कर्जत, श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तसेच श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवीन वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंग तसेच नेत्र दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय टळणार असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांचा होणारा प्रवास व वेळ वाचणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे. पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून या प्रणालीसाठी आवश्यक युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर रुग्णालयांमध्ये दिव्यांग बोर्डातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जातील. प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी तालुकानिहाय दिवस निश्चित केले असून श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यातील रुग्णांची वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी करण्यात येईल. तसेच अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर येथील रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या नव्या सुविधेमुळे दिव्यांग बांधवांची होणारी हेळसांड थांबण्यास मदत होणार असून संबंधित तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. घोगरे यांनी केले आहे.

- Post by कर्जत लाईव्ह1
- थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.4
- रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- Post by कर्जत लाईव्ह1