logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव : नशिराबाद शेतशिवारात २७ विद्युत खांबांवरील तारा चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नशिराबाद शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी तब्बल २७ विद्युत खांबांदरम्यान असलेल्या ॲल्युमिनियमच्या विद्युत तारा कापून चोरून नेल्या आहेत. या चोरीमुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद शिवारातील विविध शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरट्यांनी कापून नेली. फिर्यादी समाधान दिलावर कोतवाल हे नशिराबाद अर्बन विद्युत केंद्र येथे प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, नशिराबाद कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिनी व इतर साहित्याच्या देखरेखीचे काम पाहतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नशिराबाद विद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांना जितेंद्र महाजन यांचा फोन आला. त्यांच्या शेतातील विद्युत खांबांवरील तार दिसत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी नशिराबाद परिसरातील न्यू मुंजोबा डीटीसी क्रमांक ४२३९०६७ (भागपूर एजी फिडर) वरील तसेच संबंधित शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी गायब असल्याचे आढळून आले. अज्ञात व्यक्तींनी विद्युत तार कापून तोडून चोरून नेल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, तक्रार महाजन, वाय.जी. महाजन, सोपान पाटील तसेच जितेंद्र यशवंत महाजन यांच्या शेतातील आणि परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण २७ विद्युत खांबां दरम्यान असलेली ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या तारांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विद्युत विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तसेच संबंधित नागरिकांकडे चौकशी केली. मात्र चोरीबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी विद्युत विभागाची संमती न घेता व लबाडीच्या उद्देशाने विद्युत वाहिनी कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता एफआयआर क्रमांक ०२३७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपी म्हणून सध्या अज्ञात व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजेश बाबुराव मेढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

2 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
2 hrs ago

जळगाव : नशिराबाद शेतशिवारात २७ विद्युत खांबांवरील तारा चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नशिराबाद शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी तब्बल २७ विद्युत खांबांदरम्यान असलेल्या ॲल्युमिनियमच्या विद्युत तारा कापून चोरून नेल्या आहेत. या चोरीमुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद शिवारातील विविध शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरट्यांनी कापून नेली. फिर्यादी समाधान दिलावर कोतवाल हे नशिराबाद अर्बन विद्युत केंद्र येथे प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, नशिराबाद कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिनी व इतर साहित्याच्या देखरेखीचे काम पाहतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नशिराबाद विद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांना जितेंद्र महाजन यांचा फोन आला. त्यांच्या शेतातील विद्युत खांबांवरील तार दिसत नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी नशिराबाद परिसरातील न्यू मुंजोबा डीटीसी क्रमांक ४२३९०६७ (भागपूर एजी फिडर) वरील तसेच संबंधित शेतांमधील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी गायब असल्याचे आढळून आले. अज्ञात व्यक्तींनी विद्युत तार कापून तोडून चोरून नेल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, तक्रार महाजन, वाय.जी. महाजन, सोपान पाटील तसेच जितेंद्र यशवंत महाजन यांच्या शेतातील आणि परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण २७ विद्युत खांबां दरम्यान असलेली ॲल्युमिनियमची विद्युत वाहिनी चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या तारांची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विद्युत विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तसेच संबंधित नागरिकांकडे चौकशी केली. मात्र चोरीबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी विद्युत विभागाची संमती न घेता व लबाडीच्या उद्देशाने विद्युत वाहिनी कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०५ वाजता एफआयआर क्रमांक ०२३७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा (सुधारणा) २००३ मधील कलम १३६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपी म्हणून सध्या अज्ञात व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजेश बाबुराव मेढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    1
    पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी  परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे.
सी ओ पी  प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. 
म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो.
“पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले.
“महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी  प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे.
“पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली.
सी ओ पी  प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सी ओ पी  प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे.
पोलिसांनी सी ओ पी  परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. 
मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार?
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील.
“पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी  प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    14 min ago
  • जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    1
    जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज 
#जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Fruit & Vegetable Exporter जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    1
    नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    1
    जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    1
    Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
-
Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security
-
#DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    1
    ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity` Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
    1
    Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन
-
धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

`#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन
-
धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
`#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.