ठिकाणी खड्डे कायम राहिल्याने पावसाचे पाणी साचून वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोणतीही प्रतीक्षा न करता स्वतः पुढाकार घेत श्रमदानाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम केले. या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ कायदा व सुव्यवस्था राखणेच नव्हे, तर प्रत्यक्ष श्रमदान करून अपघात रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या छावणी पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील उर्वरित खड्डेही तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) साहित्यसम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात विविध ठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली2
- छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली छ संभाजीनगर कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल बाईट -डॉक्टर विशाल लहाने1
- Post by लोखंडे संभाजी नगर पत्रकार1
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!1
- अभिजीत दिपके यांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू छत्रपती संभाजीनगर | कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले. विश्रांतीचा सल्ला देत पुढील काही काळ वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्लाही देण्यात आला.1
- खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1