Shuru
Apke Nagar Ki App…
2002 SIR voter list PDF free AIMIM party Solapur. .
ईलियास नजीर शेख
2002 SIR voter list PDF free AIMIM party Solapur. .
More news from Maharashtra and nearby areas
- लातूर शहरात मागील काही दिवसापासून शहरवासीयांच्या नळाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्यातरी लातूरकरांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मनपात सत्तेत असलेक्या काँग्रेस पक्षा ला आणि मनपा प्रशासनाला गांभीर्य नसल्याने लातूर भाजपच्या वतीने आज लातूर महानगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत, लातूरकरांना स्वच्छ पाणी द्या लातूरकरांच आरोग्य वाचवा , मोफत सिटी बस सेवा पूर्ववत करा म्हणत आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात आले.1
- Post by विश्वगुरू वार्ता1
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील महिलांना 30 एप्रिल पर्यंत केवायसी करता येणार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेतील ज्या महिलांच्या के वाय सी. करण्यामध्ये काही चुका झाल्या होत्या त्यामुळे त्यांचे केवायसी झाले नाही. अशा लाडक्या बहिणींना येणाऱ्या 30 एप्रिल 2026 पर्यंत शासनाच्या माध्यमातून ऑनलाइन के वाय सी. करण्यासाठी मूदत वाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील ज्या महिलांच्या केवायसी करण्याचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर 30 एप्रिल पर्यंत के वाय सी. करून घेणे बंधनकारक आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्या मुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटाकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, भिमराव कुटे सह आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्या मुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्या नुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी या वेळी व्यक्त केली.1
- ग्रामपंचायत ची घंटा गाडी संपूर्ण गावात फिरते पण हा कचरा कोणालाच दिसेना सगळा कचरा उढून दारात येतोय घरामध्ये लहान 4 महिन्याचं लेकरू आहे3
- Post by AapTak Hindi News Channel1
- इचलकरंजीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चौतीस आरोपींना पकडण्यात आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा संपूर्ण बातमी.1
- _विक्रम शिंदे (भोर दि 6 )हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंचा ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष_ *पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे धर्मांधांचे षडयंत्र हाणून पाडा !* - आमदार टी. राजा सिंह *हडपसर (जिल्हा पुणे)* - हडपसरसारख्या भागात गोहत्या करणारे धर्मांध पोलिसांसमोरच गोरक्षकांना चोप देत आहेत आणि धर्मांध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दगडफेक करत आहेत. स्थिती अशीच राहिली, तर हिंदूंच्या मुलांचे भवितव्य अंध:कारमय आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे षडयंत्र हिंदूंनी जागरूक राहून हाणून पाडले पाहिजे. हिंदूंमध्ये सुप्त झालेले क्षात्रतेज त्यांना आता जागृत करावे लागेल, असे आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी केले. ते ५ एप्रिल या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदूंच्या संघटिपणाचा अविष्कार दाखवून दिला. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली! प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित श्री. प्रीतम तिखेगुरुजी आणि पुरोहित श्री. अरुण भिसेगावकर गुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले, तर समितीच्या कार्याच्या परिचय श्री. पराग गोखले यांनी करून दिला. या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. *‘मायनॉरिटी फंड’ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरा ! - आमदार टी. राजासिंह* या प्रसंगी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘यापुढील काळात हिंदूंनी जातींमध्ये विभाजित न रहाता ‘मी हिंदू’ आहे या भावनेने एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यांची विचारसरणी ‘गजवा-ए-हिंद’ची आहे, त्यांना हिंदूंना पैसा का म्हणून द्यावा. त्यामुळे धर्मांध-जिहादी यांच्याकडून कोणतीही खरेदी करू नका. धर्मांधांची आर्थिक रसद कापली, तर ‘लव्ह जिहाद’ ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराची विषवल्ली आपोआप नष्ट होईल. हिंदूंच्या घामाचा पैसा ‘मायनॉरिटी फंड’च्या नावाने अल्पसंख्यांकांवर उधळला जात आहे. हा निधी तात्काळ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा, अशी आमची मागणी आहे.’’ *हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था* हिंदुत्वामुळे देश पिछाडीवर जाईल असा अपप्रचार केला जातो; मात्र हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. असे असले, तरी २ दशकांपूर्वी जिहादी आतंकवाद लपवण्यासाठी हिंदु आतंकवाद, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे एक ‘टूलकिट’ होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट, मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. याच प्रकारे सनातनचे साधक समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर यांचा तपास यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली बदनामी यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यामुळे त्यांचे झालेले निधन हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. याला हिंदूंनी विरोध केला पाहिजे! *हिंदूंची श्रद्धास्थाने, मंदिरे यांना अपवित्र करणार्या धर्मांधांना प्रतिबंधित करा ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती* पुणे शहरात पुरंदर भागात ‘लँड जिहाद’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक मंदिरांमध्ये मूर्तीची विटंबना होत असून या घटना दडपण्याठी पोलीस धर्मांध आरोपींना माथेफिरू ठरवत आहेत. प्रत्येक घटनेत आरोपी ‘माथेफिरू’, कसा असू शकेल? तरी मंदिरांच्या संदर्भात वारंवार घडणार्या या घटनांमागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलीस अनेक घटनांमध्ये जीवावर उदार होऊन गोरक्षण करणार्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करून कसायांना मात्र मोकाट सोडत आहे, अशा अनेक तक्रार यापुढील काळात असे प्रकार होता कामा नयेत. पुण्यातील हिंदूंची मंदिरे, सारसबागेत होणारी धर्मांधांची घुसखोरी यांसह अनेक ठिकाणी धर्मांधांची मुजोरी वाढत आहे. तरी धर्मांधांच्या वाढत्या कारवाया रोखून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर येण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा यांसाठी, तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी येणार्या १५ दिवसांत एक भव्य आंदोलन घेण्यात येणार आहे. प्रत्येक शहर, गाव येथील बांगलादेशी घुसखोर शोधणे आवश्यक असून या मोहिमेला गती येण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याचा ठराव होणे आवश्यक आहे.’’ *उपस्थित मान्यवर* - माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, भाजप पुणे कँटोन्मेंटचे सरचिटणीस श्री. समीर शेंडकर, भाजप नगरसेवक श्री. मारुति (आबा) तुपे, भाजप नगरसेवक श्री. राजेंद्र काशिनाथ भिताडे, भाजप नगरसेविका सौ. उज्वला जंगले, भाजप नगरसेविका सौ. प्राची अल्हाट, भाजप पुणे सरचिटणीस श्री. बाळासाहेब घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल, शिवसेना नगरसेविका सौ. मोनिका निलेश पवार, शिवसेनेचे नगरसेवक श्री. गणेश कामठे, उरळी देवाची येथील शिवसेना नगरसेविका शारदा भैरु भाडळे (माई) प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक सणस, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कल्पना धनंजय हांडे, सौ. सुवर्णा खर्चे, उद्योजक श्री. कृष्णानंद नाईक, हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र घुले, ह. भ. प. तुषार महाराज चौधरी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चौरघे महाराज *संत* - पू. पप्पाजी पुराणिक, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनिषा पाठक आणि पू. (सौ.) अंजली करंबेळकर, आदरणीय सौ. सरस्वती अमृतकरताई, ‘वेद वासुदेव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अजित तुकदेव *विशेष* १. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सनातनच्या ‘विवाहसंस्कार - शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’ आणि ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’ या ग्रंथांच्या मराठी भाषेतील ‘ऑनलाईन’ आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. २. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी आमदार टी. राजा सिंह यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र भेट दिले. *हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणार्या धर्मवीरांचा सत्कार - १८ सहस्रपेक्षा अधिक गोवंशांना जीवदान देणारे श्री. ऋषिकेश कामथे यांचा आमदार टी. राजा सिंह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.1