बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सांग शिरला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील शेतकऱ्यांना बियाण्यामुळे मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुकीच्या वाणाच्या बियाण्यामुळे टरबूज पिकाचे तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्ला नेमाने येथील शेतकरी किरण प्रताप चव्हाण, अनिकेत नेमाने आणि अक्षय नेमाने यांनी देऊळगाव मही येथील गणेश कृषी केंद्रातून सागर बायो प्रा. लि. कंपनीचे EXPERT वाण खरेदी केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्यक्षात सागर किंग प्लस हे टरबूज वाण मागितले होते. मात्र कृषी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी EXPERT वाण चांगले उत्पादन देते असे सांगून तेच बियाणे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी बियाणे खरेदी करून १० डिसेंबरला पेरणी केली. पेरणीनंतर जवळपास ९० दिवस पूर्ण झाले, मात्र टरबूज फळाचे वजन केवळ २०० ग्रॅम ते १ किलो इतकेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सामान्यतः या कालावधीत टरबूजाचे वजन ५ ते ६ किलो पर्यंत वाढणे अपेक्षित असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी सुमारे ०.८० हेक्टर क्षेत्रावर टरबूज लागवड केली होती आणि आतापर्यंत अडीच लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. या शेतीतून ३५ टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र पिकाची वाढ न झाल्याने संपूर्ण गुंतवणूक धोक्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, गुण नियंत्रण अधिकारी अमोल बंड आणि दत्तात्रय काळे यांनी शेतात जाऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी सांगितले की, २ मार्च रोजी तक्रार मिळाल्यानंतर शास्त्रज्ञांच्या टीमसह शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून माहिती देण्यात आली असून पुढील कारवाईसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही सागर किंग प्लस वाण मागितले होते, मात्र सागर एक्सपर्ट वाण देण्यात आले. पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर चौकशी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.1
- गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे अशा त्रासांनी त्रस्त आहात का? या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंचा खरा अनुभव पाहा, ज्यांना शिवराज नॅचरोपॅथी सेंटर, शेगाव येथे उपचार घेतल्यानंतर आराम मिळाला. 🌿 येथे उपलब्ध सेवा: मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी गुडघेदुखी | सांधेदुखी | नस दबणे पॅरलिसीस | शुगर | पोटाचे विकार वजन कमी / वाढणे | मुंग्या येणे 💆♂️ उपचार: मसाज | पोटली चिकित्सा | कांस्यथाळी यंत्र 👩⚕️ डॉ. निकिता शं. मंडवाले (Acupressure, D.N.Y.S – निसर्गोपचार योगतज्ञ) 📍 पत्ता: गौलखेड रोड, डॉ. प्रविण पाटील हॉस्पिटल बाजूला, शेगाव, जि. बुलढाणा – 444203 📅 प्रत्येक रविवारी चेकअप 💰 नोंदणी फी: ₹100 ⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7 📞 संपर्क: 8329006289 “आजच संपर्क करा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या!” “उशीर करू नका, तुमच्या वेदनांना आराम द्या!” 👉 “अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी लगेच कॉल करा – 8329006289” “तुम्हालाही असा त्रास असेल तर लगेच संपर्क करा – 8329006289 📞”1
- बुलढाणा :- वरवंड नगरीत भक्तीचा मळा फुलला ! शतकानुशतकांची 'देवीच्या सोंगाची' परंपरा उत्साहात संपन्न1
- माजी आ विजयराज शिंदेंच्या अटकेसाठी बुलढाण्यात मातंग समाजाचा SDO कार्यालयावर धडक मोर्चा1
- खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.3
- बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले1
- Post by Ganesh Govindrav Bhombe1
- Post by Santosh Bahekar PRESS2