माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार! अंजनगाव सुर्जी : माळी समाजातील विविध पोटशाखांना एका व्यापक संघटनात्मक व्यासपीठावर आणून सामाजिक एकजूट मजबूत करण्यासोबतच समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्याचा निर्धार अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत करण्यात आला. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित आणि संघटनात्मक विस्तार या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महासंघाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी मांदाडे, विदर्भ प्रमुख प्रवीणजी पेटकर आणि विदर्भ संघटक संजयजी वरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विदर्भ उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलरावजी नागतोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष प्रा. रुपेशजी फसाटे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजयजी वाघुळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. माळी समाजातील विविध पोटशाखांमध्ये समन्वय निर्माण करून सर्वांना एका संघटनेच्या माध्यमातून जोडण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजाची संघटनात्मक ताकद वाढल्यास समाजाच्या विविध प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडता येईल, तसेच गरजू समाजबांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करता येतील, यावर बैठकीत भर देण्यात आला. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक योजना, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. युवक-युवतींना शिक्षणासोबत रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आला. महिला सक्षमीकरण हा देखील बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरला. महिलांना लघुउद्योग, स्वयंरोजगार, विविध व्यवसाय, प्रशिक्षण तसेच शासकीय आर्थिक सहाय्याच्या योजनांची माहिती देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. महिला सक्षम झाल्यास कुटुंबासोबतच समाजाच्या विकासालाही मोठी चालना मिळू शकते, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. माळी समाजाचा शेतीशी असलेला पारंपरिक संबंध लक्षात घेता शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. शेतीपूरक जोडधंदे, शेती उपयोगी साहित्य, घरकुल योजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील पात्र शेतकरी व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पश्चिम जिल्हा अध्यक्षपदी गजाननभाऊ कविटकर, पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रशेखर देशमुख, पूर्व जिल्हा उपाध्यक्षपदी तुषारभाऊ वाढवणकर, तर अंजनगाव तालुका अध्यक्षपदी सुरजभाऊ पवार यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर ग्रामीण तसेच शहरी भागातील समाजबांधवांशी संपर्क वाढवून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याची आणि त्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्रस्थानी ठेवून आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस नारायणजी सांडे, मधूर जाधव यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात महासंघाचे संघटन अधिक मजबूत करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान वनहक्क दाव्यांना आता गती; १७ सप्टेंबरपासून राज्यभर विशेष अभियान पात्र वनपट्टेधारकांना ‘७/१२ ई’ उतारे देण्यास शासनाची कालबद्ध मोहीम; २ ऑक्टोबरपर्यंत दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट मुंबई : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यांच्या निपटाऱ्याला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यभर विशेष अभियान हाती घेतले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पात्र वनहक्कधारकांना वनहक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासह संबंधित नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची अधिकृत नोंद मिळावी, तसेच प्रलंबित दाव्यांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी महसूल यंत्रणेला विशेष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वनपट्टेधारकांच्या जमिनीशी संबंधित अभिलेख दुरुस्ती आणि हक्क नोंदणीच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विशेष अभियानाचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या कालावधीत संबंधित विभागांकडून प्रलंबित वनहक्क प्रकरणांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वनहक्कधारकांना आपल्या जमिनीवरील हक्काची अधिकृत कागदोपत्री नोंद मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वनहक्कधारकांसाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.1
- अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून देण्यासाठी अकोट तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने एक दिवसीय उपोषण अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट काँग्रेसच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे संदर्भात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांचे उत्पादन अत्यंत घटले असून शेतकरी व शेतमजूर गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक भागांमध्ये पिके पूर्णपणे हातची गेली असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाचे मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका काँग्रेस कमिटी व अकोट शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने प्रशांत पाचडे, अनोख राहणे, सारंग मालाणी, बादल अहिर, विकास देशमुख ,संजय आठवले, यांच्या उपस्थितीत अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सदर निवेदनातील मागण्या संपूर्ण अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ₹५०,००० आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना तातडीने व संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली स्थगित करून कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतमजुरांसाठी विशेष आर्थिक सहाय्य व रोजगार हमी योजनेंतर्गत अतिरिक्त कामे उपलब्ध करून द्यावीत.महसूल विभागामार्फत तातडीने पंचनामे करून वास्तविक नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित सर्व घटकांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे.शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर अफजल खान ,प्रमोद चोरे, पांडुरंग खवले, दिनेश ताडे, शिवदास मुऱ्हेकार, सय्यद कलीम, ओंकार टवलारे ,हैदर अली, महेंद्र पवार ,आजम खा पठाण ,केशव हेन्ड, सय्यद सोहेल अली, धनराज कहार, मोती तेजवानी ,रोशन चिंचोलकर, मिलिंद नितोने ,नुसरत अली, मिलिंद झाडे, अविनाश जायले, अचल बेलसरे, दशरथ खवले, राजु पंडित , अविनाश डिक्कर ,अफजल खान, शेख खाजा,अब्दुल जमिल अब्दुल खलिक, अब्दुल आबीद अब्दुल अहाब,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.4
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- अमरावतीत गणेश विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; २२ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था1
- धारणी में अवैध रेत माफियाओं की दबंगई: विरोध करने पर आदिवासी नेता पर ट्रैक्टर चढ़ाने का प्रयास, वीडियो वायरल1