logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्धा जिल्ह्यात, देवळी पोलिसांनी रेती माफियांविरुद्ध मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत ₹८,०७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २१.०६.२०२६ रोजी पहाटे ०५.२० ते ०५.५० वाजताच्या दरम्यान मौजा वायगाव शिवारातील सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर गोपनीय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध रेतीची (गौण खनिज) चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. यात शिरसगाव, ता. देवळी, जि. वर्धा येथील गौरव अशोकराव गोडे (वय ३०) आणि सोनेगाव बाई, ता. देवळी, जि. वर्धा येथील प्रज्वल कवदुजी कोहळे (वय २१) यांचा समावेश आहे. हे आरोपी विनापास परवाना शासनाचा महसूल बुडवून रेतीची वाहतूक करत होते. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल सा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे सा, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले (उपविभाग पुलगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे, तसेच पोहवा. गणेश बावणे (ब.नं. ६०९), पोशी. पंकज चामचोर (ब.नं. ३६७), आणि पोशी. अनिकेत तळवेकर (ब.नं. ३६४) यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. आरोपींविरुद्ध अप. क्रमांक ४४४/२६ कलम ३०३(२), ३(५) बी.एनएस ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम १८१, १३०, १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोहवा. गणेश बावणे करत आहेत.

2 hrs ago
user_राजेंद्र वामनराव खंडारे
राजेंद्र वामनराव खंडारे
आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago
963f1e0d-1912-4650-a8de-2ccc9e13961f

वर्धा जिल्ह्यात, देवळी पोलिसांनी रेती माफियांविरुद्ध मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत ₹८,०७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २१.०६.२०२६ रोजी पहाटे ०५.२० ते ०५.५० वाजताच्या दरम्यान मौजा वायगाव शिवारातील सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर गोपनीय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध रेतीची (गौण खनिज) चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. यात शिरसगाव, ता. देवळी, जि. वर्धा येथील गौरव अशोकराव गोडे (वय ३०) आणि सोनेगाव बाई, ता. देवळी, जि. वर्धा येथील प्रज्वल कवदुजी कोहळे (वय २१) यांचा समावेश आहे. हे आरोपी विनापास परवाना शासनाचा महसूल बुडवून रेतीची वाहतूक करत होते. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल सा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे सा, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले (उपविभाग पुलगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे, तसेच पोहवा. गणेश बावणे (ब.नं. ६०९), पोशी. पंकज चामचोर (ब.नं. ३६७), आणि पोशी. अनिकेत तळवेकर (ब.नं. ३६४) यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. आरोपींविरुद्ध अप. क्रमांक ४४४/२६ कलम ३०३(२), ३(५) बी.एनएस ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम १८१, १३०, १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोहवा. गणेश बावणे करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    1
    बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी, अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २२ जूनपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत, धामणगांव रेल्वे येथील दत्तापूर पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध विशेष जनजागृती आणि कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि भविष्यात नेहमी हेल्मेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुचाकी चालकांसोबतच, मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात करून विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. पोलिस प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे, कारण हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे. दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना असा संदेश दिला आहे की, हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे, कारण आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    1
    रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी, अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार २२ जूनपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत, धामणगांव रेल्वे येथील दत्तापूर पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध विशेष जनजागृती आणि कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि भविष्यात नेहमी हेल्मेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुचाकी चालकांसोबतच, मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात करून विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली.

पोलिस प्रशासनाने नागरिकांना स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले आहे, कारण हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे. दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना असा संदेश दिला आहे की, हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे, कारण आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणासाठी हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    35 min ago
  • अमरावती शहरातील सरस्वती नगरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
    1
    अमरावती शहरातील सरस्वती नगरात घडलेल्या मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • औरंगाबादमधील तरुणांनी नाझिया इलाही खान यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे. नाझिया इलाही खान यांच्यावर नबी-ए-पाक यांच्या सन्मानाला कथित धक्का पोहोचवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
    1
    औरंगाबादमधील तरुणांनी नाझिया इलाही खान यांच्या विरोधात पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे. नाझिया इलाही खान यांच्यावर नबी-ए-पाक यांच्या सन्मानाला कथित धक्का पोहोचवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसभर शहरात सूर्य आग ओकत होता आणि तापमान ४२.६ अंश सेल्सिअस होते, ज्यामुळे तीव्र उष्णता जाणवत होती. हवामान खात्याने दोन दिवसांत विदर्भात पाऊस सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले होते, आणि त्याच दिवशी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी केली व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची दमदार सुरुवात झाली.
    1
    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसभर शहरात सूर्य आग ओकत होता आणि तापमान ४२.६ अंश सेल्सिअस होते, ज्यामुळे तीव्र उष्णता जाणवत होती. हवामान खात्याने दोन दिवसांत विदर्भात पाऊस सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले होते, आणि त्याच दिवशी सायंकाळी आकाशात ढगांनी गर्दी केली व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची दमदार सुरुवात झाली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वडकी येथील कृषी केंद्र चालकांनी पुढाकार घेत वरुण राजाला साकडे घातले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने 'धोंडी धोंडी पाणी दे...' असा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली आणि गजाननाला पावसासाठी प्रार्थना केली. या मिरवणुकीत कृषी केंद्र चालकांसह शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गांवरून ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवळ यावी आणि खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, यासाठी वरुण राजासह गजाननाला प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीनंतर वडकी बस स्थानक परिसरात उपस्थित नागरिक व प्रवाशांसाठी भोजनदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'अन्नदाता सुखी राहावा, शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद यावा आणि पावसाने सर्व संकटे दूर करावीत,' अशी भावना व्यक्त करण्यात आली, कारण शेतकऱ्यांसाठी पाऊस केवळ पाणी नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. बियाणे आणि खतांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा असून, विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी केंद्र चालकांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता शेतकरी बांधवांच्या समस्येशी जोडलेली सामाजिक भावना या उपक्रमातून दाखवून दिली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे वडकी परिसरात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. निसर्गाच्या कृपेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
    1
    राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वडकी येथील कृषी केंद्र चालकांनी पुढाकार घेत वरुण राजाला साकडे घातले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने 'धोंडी धोंडी पाणी दे...' असा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली आणि गजाननाला पावसासाठी प्रार्थना केली.

या मिरवणुकीत कृषी केंद्र चालकांसह शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गांवरून ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवळ यावी आणि खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, यासाठी वरुण राजासह गजाननाला प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीनंतर वडकी बस स्थानक परिसरात उपस्थित नागरिक व प्रवाशांसाठी भोजनदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'अन्नदाता सुखी राहावा, शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद यावा आणि पावसाने सर्व संकटे दूर करावीत,' अशी भावना व्यक्त करण्यात आली, कारण शेतकऱ्यांसाठी पाऊस केवळ पाणी नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे.

बियाणे आणि खतांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा असून, विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी केंद्र चालकांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता शेतकरी बांधवांच्या समस्येशी जोडलेली सामाजिक भावना या उपक्रमातून दाखवून दिली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे वडकी परिसरात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. निसर्गाच्या कृपेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात दस्त क्रमांक 1825 च्या नामांतरण प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेषराव तुकाराम यावले यांनी दावा केला आहे की, त्यांनी 24 ऑक्टोबर 2016 रोजीच्या नोंदणीकृत विक्री दस्तऐवजाच्या (दस्त क्रमांक 1825) आधारे नामांतरणासाठी (फेरफार) आवश्यक कागदपत्रे संबंधित तलाठी विलास डवरे यांच्याकडे वेळेवर सादर केली होती. यावले यांच्या आरोपानुसार, त्यांच्या नावावर नामांतरण नोंदवण्याऐवजी प्रवीण संतोष मदनकर यांच्या नावावर नामांतरण करण्यात आले. ही कथित अनियमितता त्यांना सुमारे दहा वर्षांनी, जेव्हा त्यांनी 7/12 उतारा प्राप्त केला, तेव्हा लक्षात आली. यावले यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून 7/12 उताऱ्यामध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे नरखेड तहसीलमध्ये महसूल विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक या प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकरण अशा जिल्ह्यात घडले आहे, जो राज्याच्या महसूल मंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. त्यामुळे आता नरखेड तहसीलसह संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे की, महसूल मंत्री या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक कारवाई सुनिश्चित करतील का? या संदर्भात, SDM पियुष चीवंदे यांनी सांगितले आहे की, ते तलाठी विलास डवरे यांना कारणे दाखवा नोटीस (शॉ कॉज नोटीस) बजावत आहेत आणि जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
    1
    नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात दस्त क्रमांक 1825 च्या नामांतरण प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेषराव तुकाराम यावले यांनी दावा केला आहे की, त्यांनी 24 ऑक्टोबर 2016 रोजीच्या नोंदणीकृत विक्री दस्तऐवजाच्या (दस्त क्रमांक 1825) आधारे नामांतरणासाठी (फेरफार) आवश्यक कागदपत्रे संबंधित तलाठी विलास डवरे यांच्याकडे वेळेवर सादर केली होती.

यावले यांच्या आरोपानुसार, त्यांच्या नावावर नामांतरण नोंदवण्याऐवजी प्रवीण संतोष मदनकर यांच्या नावावर नामांतरण करण्यात आले. ही कथित अनियमितता त्यांना सुमारे दहा वर्षांनी, जेव्हा त्यांनी 7/12 उतारा प्राप्त केला, तेव्हा लक्षात आली. यावले यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून 7/12 उताऱ्यामध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे नरखेड तहसीलमध्ये महसूल विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक या प्रकरणाची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकरण अशा जिल्ह्यात घडले आहे, जो राज्याच्या महसूल मंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जातो. त्यामुळे आता नरखेड तहसीलसह संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे की, महसूल मंत्री या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक कारवाई सुनिश्चित करतील का?

या संदर्भात, SDM पियुष चीवंदे यांनी सांगितले आहे की, ते तलाठी विलास डवरे यांना कारणे दाखवा नोटीस (शॉ कॉज नोटीस) बजावत आहेत आणि जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वर्ध्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) एका देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिनांक २०/०६/२०२६ रोजी झालेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा परिसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर करण्यात आली. AHTC, वर्धा येथे गोपनीय माहिती मिळाली होती की, सावंगी (मेघे), वर्धा येथील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील व परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत होती. ती या मुलींना कृष्णाई कोर्ट बिल्डिंग, सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावून ग्राहकांसोबत संपर्क साधून देहव्यापार करून घेत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री विनोद चौधरी यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या सूचना व निर्देशानुसार, अत्यंत गोपनीयतेने बनावट ग्राहक (पंटर) तयार करण्यात आला. बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर, AHTC, वर्धा पथकाने कृष्णाई कोर्ट बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३ वर धाड टाकली. या धाडीत राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय २१, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) नावाचा आरोपी आढळून आला. फ्लॅटची झडती घेतली असता, एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करत असताना मिळून आले. पीडित महिलेने चौकशीत सांगितले की ती बाहेरच्या राज्यातील असून, मुस्कान उर्फ शबनमने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले होते. आरोपी मुस्कानने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आणि जागेची देखरेख करण्यासाठी राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार यास ठेवल्याचे दिसून आले. आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ८,०००/- रुपये रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन, वर्धा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असून, महिला आरोपी मुस्कान उर्फ शबनम हिचा शोध सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख (सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    1
    वर्ध्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) एका देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिनांक २०/०६/२०२६ रोजी झालेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा परिसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर करण्यात आली.

AHTC, वर्धा येथे गोपनीय माहिती मिळाली होती की, सावंगी (मेघे), वर्धा येथील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील व परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत होती. ती या मुलींना कृष्णाई कोर्ट बिल्डिंग, सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावून ग्राहकांसोबत संपर्क साधून देहव्यापार करून घेत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री विनोद चौधरी यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या सूचना व निर्देशानुसार, अत्यंत गोपनीयतेने बनावट ग्राहक (पंटर) तयार करण्यात आला.

बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर, AHTC, वर्धा पथकाने कृष्णाई कोर्ट बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३ वर धाड टाकली. या धाडीत राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय २१, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) नावाचा आरोपी आढळून आला. फ्लॅटची झडती घेतली असता, एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करत असताना मिळून आले. पीडित महिलेने चौकशीत सांगितले की ती बाहेरच्या राज्यातील असून, मुस्कान उर्फ शबनमने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले होते. आरोपी मुस्कानने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आणि जागेची देखरेख करण्यासाठी राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार यास ठेवल्याचे दिसून आले.

आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ८,०००/- रुपये रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन, वर्धा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असून, महिला आरोपी मुस्कान उर्फ शबनम हिचा शोध सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख (सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.