logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेपाळमध्ये गडचिरोलीतील नागरिक अडकले आहेत का? प्रशासनाकडून तातडीने माहिती देण्याचे आवाहन नेपाळमध्ये गडचिरोलीतील नागरिक अडकले आहेत का? प्रशासनाकडून तातडीने माहिती देण्याचे आवाहन चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | गडचिरोली नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये गेलेले गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक किंवा नागरिक अडकले आहेत का, अथवा त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होत नाही का, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे. 📞 तातडीच्या मदतीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधा जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली : ☎️ 07132-222031 ☎️ 07132-222035 📱 9423911077 📱 8275370208 पोलीस नियंत्रण कक्ष, गडचिरोली : ☎️ 07132-223142 कोणती माहिती द्यावी? नेपाळमध्ये अडकलेल्या व्यक्तीबाबत प्रशासनाला माहिती देताना शक्य असल्यास खालील तपशील द्यावेत— संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव मोबाईल क्रमांक नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव प्रवासाचा तपशील सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक या माहितीच्या आधारे संबंधित नागरिक किंवा पर्यटकाचा शोध घेणे तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. 🌐 ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी. ऑनलाइन नोंदणी लिंक : नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क होत नसल्यास त्यांच्या नातेवाईकांनी विलंब न करता दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी

9 hrs ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
9 hrs ago
60141a1f-2809-43be-ab1f-f95f5b8f2015

नेपाळमध्ये गडचिरोलीतील नागरिक अडकले आहेत का? प्रशासनाकडून तातडीने माहिती देण्याचे आवाहन नेपाळमध्ये गडचिरोलीतील नागरिक अडकले आहेत का? प्रशासनाकडून तातडीने माहिती देण्याचे आवाहन चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | गडचिरोली नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये गेलेले गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक किंवा नागरिक अडकले आहेत का, अथवा त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होत नाही का, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी केले आहे. 📞 तातडीच्या मदतीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधा जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष, गडचिरोली : ☎️ 07132-222031 ☎️ 07132-222035 📱 9423911077 📱 8275370208 पोलीस नियंत्रण कक्ष, गडचिरोली : ☎️ 07132-223142 कोणती माहिती द्यावी? नेपाळमध्ये अडकलेल्या व्यक्तीबाबत प्रशासनाला माहिती देताना शक्य असल्यास खालील तपशील द्यावेत— संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव मोबाईल क्रमांक नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव प्रवासाचा तपशील सोबत असलेल्या व्यक्तींची माहिती कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक या माहितीच्या आधारे संबंधित नागरिक किंवा पर्यटकाचा शोध घेणे तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. 🌐 ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे नोंदविण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी. ऑनलाइन नोंदणी लिंक : नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांशी संपर्क होत नसल्यास त्यांच्या नातेवाईकांनी विलंब न करता दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बोदा गावात सार्वजनिक देणगीतून बांधलेल्या सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तिरोडा:- बोदा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेडच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक देणग्यांतून करण्यात आले. ही इमारत गावकरी आणि संस्थेच्या सदस्यांकडून गोळा केलेल्या देणग्यांमधून बांधण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या हस्ते झाले. तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम भाऊ पाटले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अविनाशजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने अधिकारी, संचालक मंडळ, मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी वक्त्यांनी नमूद केले की, गावकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून आणि सार्वजनिक देणग्यांमधून संस्थेसाठी ही इमारत बांधली आहे. हे निश्चितच ग्रामीण एकतेचे आणि सहकार्याच्या भावनेचे उदाहरण आहे. तथापि, ही परिस्थिती ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांप्रति सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्नही निर्माण करते. ग्रामीण भागातील विकासासाठी सरकारी योजना आणि निधी उपलब्ध असूनही, जर एखाद्या सहकारी संस्थेला स्वतःची इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक देणग्या गोळा कराव्या लागत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण लोकसंख्येचा विकास आणि सहकारी संस्थांच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी केवळ जनतेचीच आहे का? सरकारने ग्रामीण भागाच्या खऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सहकारी संस्थांना आवश्यक पाठिंबा दिला पाहिजे. सार्वजनिक देणग्यांनी बांधलेली ही इमारत सार्वजनिक एकतेचे प्रतीक आहे, परंतु ती सरकारकडे ठोस पावले उचलण्याची आणि ग्रामीण विकास, सहकारी संस्था व शेतकरी-संबंधित संघटनांना बळकट करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करते. कार्यक्रमाच्या शेवटी, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुणे, सदस्य आणि गावकऱ्यांचे आभार मानले.
    1
    बोदा गावात सार्वजनिक देणगीतून बांधलेल्या सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
तिरोडा:- बोदा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेडच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक देणग्यांतून करण्यात आले. ही इमारत गावकरी आणि संस्थेच्या सदस्यांकडून गोळा केलेल्या देणग्यांमधून बांधण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या हस्ते झाले. तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम भाऊ पाटले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अविनाशजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने अधिकारी, संचालक मंडळ, मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते.
या प्रसंगी वक्त्यांनी नमूद केले की, गावकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून आणि सार्वजनिक देणग्यांमधून संस्थेसाठी ही इमारत बांधली आहे. हे निश्चितच ग्रामीण एकतेचे आणि सहकार्याच्या भावनेचे उदाहरण आहे. तथापि, ही परिस्थिती ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांप्रति सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्नही निर्माण करते.
ग्रामीण भागातील विकासासाठी सरकारी योजना आणि निधी उपलब्ध असूनही, जर एखाद्या सहकारी संस्थेला स्वतःची इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक देणग्या गोळा कराव्या लागत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण लोकसंख्येचा विकास आणि सहकारी संस्थांच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी केवळ जनतेचीच आहे का? सरकारने ग्रामीण भागाच्या खऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सहकारी संस्थांना आवश्यक पाठिंबा दिला पाहिजे.
सार्वजनिक देणग्यांनी बांधलेली ही इमारत सार्वजनिक एकतेचे प्रतीक आहे, परंतु ती सरकारकडे ठोस पावले उचलण्याची आणि ग्रामीण विकास, सहकारी संस्था व शेतकरी-संबंधित संघटनांना बळकट करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करते.
कार्यक्रमाच्या शेवटी, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुणे, सदस्य आणि गावकऱ्यांचे आभार मानले.
    user_Rekhalal Rahangdale
    Rekhalal Rahangdale
    Journalist तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गोंदिया के टांडा-अदासी मार्ग पर गड्ढे, कापसे कॉलेज ने की मरम्मत खबर और विज्ञापन के लिये 9607860369 पर कॉल करें, डायरेक्टर एवं मुख्य संपादक भूषण राजे
    1
    गोंदिया के टांडा-अदासी मार्ग पर गड्ढे, कापसे कॉलेज ने की मरम्मत
खबर और विज्ञापन के लिये 9607860369 पर कॉल करें, डायरेक्टर एवं मुख्य संपादक भूषण राजे
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई जश्ने ईद मिलादुन्नबी ईद पर 'लब्बैक या रसूल अल्लाह' की गूंज गोंदिया, ब्यूरो. इस्लाम के पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहो अलैहि वसल्लम) की विलादत के मुबारक अवसर पर शहर में जश्न-ए-ईद मिलादुन्नबी पूरे अकीदत, उत्साह और सौहार्द के साथ मनाया गया. इस अवसर पर शहर की फिजा 'लब्बैक या रसूल अल्लाह' की सदाओं से गूंज उठी. मरकजी सीरतुन्नबी कमेटी की निगरानी में निकाले गए जुलूस-ए-मोहम्मदिया में बड़ी संख्या में मुस्लिम समाज के लोगों ने हिस्सा लिया. पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद (स.अ.व.) की तालीमात को इंसानियत, अमन, सादगी, गरीबों, बेसहारा और जरूरतमंदों के अधिकारों तथा महिलाओं और बेटियों के सम्मान का संदेश बताते हुए शहरभर में मिलाद का जश्न मनाया गया अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई मरकजी कमेटी के सदर 'ईशान' शेख का जगह-जगह इस्तकबाल जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के आयोजन में मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर जनाब ईरशाद (ईशान) शेख का विभिन्न चौक-चौराहों पर गर्मजोशी से स्वागत किया गया. मुस्लिम समाज के लोगों के साथ ही अन्य समाज के नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और राजनीतिक क्षेत्र से जुड़े लोगों ने भी फूलों की मालाएं व गुलदस्ते भेंट कर उनका इस्तकबाल किया. मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर ईरशाद (ईशान) शेख और कमेटी पदाधिकारियों ने जुलूस के सफल व शांतिपूर्ण आयोजन में सहयोग देने वाले पुलिस प्रशासन, सामाजिक संगठनों, विभिन्न समाजों के नागरिकों तथा सभी सहयोगियों का आभार व्यक्त किया. परचमकुशाई और सलात-ओ-सलाम : जुलूस से पहले शहर की विभिन्न मस्जिदों में सुबह सादिक के समय नमाज-ए-फजर अदा की गई. इसके बाद परचमकुशाई की रस्म हुई सब्ज पताकों, रोशनी और आकर्षक गेटों से सजा शहर जश्न-ए-ईद मिलादुन्नबी को लेकर शहर के विभिन्न हिस्सों में विशेष सजावट की गई. प्रमुख मागों और मुस्लिम बहुल क्षेत्रों में सब्ज पताकाएं, आकर्षक रोशनी और स्वागत द्वार लगाए गए. कई स्थानों पर इस्लामी झांकियां भी तैयार की गईं, जिन्होंने लोगों का ध्यान आकर्षित किया. जुलूस-ए-मोहम्मदिया का समापन सुभाष स्कूल ग्राउंड में हुआ. इसके बाद सुभाष स्कूल ग्राउंड के साथ ही हुसैनी चौक, रामनगर और बाजार चौक में आम लंगर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने सहभागिता की. जुलूस के दौरान अकीदतमंदों ने नात-ए-पाक पढ़ते हुए और दरूद-ओ-सलाम पेश करते हुए अपने नबी की आमद की खुशी का इजहार किया. तथा पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) की विलादत के मौके पर सलात-ओ-सलाम का नजराना पेश किया गया. अफसरी कादिर शेख जिला - गोंदिया
    4
    अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट  जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई

जश्ने ईद मिलादुन्नबी ईद पर 'लब्बैक या रसूल अल्लाह' की गूंज
गोंदिया, ब्यूरो. इस्लाम के पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहो अलैहि वसल्लम) की विलादत के मुबारक अवसर पर शहर में जश्न-ए-ईद मिलादुन्नबी पूरे अकीदत, उत्साह और सौहार्द के साथ मनाया गया. इस अवसर पर शहर की फिजा 'लब्बैक या रसूल अल्लाह' की सदाओं से गूंज उठी. मरकजी सीरतुन्नबी कमेटी की निगरानी में निकाले गए जुलूस-ए-मोहम्मदिया में बड़ी संख्या में मुस्लिम समाज के लोगों ने हिस्सा लिया. पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद (स.अ.व.) की तालीमात को इंसानियत, अमन, सादगी, गरीबों, बेसहारा और जरूरतमंदों के अधिकारों तथा महिलाओं और बेटियों के सम्मान का संदेश बताते हुए शहरभर में मिलाद का जश्न मनाया गया
अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट  जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई
मरकजी कमेटी के सदर  'ईशान' शेख का जगह-जगह इस्तकबाल
जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के आयोजन में मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर जनाब ईरशाद (ईशान) शेख का विभिन्न चौक-चौराहों पर गर्मजोशी से स्वागत किया गया. मुस्लिम समाज के लोगों के साथ ही अन्य समाज के नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और राजनीतिक क्षेत्र से जुड़े लोगों ने भी फूलों की मालाएं व गुलदस्ते भेंट कर उनका इस्तकबाल किया. मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर ईरशाद (ईशान) शेख और कमेटी पदाधिकारियों ने जुलूस के सफल व शांतिपूर्ण आयोजन में सहयोग देने वाले पुलिस प्रशासन, सामाजिक संगठनों, विभिन्न समाजों के नागरिकों तथा सभी सहयोगियों का आभार व्यक्त किया.
परचमकुशाई और सलात-ओ-सलाम : जुलूस से पहले शहर की विभिन्न मस्जिदों में सुबह सादिक के समय नमाज-ए-फजर अदा की गई. इसके बाद परचमकुशाई की रस्म हुई
सब्ज पताकों, रोशनी और आकर्षक गेटों से सजा शहर
जश्न-ए-ईद मिलादुन्नबी को लेकर शहर के विभिन्न हिस्सों में विशेष सजावट की गई. प्रमुख मागों और मुस्लिम बहुल क्षेत्रों में सब्ज पताकाएं, आकर्षक रोशनी और स्वागत द्वार लगाए गए. कई स्थानों पर इस्लामी झांकियां भी तैयार की गईं, जिन्होंने लोगों का ध्यान आकर्षित किया. जुलूस-ए-मोहम्मदिया का समापन सुभाष स्कूल ग्राउंड में हुआ. इसके बाद सुभाष स्कूल ग्राउंड के साथ ही हुसैनी चौक, रामनगर और बाजार चौक में आम लंगर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने सहभागिता की.
जुलूस के दौरान अकीदतमंदों ने नात-ए-पाक पढ़ते हुए और दरूद-ओ-सलाम पेश करते हुए अपने नबी की आमद की खुशी का इजहार किया.
तथा पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) की विलादत के मौके पर सलात-ओ-सलाम का नजराना पेश किया गया.
अफसरी कादिर शेख 
जिला - गोंदिया
    user_Aaj ka Bharat News 24
    Aaj ka Bharat News 24
    गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सालेकसा तालुक्यात विविध पोलीस ठाणे व कॅम्प येथे भाजप महिला आघाडीतर्फे 'रक्षाबंधन कार्यक्रम' संपन्न; पोलिसांकडून भावना व्यक्त नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा: भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, सालेकसा तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) रोजी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात 'रक्षाबंधन कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. भाजप महिला आघाडी सालेकसाच्या तालुकाध्यक्ष सौ. संगीताताई कुरंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता संजय पुराम (माजी सभापती तथा सदस्य, जि.प. गोंदिया / प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र) यांनी केले होते. यावेळी आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागील १० वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना आपल्या नोकरीमुळे बऱ्याचदा रक्षाबंधनासारख्या सणापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या मनातील हीच उणीव व पोकळी भरून काढण्याकरिता हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्‍यक्रमाची वेळ व ठिकाणे: * सकाळी 10 वाजता: पोलीस स्टेशन सालेकसा * सकाळी 11 वाजता: पोलीस कॅम्प पिपरीया * दुपारी 12:30 वाजता: पोलीस कॅम्प दर्रेकसा * दुपारी 2 वाजता: पोलीस कॅम्प मुरकुरडोह * दुपारी 4 वाजता: पोलीस कॅम्प बिजेपार अधिकारी व पोलिसांची प्रतिक्रिया: या उपक्रमांतर्गत बेस कॅम्प मुरकुरडोह येथे भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस बांधवांना राखी बांधली. याविषयी बोलताना पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण (बेस कॅम्प मुरकुरडोह प्रभारी) यांनी सांगितले की, पोलिस खात्यात सतत बाहेर राहावे लागत असल्यामुळे आणि सुट्ट्या मिळत नसल्याने पोलिसांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करणे कठीण होते. परंतु, सौ. सविताताई पुराम आणि त्यांच्या महिला टीमने भेट देऊन आम्हा सर्वांना राखी बांधली, ज्यामुळे एक भावनिक पोकळी भरून निघाल्यासारखे वाटले. याप्रसंगी त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच, पीएसआय सतीश एन. शेळके (बटालियन क्रमांक ९ अमरावती) यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ते सतत नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी बाहेर असतात. अशा परिस्थितीत महिला आघाडीने कॅम्पवर येऊन जी रक्षारूपी ओढ व भावना व्यक्त केली आणि भर-भरून औक्षण केले, त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. आमगाव तालुका प्रतिनिधी: नरेश सुरेश बोपचे (Swarajyadoot)
    1
    सालेकसा तालुक्यात विविध पोलीस ठाणे व कॅम्प येथे भाजप महिला आघाडीतर्फे 'रक्षाबंधन कार्यक्रम' संपन्न; पोलिसांकडून भावना व्यक्त
नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे.
सालेकसा:
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, सालेकसा तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) रोजी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात 'रक्षाबंधन कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. भाजप महिला आघाडी सालेकसाच्या तालुकाध्यक्ष सौ. संगीताताई कुरंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता संजय पुराम (माजी सभापती तथा सदस्य, जि.प. गोंदिया / प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र) यांनी केले होते.
यावेळी आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागील १० वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना आपल्या नोकरीमुळे बऱ्याचदा रक्षाबंधनासारख्या सणापासून वंचित राहावे लागते. त्यांच्या मनातील हीच उणीव व पोकळी भरून काढण्याकरिता हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्‍यक्रमाची वेळ व ठिकाणे:
* सकाळी 10 वाजता: पोलीस स्टेशन सालेकसा
* सकाळी 11 वाजता: पोलीस कॅम्प पिपरीया
* दुपारी 12:30 वाजता: पोलीस कॅम्प दर्रेकसा
* दुपारी 2 वाजता: पोलीस कॅम्प मुरकुरडोह
* दुपारी 4 वाजता: पोलीस कॅम्प बिजेपार
अधिकारी व पोलिसांची प्रतिक्रिया:
या उपक्रमांतर्गत बेस कॅम्प मुरकुरडोह येथे भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस बांधवांना राखी बांधली. याविषयी बोलताना पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण (बेस कॅम्प मुरकुरडोह प्रभारी) यांनी सांगितले की, पोलिस खात्यात सतत बाहेर राहावे लागत असल्यामुळे आणि सुट्ट्या मिळत नसल्याने पोलिसांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करणे कठीण होते. परंतु, सौ. सविताताई पुराम आणि त्यांच्या महिला टीमने भेट देऊन आम्हा सर्वांना राखी बांधली, ज्यामुळे एक भावनिक पोकळी भरून निघाल्यासारखे वाटले. याप्रसंगी त्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
तसेच, पीएसआय सतीश एन. शेळके (बटालियन क्रमांक ९ अमरावती) यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ते सतत नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी बाहेर असतात. अशा परिस्थितीत महिला आघाडीने कॅम्पवर येऊन जी रक्षारूपी ओढ व भावना व्यक्त केली आणि भर-भरून औक्षण केले, त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.
आमगाव तालुका प्रतिनिधी: नरेश सुरेश बोपचे (Swarajyadoot)
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड
    4
    अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी

पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू
उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ :
अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली.
या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव
अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा?
या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
— प्रतिनिधी, उमरखेड
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू अलर्ट 🚨 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. नागपूरचे सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून दानापूर (बिहार)कडे सुखरूप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून केलेल्या पाठपुराव्यानंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी प्रवाशांच्या काठमांडूहून जनकपूरपर्यंतच्या प्रवासासाठी स्थानिक चार मिनी बसची व्यवस्था करून दिली. हे सर्व प्रवासी उद्या सकाळपर्यंत जनकपूर-बिहार सीमेवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जनकपूरहून दानापूरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू
अलर्ट 🚨
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू
नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांचा पुढील प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
नागपूरचे सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून दानापूर (बिहार)कडे सुखरूप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून केलेल्या पाठपुराव्यानंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी प्रवाशांच्या काठमांडूहून जनकपूरपर्यंतच्या प्रवासासाठी स्थानिक चार मिनी बसची व्यवस्था करून दिली.
हे सर्व प्रवासी उद्या सकाळपर्यंत जनकपूर-बिहार सीमेवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जनकपूरहून दानापूरपर्यंत त्यांच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील परतीच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे अडचणीत सापडलेल्या नागपूरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ‎मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
    1
    ‎मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी

शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी
चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी
शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी
धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले.
दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    10 hrs ago
  • दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली
    1
    दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार.....
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर....
दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार.....
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर....
अमरावती : -  जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.
श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली
    user_Pravin Zolekar Jounarlist...
    Pravin Zolekar Jounarlist...
    Local News Reporter अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.