जिल्ह्यातील राजुरा येथील साईनगरच्या पाणीप्रश्नावर नगराध्यक्ष धोटे यांच्या हस्ते नवीन बोअरवेलच्या कामाचे भूमिपूजन राजुरा : नगर परिषद राजुराच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील साईनगर येथील हनुमान मंदिर परिसरात नवीन बोअरवेल खोदकामाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा दि. 15 सप्टेंबर 12 वाजता नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. परिसरातील नागरिकांना पुरेसा व नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून देण्यासोबतच आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नगर परिषदेने हे काम हाती घेतले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप देरकर, आरोग्य सभापती अनंतकुमार ताजने, बांधकाम सभापती अन्नू हरजित संधू, महिला व बालकल्याण सभापती गीताताई पथाडे, नगरसेविका संध्याताई चांदेकर, शहराध्यक्ष हरजितसिंग संधू, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश रासेकर, उपाध्यक्ष शालिक उरकुडे, सचिव प्रकाश चौधरी, कोषाध्यक्ष आनंदराव ताजने, पाणीपुरवठा अभियंता सुमेध खापर्डे, ऋषी झाडे, अनुप करमरकर, आशिष मडावी यांच्यासह नगर परिषद अधिकारी-कर्मचारी आणि साईनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’ शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’1
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1
- डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.1
- दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई1
- चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.1
- जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली1