साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्यकर्तृत्वात शोभेल असे स्मारक आज सांगलीमध्ये नाहीये या गोष्टीची खंत आज सांगलीकरांमध्ये आहे. *साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा व स्मारक संदर्भातील ठराव व महत्त्वाची कागदपत्रे महापौर धीरज सूर्यवंशी यांना सुपुत्र ...* साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्यकर्तृत्वात शोभेल असे स्मारक आज सांगलीमध्ये नाहीये या गोष्टीची खंत आज सांगलीकरांमध्ये आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असतानाही जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्यांचा अधिकृत पुतळा व स्मारक नाहीये तसेच कोणते मुख्य चौकास त्यांचे नाव नाहीये. गेले कित्येक वर्ष पुतळा परिसर सुशोभीकरणाची मागणी अनेक पक्ष संघटनांची आहे . पण सदर मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम काही मंडळी करत आहेत. सुरुवातीच्या काळात आमदार सुधीर दादा गाडगीळ, जेष्ठ नेते मा. शेखर इनामदार साहेब, माजी मंत्री आम. मा.जयंत पाटील साहेब, व माजी मंत्री आम मा. विश्वजीत कदम यांनी या सर्व गोष्टी संदर्भात सहकार्य केले होते. अजून बरेसच काम बाकी आहे. पण काही दिवसाआधी आम्ही महापौर मा. धीरज सूर्यवंशी व मा. सभापती अतुल माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं होतं, या निवेदनाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापौर साहेब आले होते.त्यावेळी त्यांनी अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक यासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही मला आणून द्या, येत्या महासभेत पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम आपण मार्गी लावू असे ते म्हणाले. त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना पुतळा व स्मारक संदर्भात लागणारी महत्वाची कागदपत्रे सुपुत्र केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीत युवा नेते मा. आकाश तिवडे (मेजर), दलित मित्र मा. अशोक पवार सर, सामाजिक कार्यकर्ते मा.अर्जुन कांबळे, जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक मा. गॅब्रिएल तिवडे, स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक मा. प्रशांत सदामते, युवा नेते मा. संदीप थोरात, युवा नेते मा. अमित भोसले, माजी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष मा. जितेंद्र हेगडे, युवा नेते मा.श्रीकांत साठे, युवा नेते मा. किरण देवकुळे, युवा नेते मा. अजित सदामते, तसेच नगरसेवक मा. रवींद्र सदामते व नगरसेवक मा. दीपक वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते मा.सॅमसन तिवडे यांच्यासोबत समाज कल्याण खात्यातील निधी संदर्भात चर्चा करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्यकर्तृत्वात शोभेल असे स्मारक आज सांगलीमध्ये नाहीये या गोष्टीची खंत आज सांगलीकरांमध्ये आहे. *साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा व स्मारक संदर्भातील ठराव व महत्त्वाची कागदपत्रे महापौर धीरज सूर्यवंशी यांना सुपुत्र ...* साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्यकर्तृत्वात शोभेल असे स्मारक आज सांगलीमध्ये नाहीये या गोष्टीची खंत आज सांगलीकरांमध्ये आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असतानाही जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्यांचा अधिकृत पुतळा व स्मारक नाहीये तसेच कोणते मुख्य चौकास त्यांचे नाव नाहीये. गेले कित्येक वर्ष पुतळा परिसर सुशोभीकरणाची मागणी अनेक पक्ष संघटनांची आहे . पण सदर मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम काही मंडळी करत आहेत. सुरुवातीच्या काळात आमदार सुधीर दादा गाडगीळ,
जेष्ठ नेते मा. शेखर इनामदार साहेब, माजी मंत्री आम. मा.जयंत पाटील साहेब, व माजी मंत्री आम मा. विश्वजीत कदम यांनी या सर्व गोष्टी संदर्भात सहकार्य केले होते. अजून बरेसच काम बाकी आहे. पण काही दिवसाआधी आम्ही महापौर मा. धीरज सूर्यवंशी व मा. सभापती अतुल माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं होतं, या निवेदनाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापौर साहेब आले होते.त्यावेळी त्यांनी अण्णाभाऊंचा पुतळा व स्मारक यासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही मला आणून द्या, येत्या महासभेत पुतळा परिसर सुशोभीकरणाचे काम आपण मार्गी लावू असे ते म्हणाले. त्या अनुषंगाने आज आम्ही
त्यांना पुतळा व स्मारक संदर्भात लागणारी महत्वाची कागदपत्रे सुपुत्र केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीत युवा नेते मा. आकाश तिवडे (मेजर), दलित मित्र मा. अशोक पवार सर, सामाजिक कार्यकर्ते मा.अर्जुन कांबळे, जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक मा. गॅब्रिएल तिवडे, स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक मा. प्रशांत सदामते, युवा नेते मा. संदीप थोरात, युवा नेते मा. अमित भोसले, माजी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष मा. जितेंद्र हेगडे, युवा नेते मा.श्रीकांत साठे, युवा नेते मा. किरण देवकुळे, युवा नेते मा. अजित सदामते, तसेच नगरसेवक मा. रवींद्र सदामते व नगरसेवक मा. दीपक वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते मा.सॅमसन तिवडे यांच्यासोबत समाज कल्याण खात्यातील निधी संदर्भात चर्चा करण्यात आली.
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता... #पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज #PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews1