logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने 'शास्त्रार्थ ३.०' युवा संसदेचे आयोजन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने 'शास्त्रार्थ ३.०' युवा संसदेचे आयोजन विदर्भातील पहिली युवा संसद; लोकशाही, नेतृत्व व धोरणात्मक चर्चेला चालना नागपूर : विदर्भातील अशा प्रकारची पहिली युवा संसद 'शास्त्रार्थ ३.०' नागपुरात आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा नेते, धोरणकर्ते आणि समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाची माहिती हिंमाशु बजाज यांनी पत्रपरिषदेत दिली. शास्त्रार्थ ३.० चे संस्थापक अध्यक्ष हिमांशू बजाज यांनी सांगितले की, हा उपक्रम भारतातील तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, सार्वजनिक चर्चेची संस्कृती आणि घटनात्मक जाणिवा विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. संसदीय कार्यपद्धतीच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या युवा संसदेत समकालीन राष्ट्रीय विषयांवर संरचित चर्चा, धोरणात्मक विचारमंथन आणि संसदीय सत्रांचे सिम्युलेशन करण्यात येणार आहे. 'युथ रिव्होल्यूशन समिट'च्या पुढाकारातून पॉलिटिकल अड्डा आणि कल्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, माय भारत (मेरा युवा भारत) तसेच युनायटेड नेशन्स मेजर ग्रुप फॉर चिल्ड्रन अँड युथ (UNMGCY) यांचा पाठिंबा लाभला आहे. याशिवाय नागपूर शहर पोलीस, ऑपरेशन थंडर आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांचेही सहकार्य लाभत आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, विदर्भातील संस्थात्मक पाठबळ असलेली ही पहिली युवा संसद असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून बौद्धिक आदान- प्रदान, नेतृत्व विकास, सार्वजनिक भाषणकला, चिकित्सक विचार, नागरी सहभाग आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेत यशस्वी आयोजनासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारी यंत्रणा आणि युवा संघटनांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

4 hrs ago
user_GS BHALERAO
GS BHALERAO
News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने 'शास्त्रार्थ ३.०' युवा संसदेचे आयोजन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने 'शास्त्रार्थ ३.०' युवा संसदेचे आयोजन विदर्भातील पहिली युवा संसद; लोकशाही, नेतृत्व व धोरणात्मक चर्चेला चालना नागपूर : विदर्भातील अशा प्रकारची पहिली युवा संसद 'शास्त्रार्थ ३.०' नागपुरात आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा नेते, धोरणकर्ते आणि समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाची माहिती हिंमाशु बजाज यांनी पत्रपरिषदेत दिली. शास्त्रार्थ ३.० चे संस्थापक अध्यक्ष हिमांशू बजाज यांनी सांगितले की, हा उपक्रम भारतातील तरुणांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, सार्वजनिक चर्चेची संस्कृती आणि घटनात्मक जाणिवा विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. संसदीय कार्यपद्धतीच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या युवा संसदेत समकालीन राष्ट्रीय विषयांवर संरचित चर्चा, धोरणात्मक विचारमंथन आणि संसदीय सत्रांचे सिम्युलेशन करण्यात येणार आहे. 'युथ रिव्होल्यूशन समिट'च्या पुढाकारातून पॉलिटिकल अड्डा आणि कल्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, माय भारत (मेरा युवा भारत) तसेच युनायटेड नेशन्स मेजर ग्रुप फॉर चिल्ड्रन अँड युथ (UNMGCY) यांचा पाठिंबा लाभला आहे. याशिवाय नागपूर शहर पोलीस, ऑपरेशन थंडर आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांचेही सहकार्य लाभत आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, विदर्भातील संस्थात्मक पाठबळ असलेली ही पहिली युवा संसद असून, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून बौद्धिक आदान- प्रदान, नेतृत्व विकास, सार्वजनिक भाषणकला, चिकित्सक विचार, नागरी सहभाग आणि पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेत यशस्वी आयोजनासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारी यंत्रणा आणि युवा संघटनांच्या सहकार्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एका वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    1
    एका वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मुंबईतून एक मागणी करण्यात आली आहे की, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांपासून दूर जाणारे प्रशासन नसावे, तर त्यांच्या आदर्शांवर चालणारे प्रशासन असावे. प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचे आणि तत्त्वांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    मुंबईतून एक मागणी करण्यात आली आहे की, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांपासून दूर जाणारे प्रशासन नसावे, तर त्यांच्या आदर्शांवर चालणारे प्रशासन असावे. प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचे आणि तत्त्वांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपूर शहर 'युथ पार्लमेंट शास्त्रार्थ 3.0' या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. हे आयोजन विदर्भातील पहिले युथ पार्लमेंट असणार आहे.
    1
    नागपूर शहर 'युथ पार्लमेंट शास्त्रार्थ 3.0' या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. हे आयोजन विदर्भातील पहिले युथ पार्लमेंट असणार आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भिवापूर तालुक्यातील पांढरवाणी येथील सौ. रज्जु विनोद बलकी या ४१ वर्षीय महिलेचे पती विनोद बलकी हे १३ वर्षांपूर्वी उमरेडकडे शेतीच्या कामासाठी निघून गेले आणि बेपत्ता झाले. २२ फेब्रुवारीला ते दुचाकी वाहनाने उमरेडला गेले होते, मात्र त्यांचे वाहन २४ फेब्रुवारीला वेवारस स्थितीत उमरेडला आढळून आले. विनोद यांचा शोध नातेवाईकांकडे व इतरत्र घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या आईने तक्रार दाखल केली होती. या कठीण परिस्थितीतही रज्जु बलकी यांनी धीर न गमावता मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि पतीच्या विरहाने खचून न जाता कमालीची हिम्मत दाखवली. सात वर्षांनंतर उमरेडच्या दिवाणी न्यायाधीशांनी विनोद ज्ञानेश्वर बलकी यांना मृत घोषित करण्याचे आदेश दिले, त्यानंतर १२ वर्षांनी त्यांना पतीच्या वाट्याला आलेली ८ एकर शेती ताब्यात मिळाली. या ८ एकर शेतीवरील पतीने घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज रज्जु बलकी यांनी आपल्या हिमतीवर फेडले. आता पुढील शेतीच्या हंगामासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असून, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्यांचे कर्ज मंजूरही केले आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती को. ऑप बँक, भिवापूर शाखा, हे कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप रज्जु बलकी यांनी केला आहे. ऐन शेतीच्या हंगामात पीक कर्ज न मिळाल्याने या विधवा शेतकरी महिलेपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या रज्जु बलकी यांनी बँक प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर त्यांना पीक कर्ज मिळाले नाही, तर त्या बँकेसमोर उपोषण करतील. या प्रकरणी, भिवापूरचे सहाय्यक निबंधक लिंगायतकर यांनी सांगितले की, सदर विधवा महिलेच्या पीक विमा कर्जाच्या प्रकरणाची माहिती झाली असून, योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदीप निबार्ते यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आर्थिक अडचणीत असलेल्या या विधवा शेतकरी महिलेला कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी भिवापूर तहसीलदारांकडे योग्य पाठपुरावा केला जाईल.
    1
    भिवापूर तालुक्यातील पांढरवाणी येथील सौ. रज्जु विनोद बलकी या ४१ वर्षीय महिलेचे पती विनोद बलकी हे १३ वर्षांपूर्वी उमरेडकडे शेतीच्या कामासाठी निघून गेले आणि बेपत्ता झाले. २२ फेब्रुवारीला ते दुचाकी वाहनाने उमरेडला गेले होते, मात्र त्यांचे वाहन २४ फेब्रुवारीला वेवारस स्थितीत उमरेडला आढळून आले. विनोद यांचा शोध नातेवाईकांकडे व इतरत्र घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या आईने तक्रार दाखल केली होती. या कठीण परिस्थितीतही रज्जु बलकी यांनी धीर न गमावता मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि पतीच्या विरहाने खचून न जाता कमालीची हिम्मत दाखवली. सात वर्षांनंतर उमरेडच्या दिवाणी न्यायाधीशांनी विनोद ज्ञानेश्वर बलकी यांना मृत घोषित करण्याचे आदेश दिले, त्यानंतर १२ वर्षांनी त्यांना पतीच्या वाट्याला आलेली ८ एकर शेती ताब्यात मिळाली.

या ८ एकर शेतीवरील पतीने घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज रज्जु बलकी यांनी आपल्या हिमतीवर फेडले. आता पुढील शेतीच्या हंगामासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असून, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्यांचे कर्ज मंजूरही केले आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती को. ऑप बँक, भिवापूर शाखा, हे कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप रज्जु बलकी यांनी केला आहे. ऐन शेतीच्या हंगामात पीक कर्ज न मिळाल्याने या विधवा शेतकरी महिलेपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या रज्जु बलकी यांनी बँक प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर त्यांना पीक कर्ज मिळाले नाही, तर त्या बँकेसमोर उपोषण करतील. या प्रकरणी, भिवापूरचे सहाय्यक निबंधक लिंगायतकर यांनी सांगितले की, सदर विधवा महिलेच्या पीक विमा कर्जाच्या प्रकरणाची माहिती झाली असून, योग्य प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदीप निबार्ते यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आर्थिक अडचणीत असलेल्या या विधवा शेतकरी महिलेला कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी भिवापूर तहसीलदारांकडे योग्य पाठपुरावा केला जाईल.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या १८ जुलै रोजी एका विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दाखल असलेल्या धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये दहा लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित दावे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संधीमुळे पक्षकारांना कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सामंजस्याने आपले वाद मिटवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रकरणांचा समावेश या विशेष लोक अदालतीमध्ये करून न्यायालयीन वाद सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे.
    1
    भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या १८ जुलै रोजी एका विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दाखल असलेल्या धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

या विशेष लोक अदालतीमध्ये दहा लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित दावे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संधीमुळे पक्षकारांना कमी खर्चात, कमी वेळेत आणि परस्पर सामंजस्याने आपले वाद मिटवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या प्रकरणांचा समावेश या विशेष लोक अदालतीमध्ये करून न्यायालयीन वाद सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भंडारा शहरातील ट्यूशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींवर नगर परिषदेने आता करडी नजर ठेवली आहे. अनेक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेची, बांधकाम परवानग्यांची आणि आवश्यक परवान्यांची कसून तपासणी केली जात आहे. नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
    1
    भंडारा शहरातील ट्यूशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींवर नगर परिषदेने आता करडी नजर ठेवली आहे. अनेक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेची, बांधकाम परवानग्यांची आणि आवश्यक परवान्यांची कसून तपासणी केली जात आहे. नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मुंबईमधून अशी भूमिका मांडण्यात आली आहे की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांपासून दूर जाणारे नव्हे, तर त्यांच्या आदर्शांवर चालणारे प्रशासन हवे.
    1
    मुंबईमधून अशी भूमिका मांडण्यात आली आहे की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांपासून दूर जाणारे नव्हे, तर त्यांच्या आदर्शांवर चालणारे प्रशासन हवे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.
    1
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी या गंभीर समस्येवर दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची आणि आधुनिक जलव्यवस्थापनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली.
    1
    आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी या गंभीर समस्येवर दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची आणि आधुनिक जलव्यवस्थापनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.