logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोटर पंप चोरी करणारे रिसोड पोलीसांचे ताब्यात, २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त मोटर पंप चोरी करणारे रिसोड पोलीसांचे ताब्यात, २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त... रिसोड, शेती वापराकरीता वापरावयाचे इलेक्ट्रीक मोटर पंप चोर रिसोड पोलीसांचे ताब्यात २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त शेतकरी यांचे शेतातील मोटरपंप व इतर साहीत्य चोरीबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद आहेत सदर गुन्हे उघडकीस आणने व प्रतींबध करणे कामी पथकास परीसरात रवाना करून मोहीम राबविण्यात आली. दरम्याण ०४ इसम हे काळे पिवळे रंगाचे प्रवासी अॅटोमध्ये चोरी केलेल्या शेतात वापरावयाच्या पाण्यातील दोन मोटरपंप हे विक्री करीता वाशिम नाका रिसोड, येथे घेवुन येत आहेत. अशा माहीतीवरून त्यांना सापळा रचुन पकडण्यात आले. त्यांचे नाव १) अॅटो चालक नामे तेजराव दिपक तोडे वय २० वर्ष रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा २) ओम राजु बोरकर वय २१ वर्ष व्यवसाय मजुरी रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा ३) विजय भारत घाटोळे वय २६ वर्ष रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा ४) अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे वय २८ वर्ष रा गोरेगाव ता सेनगाव जि हिंगोली असे आहेत. तसेच अॅटोमध्ये त्यांचे जवळ शेतात वापरावयाच्या दोन इलेक्ट्रीक मोटरपंप मिळुन आले. सदर शेतातील वापरावयाचे मोटर पंप हे लोणार येथुन चोरी केल्याचे समजले आहे. तरी सदरचा प्रवासी अॅटो व शेतात वापरावयाच्या दोन इलेक्ट्रीक मोटरपंप एकुण कि २,००,००० रू चे ताब्यात घेवुन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत. सदरची कामगीरी वाशिम जिल्हयाचे पोलीस अधिक्षक मा श्री निकेश खाटमोडे (पाटील), मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामकृष्ण पवार यांचे मार्गदर्शनात पोस्टे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोउपनि सागर भारस्कर, पोकॉ विनोद घनवट, राजेश गांगवे, संतोष धोत्रे यांनी केली आहे.

20 hrs ago
user_Suresh Badrigiri Giri
Suresh Badrigiri Giri
Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
20 hrs ago
51c183bc-7aff-4cfd-90cc-6d0346738375

मोटर पंप चोरी करणारे रिसोड पोलीसांचे ताब्यात, २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त मोटर पंप चोरी करणारे रिसोड पोलीसांचे ताब्यात, २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त... रिसोड, शेती वापराकरीता वापरावयाचे इलेक्ट्रीक मोटर पंप चोर रिसोड पोलीसांचे ताब्यात २,००, ००० रूपयाचा मुददेमाल जप्त शेतकरी यांचे शेतातील मोटरपंप व इतर साहीत्य चोरीबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद आहेत सदर गुन्हे उघडकीस आणने व प्रतींबध करणे कामी पथकास परीसरात रवाना करून मोहीम राबविण्यात आली. दरम्याण ०४ इसम हे काळे पिवळे रंगाचे प्रवासी अॅटोमध्ये चोरी केलेल्या शेतात वापरावयाच्या पाण्यातील दोन मोटरपंप हे विक्री करीता वाशिम नाका रिसोड, येथे घेवुन येत आहेत. अशा माहीतीवरून त्यांना सापळा रचुन पकडण्यात आले. त्यांचे नाव १) अॅटो चालक नामे तेजराव दिपक तोडे वय २० वर्ष रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा २) ओम राजु बोरकर वय २१ वर्ष व्यवसाय मजुरी रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा ३) विजय भारत घाटोळे वय २६ वर्ष रा घरकुल लोणार ता लोणार जि बुलढाणा ४) अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे वय २८ वर्ष रा गोरेगाव ता सेनगाव जि हिंगोली असे आहेत. तसेच अॅटोमध्ये त्यांचे जवळ शेतात वापरावयाच्या दोन इलेक्ट्रीक मोटरपंप मिळुन आले. सदर शेतातील वापरावयाचे मोटर पंप हे लोणार येथुन चोरी केल्याचे समजले आहे. तरी सदरचा प्रवासी अॅटो व शेतात वापरावयाच्या दोन इलेक्ट्रीक मोटरपंप एकुण कि २,००,००० रू चे ताब्यात घेवुन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत. सदरची कामगीरी वाशिम जिल्हयाचे पोलीस अधिक्षक मा श्री निकेश खाटमोडे (पाटील), मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामकृष्ण पवार यांचे मार्गदर्शनात पोस्टे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोउपनि सागर भारस्कर, पोकॉ विनोद घनवट, राजेश गांगवे, संतोष धोत्रे यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    7 hrs ago
  • साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    1
    साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय!

१० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे.  सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    1
    कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. 
सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    1
    परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    2
    *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास*

वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.