logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आळंद व सिल्लोड रस्ता वर जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार ; महिला गंभीर आळंद–सिल्लोड मार्गावरील भीषण अपघात; उपचारादरम्यान विक्रम पारखे यांचा मृत्यू : आळंद–सिल्लोड मार्गावर सिल्लोडकडून वडोद बाजारच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची विनाक्रमांकाच्या जेसीबीला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता हा अपघात घडला. सिल्लोडकडून वडोद बाजारच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची (एमएच-२० ईपी ****, नंबर प्लेट अर्धवट तुटलेली) विनाक्रमांकाच्या जेसीबीसोबत धडक झाली. सदर मोटार सायकल MH.20.EN.2580 हा असल्याचे सांगण्यात आले .अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते . अपघाताची माहिती मिळताच दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव विक्रम मधुकर पारखे (वय ३६, रा. महालकिन्होला, ता. फुलंब्री) असे आहे. तर दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेल्या गंगूबाई प्रल्हाद म्हस्के (वय ४५, रा. वडोद बाजार) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातातील जेसीबी विनाक्रमांकाची असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे . या अपघातानंतर जेसीबी व दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .

11 hrs ago
user_Amol patil  phulambri
Amol patil phulambri
फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
11 hrs ago
568a3038-789b-4e3d-b07c-663cda5e4522

आळंद व सिल्लोड रस्ता वर जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार ; महिला गंभीर आळंद–सिल्लोड मार्गावरील भीषण अपघात; उपचारादरम्यान विक्रम पारखे यांचा मृत्यू : आळंद–सिल्लोड मार्गावर सिल्लोडकडून वडोद बाजारच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची विनाक्रमांकाच्या जेसीबीला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता

9259111e-e033-4813-956a-6419ffe2e7be

हा अपघात घडला. सिल्लोडकडून वडोद बाजारच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची (एमएच-२० ईपी ****, नंबर प्लेट अर्धवट तुटलेली) विनाक्रमांकाच्या जेसीबीसोबत धडक झाली. सदर मोटार सायकल MH.20.EN.2580 हा असल्याचे सांगण्यात आले .अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते . अपघाताची माहिती मिळताच दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव विक्रम मधुकर

54505f6c-c8de-4344-a9d7-3df944a901b1

पारखे (वय ३६, रा. महालकिन्होला, ता. फुलंब्री) असे आहे. तर दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेल्या गंगूबाई प्रल्हाद म्हस्के (वय ४५, रा. वडोद बाजार) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातातील जेसीबी विनाक्रमांकाची असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे . या अपघातानंतर जेसीबी व दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन
    1
    आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा  गणरायाचे धुमधडाक्यात आगमन
    user_Attal Mat
    Attal Mat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पहाटे तीन वाजता पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांचे वडील भेटायला आले,
    1
    पहाटे तीन वाजता पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांचे वडील भेटायला आले,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    4
    गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    12 hrs ago
  • सिल्लोड मध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सातारांचा पुढाकार येवला येथील कापसे पैठणी फॅक्टरीला भेट; रोजगारनिर्मितीच्या संधींचा घेतला आढावा सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या फॅक्टरीमध्ये दिव्यांग, निराधार, मूकबधिर तसेच विधवा महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पाहिले. या उपक्रमाचे कौतुक करताना अशा माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर ‘कापूस ते कापड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पैठणी उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो. सिल्लोड-सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन होत असल्याने या उद्योगासाठी स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण असल्याची चर्चा यावेळी झाली. आमदार सत्तार यांनी नॅशनल सहकारी सूतगिरणीबाबतही बाळकृष्ण कापसे यांना माहिती दिली. कापसे पैठणीच्या प्रकल्पाची पाहणी करून हा उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, शासनाचे सहकार्य मिळाल्यास महिला, दिव्यांग, निराधार तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोडमध्ये मोठा उपक्रम उभा राहू शकतो, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. सिल्लोड येथे पैठणी उद्योग उभारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सत्तार यांनी येवला येथील प्रसिद्ध पंडित पैठणी दुकानालाही सदिच्छा भेट देऊन पैठणी उद्योगातील बाजारपेठ, मागणी आणि ग्राहकांच्या पसंतीबाबत माहिती घेतली. यावेळी माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज राठोड, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, माजी पंचायत समिती उपसभापती अजिज शेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, भोकरदन चे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हराळ, शकील जहागिरदार, रिजवान शेख आदी उपस्थित होते.
    1
    सिल्लोड मध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सातारांचा पुढाकार 
येवला येथील कापसे पैठणी फॅक्टरीला भेट; रोजगारनिर्मितीच्या संधींचा घेतला आढावा
सिल्लोड (प्रतिनिधी)  सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या फॅक्टरीमध्ये दिव्यांग, निराधार, मूकबधिर तसेच विधवा महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पाहिले. या उपक्रमाचे कौतुक करताना अशा माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर ‘कापूस ते कापड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पैठणी उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो. सिल्लोड-सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन होत असल्याने या उद्योगासाठी स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण असल्याची चर्चा यावेळी झाली. आमदार सत्तार यांनी नॅशनल सहकारी सूतगिरणीबाबतही बाळकृष्ण कापसे यांना माहिती दिली.
कापसे पैठणीच्या प्रकल्पाची पाहणी करून हा उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, शासनाचे सहकार्य मिळाल्यास महिला, दिव्यांग, निराधार तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोडमध्ये मोठा उपक्रम उभा राहू शकतो, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. सिल्लोड येथे पैठणी उद्योग उभारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार सत्तार यांनी येवला येथील प्रसिद्ध पंडित पैठणी दुकानालाही सदिच्छा भेट देऊन पैठणी उद्योगातील बाजारपेठ, मागणी आणि ग्राहकांच्या पसंतीबाबत माहिती घेतली.
यावेळी माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज राठोड, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, माजी पंचायत समिती उपसभापती अजिज शेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, भोकरदन चे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हराळ, शकील जहागिरदार, रिजवान शेख आदी उपस्थित होते.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मुख्यालयी वास्तव्यासाठी शिक्षकांचे आंदोलन; गुरू धानोरा शाळेतील पालकाचा बोलका व्हिडिओ चर्चेत गंगापूर : गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या मागणीसह विविध प्रश्नांवर आज सामूहिक रजेवर जात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील गुरू धानोरा जिल्हा परिषद शाळेतील एका पालकाने केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षक मुख्यालयी राहत नसतानाही तेथे वास्तव्यास असल्याची कागदपत्रे सादर केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात गावातील शाळा व विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे, यावर या पालकाने व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केले आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील नियम, त्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? पालकाच्या या बोलक्या व्हिडिओतून समोर आलेले वास्तव पाहा...
    1
    मुख्यालयी वास्तव्यासाठी शिक्षकांचे आंदोलन; गुरू धानोरा शाळेतील पालकाचा बोलका व्हिडिओ चर्चेत

गंगापूर : गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या मागणीसह विविध प्रश्नांवर आज सामूहिक रजेवर जात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर गंगापूर तालुक्यातील गुरू धानोरा जिल्हा परिषद शाळेतील एका पालकाने केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षक मुख्यालयी राहत नसतानाही तेथे वास्तव्यास असल्याची कागदपत्रे सादर केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
मात्र प्रत्यक्षात गावातील शाळा व विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे, यावर या पालकाने व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
शिक्षकांच्या मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील नियम, त्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? पालकाच्या या बोलक्या व्हिडिओतून समोर आलेले वास्तव पाहा...
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; मराठा बांधवांची मोठी गर्दी,
    1
    मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; मराठा बांधवांची मोठी गर्दी,
    user_आयकॉन महाराष्ट्र न्यूज
    आयकॉन महाराष्ट्र न्यूज
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    1
    ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,
    1
    एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.