तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे बावड्यात तोफांच्या सलामीत स्वागत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूच्या दिशेने परतीच्या वाटेवर इंदापूर प्रतिनिधी/ ता :३१ बातमीदार गणेश कांबळे पंढरपूरातील गोपाळपूर येथे गोपाळकाला उरकल्यावर श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांनी पंढरपूरातून परतीचा प्रवासाला सुरुवात केली .पहाटे पासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे ४०० संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या.त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम वाखरी (ता.पंढरपूर) येथे पार पडला तर (दि ३०) जुलै रोजी तुकोबांच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम महाळुंग (ता. माळशिरस) येथे होता.त्यानंतर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवार (दि.31) जुलै रोजी दुपारी 12 वाजता सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये निरा नदी ओलांडून सराटी (ता. इंदापूर) येथे प्रवेश केल्या नंतर येथील ग्रामस्थांनी पालखीचे भक्ति भावाने स्वागत केले. यावेळी महेश काका जगदाळे यांच्या निवासस्थानी पालखी विसाव्यासाठी थांबली असता सराटीतील भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ सुरेश भाऊ जगदाळे, रवींद्र जगदाळे, भारत आबा जगदाळे अशोक जगदाळे, मनोज जगदाळे अभिजीत जगदाळे, शिवप्रसाद जगदाळे, अमर जगदाळे, यशराज जगदाळे, या सगळ्यांनी पालखी विश्वस्त,अकलूज पोलीस स्टेशन व बावडा पोलीस स्टेशन अधिकारी या सगळ्यांचा सन्मान केला. तुकोबांची पालखी विसाव्यासाठी थांबली असता सर्व वारकरी संप्रदायांना जेवणाची सोय करण्यात आली होती. जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा परतीच्या वाटेवर देहूला निघाला असता बावडा येथील शाहू महाराज चौकात आल्या नंतर संत तुकाराम महाराज पालखीचे तोफांच्या सलामीत स्वागत करण्यात आले. यावेळी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. ह.भ.प. उमेश मोरे महाराज, दिलीप मोरे महाराज, भानुदास मोरे महाराज, श्री. ह.भ.प.बापू साहेब मोरे यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे तसेच बावडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, सदाशिव कदम, निलेश घोगरे, विकास धायगुडे, रोहित होनमाने, विशाल घाडगे, सुयश लोखंडे, नाना सांगवे, सोनू घाडगे, बाळासाहेब लोंढे, रोहित कांबळे, बाळू कांबळे, दादा डाळिंबे, अभिजित चव्हाण, समर्थ लोखंडे, हर्षराज घाडगे, रमेश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, शुभम बोडरे इत्यादी उपस्थित होते. या तुकोबांच्या पालखी सोहळ्याने हिवरकर वस्ती येथे दुपारचा विसावा घेतला. या ठिकाणी पालखी सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती. दुपारचे भोजन व विसाव्या नंतर तुकोबांच्या पालखी सोहळ्याने देहूच्या दिशेने परतीच्या वाटेवर वडापुरीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पुढील प्रमाणे (दि ३०) जुलै रोजी म्हाळुंग रात्रीचा मुक्काम, (दि. ३१) जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील वडापुरी येथे मुक्काम, (दि ०१ ऑगस्ट )रोजी पालखीचा लासुर्णे येथे मुक्काम, (दि.०२ ऑगस्ट) रोजी बऱ्हाणपूर (श्री मारुती मंदिर), (दि.०३ ऑगस्ट ) रोजी हिंगणीगाडा (श्री विठ्ठल मंदिर), (दि.०४ ) ऑगस्ट वरवंड (श्री विठ्ठल मंदिर), (दि.०५ )ऑगस्ट कुंजीरवाडी फाटा, (दि ०६ ) ऑगस्ट पुणे – नवी पेठ (श्री विठ्ठल मंदिर), (दि ०७ )ऑगस्ट रोजी पुणे – नवी पेठ (दिवसभर मुक्कामी ), (दि०८ ) ऑगस्ट रोजी पिंपरी गाव (श्री भैरवनाथ मंदिर) याप्रमाणे मुक्काम करून श्री क्षेत्र देहूला जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (दि.०९ ) ऑगस्ट रोजी हा पालखी सोहळा पोहचणार आहे. चौकट पूर्वी जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या वाटेवर असताना पालखी सोहळ्यामध्ये वारकरी बांधवांची संख्या अत्यंत कमी असत व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये देखील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासा दरम्यान नागरिकां चाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त श्री ह.भ.प. उमेश मोरे महाराज यांनी दिली.
तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे बावड्यात तोफांच्या सलामीत स्वागत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूच्या दिशेने परतीच्या वाटेवर इंदापूर प्रतिनिधी/ ता :३१ बातमीदार गणेश कांबळे पंढरपूरातील गोपाळपूर येथे गोपाळकाला उरकल्यावर श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांनी पंढरपूरातून परतीचा प्रवासाला सुरुवात केली .पहाटे पासूनच एका मागोमाग एक अशा विविध सुमारे ४०० संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या.त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम वाखरी (ता.पंढरपूर) येथे पार पडला तर (दि ३०) जुलै रोजी तुकोबांच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम महाळुंग (ता. माळशिरस) येथे होता.त्यानंतर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवार (दि.31) जुलै रोजी दुपारी 12 वाजता सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये निरा नदी ओलांडून सराटी (ता. इंदापूर) येथे प्रवेश केल्या नंतर येथील ग्रामस्थांनी पालखीचे भक्ति भावाने स्वागत केले. यावेळी महेश काका जगदाळे यांच्या निवासस्थानी पालखी विसाव्यासाठी थांबली असता सराटीतील भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ सुरेश भाऊ जगदाळे, रवींद्र जगदाळे, भारत आबा जगदाळे अशोक जगदाळे, मनोज जगदाळे अभिजीत जगदाळे, शिवप्रसाद जगदाळे, अमर जगदाळे, यशराज जगदाळे, या सगळ्यांनी पालखी विश्वस्त,अकलूज पोलीस स्टेशन व बावडा पोलीस स्टेशन अधिकारी या सगळ्यांचा सन्मान केला. तुकोबांची पालखी विसाव्यासाठी थांबली असता सर्व वारकरी संप्रदायांना जेवणाची सोय करण्यात आली होती. जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा परतीच्या वाटेवर देहूला निघाला असता बावडा येथील शाहू महाराज चौकात आल्या नंतर संत तुकाराम महाराज पालखीचे तोफांच्या सलामीत स्वागत करण्यात आले. यावेळी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. ह.भ.प. उमेश मोरे महाराज, दिलीप मोरे महाराज, भानुदास मोरे महाराज, श्री. ह.भ.प.बापू साहेब मोरे यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे तसेच बावडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित
घाडगे, सदाशिव कदम, निलेश घोगरे, विकास धायगुडे, रोहित होनमाने, विशाल घाडगे, सुयश लोखंडे, नाना सांगवे, सोनू घाडगे, बाळासाहेब लोंढे, रोहित कांबळे, बाळू कांबळे, दादा डाळिंबे, अभिजित चव्हाण, समर्थ लोखंडे, हर्षराज घाडगे, रमेश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, शुभम बोडरे इत्यादी उपस्थित होते. या तुकोबांच्या पालखी सोहळ्याने हिवरकर वस्ती येथे दुपारचा विसावा घेतला. या ठिकाणी पालखी सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती. दुपारचे भोजन व विसाव्या नंतर तुकोबांच्या पालखी सोहळ्याने देहूच्या दिशेने परतीच्या वाटेवर वडापुरीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास पुढील प्रमाणे (दि ३०) जुलै रोजी म्हाळुंग रात्रीचा मुक्काम, (दि. ३१) जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील वडापुरी येथे मुक्काम, (दि ०१ ऑगस्ट )रोजी पालखीचा लासुर्णे येथे मुक्काम, (दि.०२ ऑगस्ट) रोजी बऱ्हाणपूर (श्री मारुती मंदिर), (दि.०३ ऑगस्ट ) रोजी हिंगणीगाडा (श्री विठ्ठल मंदिर), (दि.०४ ) ऑगस्ट वरवंड (श्री विठ्ठल मंदिर), (दि.०५ )ऑगस्ट कुंजीरवाडी फाटा, (दि ०६ ) ऑगस्ट पुणे – नवी पेठ (श्री विठ्ठल मंदिर), (दि ०७ )ऑगस्ट रोजी पुणे – नवी पेठ (दिवसभर मुक्कामी ), (दि०८ ) ऑगस्ट रोजी पिंपरी गाव (श्री भैरवनाथ मंदिर) याप्रमाणे मुक्काम करून श्री क्षेत्र देहूला जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (दि.०९ ) ऑगस्ट रोजी हा पालखी सोहळा पोहचणार आहे. चौकट पूर्वी जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या वाटेवर असताना पालखी सोहळ्यामध्ये वारकरी बांधवांची संख्या अत्यंत कमी असत व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये देखील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासा दरम्यान नागरिकां चाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त श्री ह.भ.प. उमेश मोरे महाराज यांनी दिली.
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.3
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1