logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चोरी करण्यात सराईत असलेल्या आंतरराज्य टोळीतील अट्टल गुन्हेगारांना अटक, सोन्याच्या दागिने असं मोटारसायकली ही जप्त चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत,सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर),आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) त्यांची झडती घेतली असता आरोपीं कडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/26 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे, सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
775e82c5-18e6-4e9a-9d7a-5b6062fc12d2

चोरी करण्यात सराईत असलेल्या आंतरराज्य टोळीतील अट्टल गुन्हेगारांना अटक, सोन्याच्या दागिने असं मोटारसायकली ही जप्त चोरी करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा आरोपींना अटक; सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील मालमत्ता विषयक गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या अचूक नियोजन व धाडसी कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. दि. 30 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्ता विषयक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी त्यांनी चोरी केलेले दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना कळंब रोड रेल्वे गेटजवळ हरंगुळ-वरवंटी शिवरस्त्यावर 11.00 वाजता सापळा लावून दोन आरोपींना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत,सुमीत दगडू गरगेवाड (वय 27 वर्षे, रा. मळवटी रोड, लातूर),आकाश ऊर्फ भावड्या बाबुराव कांबळे (वय 26 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर) त्यांची झडती घेतली असता आरोपीं कडून 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लोखंडी टामी तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. MH-37 AC-4718) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपींनी सदर मुद्देमाल

चोरीचा असल्याची कबुली दिली असून, मोटारसायकल पुणे येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासात आरोपींनी लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, अहमदपूर व शिवाजीनगर येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे, तर बाहेर जिल्ह्यातील चाकण (पुणे), राहुरी (अहिल्यानगर), आंबेजोगाई शहर (बीड) येथील तीन गुन्हे असे एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर कारवाईमुळे पो.स्टे. एमआयडीसी, लातूर गु.र.नं. 187/26 सह इतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशन व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पो.उपनि. राजेश घाडगे, सपोउपनि. सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे,प्रदीप स्वामी,मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    1
    परभणी शहर मे वार्ड 7 मे गुरु बाबा मैदान में नाली का पानी सड़क पर; “वोट चाहिए तब आते हैं, अब कहां हैं नगरसेवक?” वॉर्ड 7 के नागरिकों का सवाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    2
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. सुरू एप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 2 मे 2026. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा मराठी चित्रपट सोमवार दिनांक 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट मोठी गर्दी खेचत आहे. चित्रपट कलावंत, दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेला बोलताना विनंती केली की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला गेल्यास रील शेअर करू शकता परंतु हा चित्रपट आपण सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण जनतेला थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहण्याचा आनंद घेऊ द्या प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगल्या दिल्याबद्दल धन्यवाद मानले व व्हिडिओ शेअर करू नका विनंती केली.
    1
    लातूरच्या रितेश देशमुख यांनी जनतेला केली विनंती. 
सोशल मीडियावर राजा शिवाजीचे व्हिडिओ अपलोड करू नका. 
सुरू एप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 2 मे 2026.
रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा मराठी चित्रपट सोमवार दिनांक 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट मोठी गर्दी खेचत आहे. 
चित्रपट कलावंत, दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेला बोलताना विनंती केली की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला गेल्यास रील शेअर करू शकता परंतु हा चित्रपट आपण सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण जनतेला थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहण्याचा आनंद घेऊ द्या प्रेक्षकांनी प्रतिसाद चांगल्या दिल्याबद्दल धन्यवाद मानले व व्हिडिओ शेअर करू नका विनंती केली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Rahul dhabale
    1
    Post by Rahul dhabale
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.