यवतमाळ जिल्ह्यात ८१६ अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी पीएमएफएमई योजनेतून प्रकल्पांना बळ उद्योगांना शासनाचे ३५ टक्के अनुदान पीएमएफएमई योजनेतून प्रकल्पांना बळ उद्योगांना शासनाचे ३५ टक्के अनुदान महिलांच्या सक्षमीकरणाला गती यवतमाळ, दि.१५ : जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग' (पीएमएफएमई) योजना 'गेम चेंजर' ठरत आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्याने या योजनेत उल्लेखनिय प्रगती केली असून, आतापर्यंत ८१६ प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाली आहे. विशेष म्हणजे, या उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९७२ नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला गती दिली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे एकूण मूल्य २७४५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये शासनाने खंबीर साथ देत आतापर्यंत १०५२ लाख रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना हक्काचे भांडवल उपलब्ध झाले असून त्यांच्या आर्थिक सक्षमतेला शासनाचा आधार मिळाला आहे. गृहउद्योगातून रोजगार निर्मिती जिल्ह्यातील उद्योगांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, स्थानिक उपलब्ध कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योगांकडे युवकांचा आणि महिलांचा कल अधिक आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४५८ मसाला उद्योग प्रकल्प कार्यान्वित असून त्यातून ९२३ जणांना रोजगार मिळाला आहे. ११५ गहू प्रक्रिया प्रकल्पांच्या माध्यमातून १८५ जणांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यात कडधान्यावर आधारित १०६ उद्योगातून २२६ जणांना रोजगार मिळाला आहे. ३६ दुग्ध प्रक्रिया उद्योग प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून ९४ जणांना रोजगार मिळाला आहे. आरोग्यदायी संकल्पनेवर आधारित २५ तेलघाणा प्रकल्पांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण त्यातून ६२ जणांना तर ७६ इतर उद्योगातून ४८२ जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. योजनेचा मुख्य उद्देश : पीएमएफएमई योजनेचा मुख्य उद्देश ही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना तांत्रिक आणि वित्तीय बळ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात या योजनेमुळे स्वयंरोजगाराचे मोठे जाळे विणले जात आहे. थोडक्यात आढावा (२०२०-२१ ते २०२५-२६): एकूण प्रकल्प संख्या:८१६ एकूण गुंतवणूक (मूल्य): ₹ २७४५ लाख वितरित अनुदान: ₹ १०५२ लाख निर्माण झालेला रोजगार : १९७२ गेल्या पाच वर्षांतील ही आकडेवारी स्पष्ट करते की, यवतमाळ जिल्हा आता 'प्रक्रिया उद्योगांचे केंद्र' म्हणून नावारूपास येत आहे. मसाला आणि गहू प्रक्रिया उद्योगांमधील भरघोस वाढ जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरणारी आहे. “पीएमएफएमई योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक लाभार्थ्याला तांत्रिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा भक्कम आधार देत आहोत. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मिती हे सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.” - जिल्हा अधिक्षक कृषी अध्किारी मनोजकुमार ढगे "पीएमएफएमई योजना ही जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाचे साधन बनत आहे. यवतमाळमधील ८१६ प्रकल्पांनी हे सिद्ध केले आहे की, येथील तरुण आणि महिला वर्ग आता नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनत आहेत. जिल्ह्याला 'अन्न प्रक्रिया हब' बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे."- जिल्हाधिकारी विकास मीना

- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1
- Post by Labour addaa.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by Today One Live1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Sharad Dayedar1
- श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रा वाढोणा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 🗓 दिनांक: शनिवार, १८ एप्रिल २०२६ 🕒 वेळ: दुपारी ०३:०० वा. 📍 स्थळ: बाजार चौक, श्री हनुमान मंदिर (पोलीस स्टेशन बाजूस), वाढोणा ✨ मुख्य आकर्षण: भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) प्रभु श्रीराम लल्ला झांकी बाहुबली हनुमान झांकी छत्रपती शिवाजी महाराज झांकी गौमाता राष्ट्रमाता झांकी भजन मंडळ ट्रॉला रिध्दम लाईव्ह साउंड, नांदेड 🚩 मिरवणूक मार्ग: श्री हनुमान मंदिर → दीक्षा भूमी चौक → सुदर्शन कॉर्नर → सराफा लाईन → महात्मा फुले चौक → श्री परमेश्वर मंदिर → श्री परमेश्वर गल्ली → लकडोबा चौक (समारोप) उद्घाटक: सर्व साधू-संत व माय-माऊली आयोजक: श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, सकल हिंदू समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी कालिंका गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा 🚩 जय श्रीराम! 🚩 वाढोणा येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन! आकर्षक झांक्या, भजन आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्की उपस्थित रहा. #RamNavami #HanumanJayanti #JaiShriRam #Wadhona #Himayatnagar Nanded ReligiousEvent Maharashtra Trending Bhakti1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1