logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा’ उपक्रमातून गुणवत्तेवर मंथन* सायंकाळी ६ ते ८ मोबाईल,टीव्ही बंद चा ठराव... *धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा’ उपक्रमातून गुणवत्तेवर मंथन* सायंकाळी ६ ते ८ मोबाईल,टीव्ही बंद चा ठराव... रिसोड, रिसोड जिल्हा परिषद वाशिम शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठलराव भुसारे यांच्या संकल्पनेतून 'गावाची वेस ओलांडून,ज्ञानाचे क्षितिज गाठण्याचा ध्यास घेत धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा...! ज्ञान, गुणवत्ता आणि विकासाचा..!’ हा अभिनव उपक्रम दि. २७ ऑगस्ट रोजी संत गजानन महाराज संस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा, शिक्षण केवळ पुस्तकी न राहता कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे असावे, गावातील शाळांना गावकऱ्यांचे सहकार्य असावे आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने शाळेसाठी काही करता येईल का या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. *‘जागर शिक्षणाचा’ म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारी चळवळ* असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. अशाच प्रकारच्या शिक्षण विषयक उपक्रमांचे आयोजन गावोगावी व्हावे व बदलत्या परिस्थितीनुसार मुलांमध्ये नवनवीन कौशल्य कशा पद्धतीने आत्मसात होतील या बाबींवर आताच्या पालकांनी कसा भर द्यावा याबाबत सुद्धा उपस्थित वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळात घरातील टीव्ही व मोबाईल न वापरण्याबाबत ठराव संमत केला कार्यक्रमा मध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांची लाभलेली उपस्थिती त्याचबरोबर गावकरी व शिक्षणप्रेमी सुद्धा भरपूर संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठलराव भुसारे यांनी बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत नाविन्य आणण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुंदर धवन व डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, केंद्रप्रमुख उमाकांत काष्टे, सरपंच स्वप्निल बोडखे, पोलीस पाटील शामराव बोडखे, मंदिर समिती अध्यक्ष गजानन बोडखे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास बोडखे, पं.स. सदस्य राहुल बोडखे, शा.व्य.स. अध्यक्ष मनोज बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन जि.प. प्राथमिक शाळा व स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल अंभोरे,सूत्रसंचालन मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी तर आभार मा.पं.स.राहुल बोडखे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले..

7 hrs ago
user_Suresh Badrigiri Giri
Suresh Badrigiri Giri
Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
7 hrs ago
2a8ddffe-4957-410b-a2f4-6116a4370947

धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा’ उपक्रमातून गुणवत्तेवर मंथन* सायंकाळी ६ ते ८ मोबाईल,टीव्ही बंद चा ठराव... *धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा’ उपक्रमातून गुणवत्तेवर मंथन* सायंकाळी ६ ते ८ मोबाईल,टीव्ही बंद चा ठराव... रिसोड, रिसोड जिल्हा परिषद वाशिम शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठलराव भुसारे यांच्या संकल्पनेतून 'गावाची वेस ओलांडून,ज्ञानाचे क्षितिज गाठण्याचा ध्यास घेत धोडप बु. येथे ‘जागर शिक्षणाचा...! ज्ञान, गुणवत्ता आणि विकासाचा..!’ हा अभिनव उपक्रम दि. २७ ऑगस्ट रोजी संत गजानन महाराज संस्थान येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा, शिक्षण केवळ पुस्तकी न राहता कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे असावे, गावातील शाळांना गावकऱ्यांचे सहकार्य असावे आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने शाळेसाठी काही करता येईल का या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. *‘जागर शिक्षणाचा’ म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारी चळवळ* असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. अशाच प्रकारच्या शिक्षण विषयक उपक्रमांचे आयोजन गावोगावी व्हावे व बदलत्या परिस्थितीनुसार मुलांमध्ये नवनवीन कौशल्य कशा पद्धतीने आत्मसात होतील या बाबींवर आताच्या पालकांनी कसा भर द्यावा याबाबत सुद्धा उपस्थित वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले या ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळात घरातील टीव्ही व मोबाईल न वापरण्याबाबत ठराव संमत केला कार्यक्रमा मध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांची लाभलेली उपस्थिती त्याचबरोबर गावकरी व शिक्षणप्रेमी सुद्धा भरपूर संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठलराव भुसारे यांनी बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत नाविन्य आणण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुंदर धवन व डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, केंद्रप्रमुख उमाकांत काष्टे, सरपंच स्वप्निल बोडखे, पोलीस पाटील शामराव बोडखे, मंदिर समिती अध्यक्ष गजानन बोडखे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास बोडखे, पं.स. सदस्य राहुल बोडखे, शा.व्य.स. अध्यक्ष मनोज बोडखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन जि.प. प्राथमिक शाळा व स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल अंभोरे,सूत्रसंचालन मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी तर आभार मा.पं.स.राहुल बोडखे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    1
    संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..

सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..


संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..
सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
    1
    ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश

नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप..

रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान..
पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश
नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप..
रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान..
पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका* *हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली* *छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
    1
    *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका*

*हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली*

*छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली.

सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।
    1
    हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला
हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है।
24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया।
मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है।
अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है।
📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ।
वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.
    1
    मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्...
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान
    1
    मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    1
    जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..

रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..


जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..
रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे
    1
    नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड
    4
    अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी

पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू
उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ :
अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली.
या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव
अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा?
या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
— प्रतिनिधी, उमरखेड
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.