Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गणेश दौलत मोहिते यांच्या स्वीट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे १२ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीमुळे दुकानातील खाद्यपदार्थ, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
Laxman Kisan bagul
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गणेश दौलत मोहिते यांच्या स्वीट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे १२ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीमुळे दुकानातील खाद्यपदार्थ, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिंडोरी तालुक्यातील वनी येथील संस्कृती नगरमधील अष्टविनायक कॉलनीतील एका मोकळ्या जागेत विषारी सर्प आढळून आला. याची माहिती सर्पमित्र भगवान पवार यांना भ्रमणध्वनीद्वारे मिळाल्यानंतर, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भगवान पवार यांनी या सर्पाला सुरक्षितपणे पकडून त्याचे प्राण वाचवले. सर्पाला पकडल्यानंतर त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले.1
- नाशिक येथे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने ज्यांना संधी देऊन खासदारपदापर्यंत पोहोचवले, तेच नंतर पक्ष सोडून जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. ज्याला कोणी ओळखत नव्हते, त्याला खासदार केले आणि तेच आता पक्ष सोडून जात आहेत, असे म्हणत राऊत यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला. राऊत यांच्या या बोलण्यादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याने सभास्थळी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते.1
- नाशिकरोड पोलिसांनी शहरात वाढत्या वाहन चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने एक मोठी कारवाई केली आहे. सिन्नर फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाने अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचत एका सराईत दुचाकी चोराला अटक केली. या कारवाईमुळे नाशिकरोड आणि अहिल्यानगर (संगमनेर) परिसरातील दुचाकी चोरीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.4
- नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात कन्हेरवाडी येथे प्रेमसंबंधातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने बोलावून तरुणाचा खून करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण कळवण तालुका हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मृत तरुण सचिन मोतीराम चौरे (रा. नरूळ, ता. कळवण) याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते, ज्याला दोन्ही कुटुंबांची संमती होती. याच प्रेमसंबंधासंदर्भात लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलीकडील मंडळी कन्हेरवाडी येथे सचिनच्या बहिणीच्या घरी आली होती. बोलणी सुरू असताना, मुलीचे मावसभाऊ मोहन बागुल, योगेश बागुल आणि मुलीचा मेहुणा संदीप महादू पवार (रा. चणकापूर) यांनी सचिनला बोलण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीत नेताच, काही समजण्याच्या आतच त्यांनी नियोजनबद्धरीत्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने सचिनच्या डोक्यावर आणि छातीवर सपासप वार केले, ज्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सचिनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.1
- पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचल्यास मंदिराच्या समितीवर आणि पुरातत्व विभागावर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित यांनी दिला आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले.1
- वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शांतीनगर झोपडपट्टी हटविण्याच्या कारवाईवरून उद्योग विभाग, उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सदावर्ते यांनी दावा केला की, उद्योग विभागाने महसूल व वन विभागाची दिशाभूल करून शासनाच्या गायरान जमिनीचा औद्योगिक वापरासाठी मार्ग मोकळा केला आहे. त्यांनी शांतीनगरवासीयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत, या प्रकरणात मंत्री सामंत यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. सदावर्ते पुढे म्हणाले की, झोपडपट्टी हटविताना मानवाधिकार आणि संविधानाची पायमल्ली झाली आहे. त्यांनी इशारा दिला की, जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते न्यायालयीन लढा उभारतील आणि कायदेशीर तक्रारी दाखल करतील. सदावर्ते यांनी शांतीनगर प्रकरणावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, उद्योग विभागाने दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.1
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गणेश दौलत मोहिते यांच्या स्वीट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे १२ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीमुळे दुकानातील खाद्यपदार्थ, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.1