नांदेडमध्ये १३ ते १८ मार्चदरम्यान ‘मिनी सरस रेणुका महोत्सव’; महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री! नांदेड, दि.१० : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने रेणुका महोत्सव २०२६ निमित्त मिनी सरस प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये बाजरीची खारोडी, व्हेज आम्लेट, अमरावतीची मांड्यावर मडक्यात तयार केलेली पुरणपोळी, बाजरीची भाकरी-बेसन-ठेचा, काजू, मँगो पल्प, पापड, कुरडई, विविध प्रकारची लोणची, मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, डाळी, मनुका आदी खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे. याशिवाय घोंगडी, बंजारा ड्रेस, कोल्हापुरी चप्पल, पुरुषांचे कपडे, साड्या, खेळणी, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, बेन्टेक्स दागिने, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, लाकडी वस्तू व भांडी अशा विविध वस्तूही विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. मेळाव्यात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंदही घेता येणार आहे. दर्जेदार साहित्य माफक दरात उपलब्ध असलेल्या या मेळाव्याला भेट देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक मेघना कावली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नांदेड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- Post by Nanded_71